पेरू हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील फळ असून आज बहुतेक सर्वच देशांमध्ये आढळते. मराठीत पेरू, संस्कृतमध्ये बहुबीज, तर इंग्रजीमध्ये ग्वाव्हा, तर शास्त्रीय भाषेत पॅसीडीअम गऊजवा या नावाने परिचित आहे. सामान्यपणे पेरूच्या दोन जाती आहे. एका जातीमध्ये पांढरा गर असतो, तर दुसऱ्या जातीमध्ये गुलाबी गर असतो. दोन्हीही जातींचे पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात.

आणखी वाचा : झोपू आनंदे : ‘गुडाकेश’ व्हायचंय?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार पेरू हा मधुर रसात्मक मधुर विपाकी व शीत वीर्यात्मक आहे. तसेच तो पित्तशामक व कफप्रकोपक आहे. पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते. पेरू खाल्ल्याने ‘क’ जीवनसत्त्वामुळे विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आणखी वाचा : आहारवेद: स्रियांच्या विकारांमध्ये उपयुक्त आंबा

उपयोग
० पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने पेरू खाल्ला असता मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.
० दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे तसेच ग्लुकोज, टॅनिन ॲसिड या घटकांमुळे जेवण सहजरीत्या पचते. सहसा पेरू खाताना त्यावर संधव व जिरेमिरे पूड घालून खावे. यामुळे पेरूमध्ये असणारे कफकारक व वातकारक गुण दूर होऊन पेरू बाधत नाही.
० पिकलेल्या पेरूची भाजी करून खाता येते. तसेच पेरूचा जाम, कोशिंबीर, चटणी, रायते व मुरंबाही करता येतो. हे सर्व पदार्थ रुचीकारक असल्यामुळे अरुची, भूक मंदावणे, आम्लपित्त या विकारांवर पेरूचे विविध प्रकार करून खावेत.
० पेरूतील बी काढून त्याचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा व त्यात गुलाब पाकळ्या, वेलची, खडीसाखर, पाणी घालून सरबत करावे. या सरबतामधून व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात मिळत असल्याने थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो व शरीराचा दाह कमी होतो.
० मलावरोधाचा त्रास होत असेल तर सलग तीन-चार दिवस पेरूचे सेवन करावे किंवा त्याची भाजी बनवून खावी, यामुळे आतड्य़ांची हालचाल वाढून घट्ट मल पुढे सरकला जातो व पोट साफ होते.

आणखी वाचा : आहारवेद : सुदृढ हृदयासाठी अननस

० पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरड्यांची सूज व मुखविकार दूर होतात.
० पेरूची पाने रुची उत्पन्न करणारी असल्याने व ग्राहीगुणधर्माची असल्याने अतिसारामध्ये पानांचा काढा करून प्यायल्यास जुलाब कमी होतात. तसेच वारंवार पोटात मुरडा येऊन जुलाब झाल्यास गुदभ्रंश होतो तेव्हा पेरूच्या पानांचे पोटीस बनवून गुदभागी बांधल्याने गुदभ्रंश दूर होतो व तेथील सूज कमी होते.
० स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या श्वेतपदर या आजारावर पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा करून प्यावा.
० बालके, गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.
० शरीराच्या एखाद्या भागावर सूज येऊन तो भाग ठणकत असेल तर पेरूच्या पानाचे पोटीस करून बांधावे, यामुळे तेथील सूज ओसरून ठणका कमी होतो.
० गर्भवती स्त्रीला जर उलटी, मळमळ असा त्रास होत असेल तर पेरूचे सरबत थोड्या थोड्या अंतराने पीत राहावे. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन उलटी, मळमळीची भावना कमी होऊन भूक चांगली लागते.
सावधानता
पेरू खाताना तो स्वच्छ धुऊन कीड लागलेली नाही हे पाहून खावा. खूप पिकलेल्या पेरूला कीड असण्याची शक्यता असते. म्हणून मध्यम पिकलेला पेरू खावा. तसेच सर्दी-खोकला, घसा दुखणे हे आजार झालेले असताना पेरू खाऊ नये. एकदम सकाळी किंवा रात्रीच्या वेळी पेरू खाऊ नये. तसेच फ्रिजमध्ये ठेवलेला पेरू खाऊ नये. खूप कच्चा पेरू खाल्ल्यास त्यामध्ये असणाऱ्या बियांमुळे पोटदुखी होऊ शकते म्हणून सहसा दुपारच्या जेवणासोबत किंवा जेवण झाल्यावर पेरू खावा.
sharda.mahandule@gmail.com

Story img Loader