सुरेश वांदिले
(1) ब्रायडल हेअर स्टायलिस्ट (लग्नाचा दिवस हा वधूसाठी अत्यंत महत्वाचा असल्याने हा तज्ज्ञ वधूला अधिक सौंदर्यवान करुन आनंदाचा मोरपिसारा फुलवत असतो. लग्नाचा दिवस संस्मरणीय करण्याचे कसब याने प्राप्त केलेले असते.)
(2) ब्रायडल मेकअप आर्टिस्ट (वधूला नुर-ए – जहाँ करण्याचे कसब प्राप्त करणारा कलावंत )
(3) सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट (विविध क्षेत्रातील नामवंतांना त्यांचा वैशिष्टपूर्ण लूक किंवा चेहरा देण्याचे कार्य हा तज्ज्ञ करतो.)
(4) सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट (वेगवगळ्या इव्हेंट-कार्यक्रम – समारंभ यासाठी वेगवेगळी हेअरस्टाइल करण्याकडे विविध क्षेत्रातील नामवंतांचा ओढा असतो. त्यांना भाऊगर्दीत आपला ठसा
उमटवायाचा असतो. हा ठसा ठसठशीतपणे उमटवण्याचे कार्य हा तज्ज्ञ करतो. कालांतरने हे स्टायलिस्ट या नामवंतांच्या गळ्यातील ताईत होतात.त्यांना मर्यादित स्वरुपाचे सेलिब्रिटीपणही प्राप्त होते.)
(5) ब्युटी कन्सल्टंट – विविध प्रकारच्या हेअर स्टायलिंग आणि मेकअपचे ज्ञान प्राप्त झाल्याने वेगवेगळया संस्था आणि व्यक्तिंसाठी सल्ला – सेवा देण्याचे काम मिळू शकते. तुमच्या ज्ञानाची गुणवत्ता जितकी मोठी तितके तुमचे मानधनही मोठे हे लक्षात ठेवले पाहिजे.
(6) स्टायलिस्ट असिस्टंट (नामवंत आणि स्थापित झालेल्या स्टायलिस्ट्ससोबत सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळते. हा कालावधी उत्तम अनुभव मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या अनुभवाचा उपयोग आणखी कौशल्यप्राप्तीसाठी केल्यास स्वत: स्टायलिंग सेवा देण्यासाठी मैदानात उतरु शकतो.
सेलिब्रिटी ॲण्ड ब्रायडल हेअर मेकअप पर्ल अकॅडमीने ११ महिने कालावधीचा प्रोफेशनल कोर्स इन सेलिब्रिटी ॲण्ड ब्रायडल हेअर मेकअप हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. तो या संस्थेचा मुंबई-दिल्ली – जयपूर- बेंगळुरु या कॅम्पसमध्ये करता येतो. कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थिनीला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
फॅशन स्टायलिंग ॲण्ड इमेज डिझायनिंग – हा पदवीस्तरीय अभ्यासक्रम स्टायलिंगच्या क्षेत्रात अधिक उंच उडी आणि सर्जनशील झेप घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. चार वर्षाच्या कालावधीत विद्यार्थिनीला स्टायलिंगच्या सर्व अत्याधुनिक आणि समकालीन संकल्पना स्वयंस्पष्ट व्हाव्यात यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. यामध्ये डिझाइन माईलस्टोन ,डिझाइन ऑफ मटेरिअल्स, स्टायलिंग ॲज ॲडव्हर्टायजिंग, फॅशन लँग्वेज ॲण्ड टेक्निक, ब्रॅण्ड्स मूड, फॅशन फ्यूचर, डिजिटल स्टोरी टेलिंग, कल्चरल स्टडीज, इमेज ॲण्ड आयडेंटी असे काही नवे आणि स्मार्ट विषय शिकता येतात.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणखी खुलवण्यासाठी या विषयांचा सैध्दांतिक अभ्यास रंजक आणि पाया मजबूत करणारा ठरतो. या प्रात्यक्षिकांवर भर असल्याने कलाकुसरीचा हात अधिकाधिक साफ होत जातो. कोणत्याही विषयातील १२ वीमध्ये कंटाळवाणा प्रवास झाल्यास या नव्या क्षेत्रातील प्रवास केवळ कंटाळाच घालवणार नाही तर प्रामाणिक अभ्यास आणि परिश्रमाच्या बळावर तुम्हाला टप्प्या टप्यांवर कधी रोजगाराच्या तर कधी स्वंयरोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकतो. या संस्थेच्या मुंबई – दिल्ली – जयपूर – बेंगळुरु या कॅम्पसमध्ये हा अभ्यासक्रम करता येतो.
