Salt शेंदेलोण (सैंधव), पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई मीठ असे आयुर्वेदामध्ये मिठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या अनेक औषधांमध्ये सैंधव(मिठा)चा वापर करतात. स्वयंपाकघरात, तर कुठल्याच अन्नपदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. त्यामुळे अन्नपदार्थामध्ये याचे महत्त्वाचे स्थान आहे. परंतु याच्या अतिवापरामुळे विविध आजारांची लागण होऊन जीवन बेचव होऊ शकते, म्हणून सावध रीतीने मिठाचा आहारात वापर करावा. सैंधव मीठ हे खाणीतून मिळते. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ लवण (मीठ) असे म्हणतात. आपल्या दैनंदिन स्वयंपाकघरातील वापरावयाचे मीठ हे सामान्यत: समुद्रातून मिळविलेले असते.

आणखी वाचा : मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Multani Mitti use
मुलतानी मातीचा सतत वापर करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांचे मत काय..
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
Mahendra Singh Dhoni Health news
…म्हणून धोनी महिनाभर शाकाहारी झाला; मांसाहारी व्यक्तीने आहारात बदल केल्यास शरीरावर काय परिणाम होतो

गुणधर्म

मीठ हे अग्नी प्रदीप्त करणारे धातुवर्धक, कृमिनाशक, रुचीकारक बल्य असते. परंतु त्याचा वापर हा योग्य प्रमाणातच करावा. ते अजीर्ण, उदरशूळ (पोटदुखी) व गॅसेस या विकारांवर उपयुक्त असते. स्वच्छ चमकदार, चौकोनी तुकड्यांच्या आकारातील खडे मीठ हे आरोग्यास लाभदायक असते. सूक्ष्म, दाणेदार, आयोडीनयुक्त महागड्या मिठापेक्षा खडे मीठ वापरणे कधीही फायद्याचे असते. कारण शुभ्र व दाणेदार मीठ बनविताना अनेक रसायनांचा वापर करतात. त्यामुळे ते शरीरास घातक होऊ शकते. आयोडाइज्ड मिठाची जाहिरात सर्वसामान्यांची दिशाभूल करणारी असते. प्रत्येक सामुद्रिक मिठामध्ये आयोडीन हे असतेच. शरीराला आयोडिनची जेवढी गरज आहे. तेवढी गरज खडे मिठातूनही भागते. वेगळे असे आयोडाइज्ड मीठ वापरण्याची गरज नाही.

आणखी वाचा : ‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

दिवसांतून चार ग्रॅम एवढी मिठाची गरज शरीराला असते. त्यापेक्षा जास्त नको. भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर इत्यादी पदार्थामधून ही गरज भागते. तरीही लोक या पदार्थासोबत चटणी, पापड, लोणचे, हवाबंद डब्यातील सूप, ब्रेड, सॉस, केचअप यांचे अधिक प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण हळूहळू आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. परिणामी विविध आजारांची निर्मिती होते. तसेच लहान मुलांबरोबरच सर्वानाच बाजारचे बटाटा आदी वेफर्स खायची सवय असते. हे वेफर्स जास्त काळ टिकण्यासाठी यामध्ये मिठाचा वापर हा पाचपट अधिक प्रमाणात केलेला असतो. त्यामुळे हे वेफर्स खाऊन आरोग्याची हानी होते. वेफर्स खायचेच असतील, तर घरी बनविलेले खावेत.

आणखी वाचा : गृहिणी असलेली आई की, नोकरदार आई? हायकोर्टाने स्पष्ट केले की…

उपयोग

मिठाचा योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते.
१. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते.
२. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात.
३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते.
४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दुष्परिणाम

१. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतड्यातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते.
२. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वांग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतड्यामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.

पर्यायी पदार्थ

आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजारांची लागण होते. थायरॉईड ग्रंथीमधून बाहेर पडणारे थायरॉक्सिन हे हार्मोन तयार होण्यासाठी आयोडिनची जरुरी असते. याचे दररोजचे आवश्यक प्रमाण १५० मिलीग्रॅम्स इतके आहे. याच्या अभावाने थायरॉइड गॉयटर नावाचा विकार होतो. म्हणून रुग्ण घाबरून आयोडीनयुक्त मीठ जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात. परंतु नैसर्गिक पदार्थामधूनही आपल्याला आयोडीन भरपूर प्रमाणात मिळते. जसे की पुढील पदार्थ- अननस, सफरचंद, बटाटा, टोमॅटो, लसूण, शिंगाडा, सागरी व पाण्याकाठच्या वनस्पती जसे घोळ, कमलकंद, सागरी मासे.
या सर्वामधून आयोडिनची गरज भागते. म्हणून दिवसांतून चार ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. हेच योग्य आहे.
sharda.mahandule@gmail.com