स्वादिष्ट, आंबट-गोड चवीचे अननस सर्वत्र लोकप्रिय आहे. शास्त्रीय भाषेत अननस कामोसस असे संबोधले जाणारे अननस ‘ब्रोमेलिअसी’ या कुळातील आहे. ते उष्ण प्रदेशातील फळ असून पौष्टिक आणि ऊर्जादायक आहे. आकाराने गोल, उभट व त्वचेवर चौकोनी असलेले हिरव्या, पिवळ्या रंगाचे हे फळ दिसायलाही आकर्षक असते.
आणखी वाचा : झोपू आनंदे- बहुविभाजित झोप
औषधी गुणधर्म
आम्ल-मधुर, मधुर-शीत वीर्यात्मक असे अननस उत्तम पाचक असते. अननसात ‘क’ जीवनसत्त्व हे भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर अननसामध्ये ८७ टक्के सायट्रिक आम्ल व १३ टक्के मॅलिक आम्ल असते. ही दोन्ही आम्ले शरीरास पोषक असतात. ही आम्ले शरीरात शोषली जाऊन उष्णता व ऊर्जा निर्माण करतात. अननसाच्या गरामध्ये तंतुमय पदार्थ (फायबर) भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचे एन्झाइम असते. ते शरीराचा दाह आणि सूज कमी करते आणि घेतलेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत करते. पिकलेले अननस मधुर- आंबट, मूत्रल, कृमिघ्न व पित्तशामक असते. यामुळे उष्णतेचे विकार व ऊन लागल्याने होणारे विकार कमी होण्यास मदत होते. प्रथिनयुक्त आहाराचे पचन होण्यासाठी अननसाचा उपयोग होतो. म्हणून प्रथिनयुक्त भोजनाच्या शेवटी अननस खाणे श्रेयस्कर असते.
आणखी वाचा : आहारवेद : वजन नियंत्रणात ठेवणारे घोसाळे
उपयोग –
- अननसामुळे उदरव्याधी, कावीळ, प्लीहावृद्धी, पित्तव्याधी, पांडुरोग (ॲनिमिया) यांसारखे रोग बरे होतात.
- लहान मुले, तरुण, वृद्ध या सर्वांसाठी अननस उत्कृष्ट फळ आहे. जेव्हा पोटात कृमी-जंत होतात तेव्हा अननस खाणे उत्तम असते. अननस हे फळ कृमीनाशक आहे. पोटात दुखत असेल तर अननसाच्या सेवनाने पोटदुखी कमी होते.
- पित्तप्रकृतीच्या व्यक्तीसाठी अननस अत्यंत उपयुक्त आहे. पिकलेले अननस खाल्ल्यामुळे पित्त कमी होते आणि उष्णतेचे विकार कमी होतात.
- पिकलेले अननस जसे पित्त कमी करते त्याच्याविरुद्ध कच्चे अननस हे पित्तकारक असते. त्याच्यामधील ब्रोमेलाइम हे एन्झाइम अन्नपचनास मदत करते. त्यामुळे कच्चे अननस हे रुचकर, ग्लानीनाशक आणि श्रमहारक असते.
- क्षारधर्मीय, खनिजसंपन्न अशा अननसामध्ये ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशियम, ब्रोमोलिन, कॅरोटिन हे घटक असतात. त्यामुळे काही त्वचा रोगांवर अननसाचा रस नियमितपणे सेवन केला असता त्वचारोग बरे होतात आणि श्रमनाशक असते.
आणखी वाचा : आहारवेद: उन्हाळ्यात शीतलता देणारे कलिंगड
- लहान मुलांना जर ज्वर (ताप) आला असेल तर तो कमी करण्यासाठी अननसाचा रस व पिंपळी चूर्ण मधामधून चाटावयास द्यावे.
- पित्ताचे विकार कमी करण्यासाठी अननसाचा मुरंबा तसेच अननस सरबत यांचा आहारामध्ये नियमित वापर करावा.
- पिकलेल्या अननसाचे काप त्यात पिंपळी चूर्ण व मिरे घालून खाल्ले तर आम्लपित्त व बहुमूत्रता हे विकार कमी होतात.
- अननसाचे सरबत हे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असते. या सरबतामुळे हृदय सुदृढ बनते आणि मन उत्साही राहते.
- अननसापासून मुरंबा, सरबत असे पदार्थ बनवून वर्षभर अननसाचा आहारात वापर करावा.
सावधानता –
गर्भावस्थेत अननस खाऊ नये, कारण त्यातील ब्रोमोलिन व ट्रिप्सिन हे घटक गर्भस्थ बाळासाठी हानीकारक असतात. अननसाचा रस किंवा काप खाल्ल्यास गर्भाशयाचे आकुंचन होऊन कळा सुरू होऊ शकतात. त्यामुळे गर्भावस्थेत स्त्रीने अननस खाऊ नये, त्याने अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते. अननसाच्या अतिसेवनाने पचन बिघडून पोटाचे विकार होऊ शकतात. कच्चे अननस अतिप्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया बिघडून जुलाब होतात. तसेच कच्च्या अननसाच्या सेवनाने जिभेला चिरा पडतात.
sharda.mahandule@gmail.com