करिअर संधी हा किंवा अशाच पध्दतीचा मिळता जुळता अभ्यासक्रम केल्यास पुढील किमान १५ स्वरुपाच्या करिअरसंधी मिळू शकतात.
(1) फॅशन एडिटोरिअल स्टायलिस्ट,
(2) स्टायलिस्ट फॉर मॅगेझिन,
(3) कमर्शिअल स्टायलिस्ट,
(4) ई कॉमर्स स्टायलिस्ट,
(5) कॉस्च्युम स्टायलिस्ट फॉर टीव्ही ॲण्ड फिल्म स्टायलिस्ट,
(6) कॉस्च्युम डिझायनर फॉर टीव्ही ॲण्ड फिल्म,
(7) पर्सनल स्टायलिस्ट,
(8) स्पॅटिअल स्टायलिस्ट,
(9) व्हिज्युअल मर्कंडायजिंग,
(10) पब्लिक रिलेशन्स मॅनेजर,
(11) फूड स्टायलिस्ट,
(12) व्हिज्यूअल स्टोरी टेलर,
(13) क्रिएटिव्ह डायरेक्टर,
(14) स्टायलिस्ट फॉर इव्हेंट्स,
(15) ब्रॅण्ड स्टायलिस्ट, इमेज डिझायनिंग
१२ वीनंतर कुठे आणि कसे जावे या गोंधळात जर तुमची गाडी कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी अभ्यासक्रमात जाऊन कशीबशी पदवी घेऊन बाहेर पडली असेल तर तुम्ही फॅशन स्टायलिंग ॲण्ड इमेज डिझायनिंग हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, तुम्हाला नव्या सर्जनशील क्षेत्रात नेऊ शकतो. मात्र त्यासाठी तुमची चौकस आणि चौफेर बुध्दी-क्षमता यांची कसोटी पाहणारे जेव्हा क्षण येतील तेव्हा ते आव्हान पेलण्याचे कसब अंगी बाणवणे गरजेचे ठरते. पदवीनंतर ज्या करिअर संधी मिळू शकता, तशाच १५ संधी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केल्यावर हस्तगत करु शकता.
प्रोफेशनल फॅशन मीडिया ॲण्ड मेकअप आर्टिस्ट – हा अभ्यासक्रम केल्यावर (1) हेड मेकअप आर्टिस्ट इन सलून, (2) सलून मॅनेजर, (3) मेकअप डायरेक्टर फॉर फॅशन शो, (4) मेकअप ट्रेनर, (5) पर्सनल मेकअप आर्टिस्ट ॲण्ड हेअर स्टायलिस्ट, (6) मॅनेजर इन कॉस्मेटिक ब्रॅण्ड,(7) मेकअप आर्टिस्ट फॉर फिल्म, टीव्ही सिरिअल्स ॲण्ड म्युझिक अल्बम. कौशल्यनिर्मितीचा हा अभ्यासक्रम ११ महिन्यांचा आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तो करता येतो.
संपर्क – एसएम सेंटर, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ मेट्रो स्टेशनच्या बाजूला, अंधेरी पूर्व, मुंबई – 400059 ,
संपर्क – 022-40585400,
संकेतस्थळ- pearlacademy.com
ईमेल- registrar.mumbai@pearlacademy.com