डॉ. शारदा महांडुळे

गर्द तपकिरी रंगाचे कुळीथ सहसा गरीब लोकांचे कडधान्य समजले जाते, परंतु त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे आरोग्य सुधारण्यासाठी व झालेला आजार बरा करण्यासाठी शहरी व श्रीमंत लोक सध्या याचा आहारामध्ये वापर करीत आहेत. मराठीमध्ये ‘कुळीथ, इंग्रजीमध्ये ‘हॉर्स ग्राम’, तर शास्त्रीय भाषेत ‘मॅक्रोटीलोमा युनिफ्लोरम’ (Macrotyloma Uniflorum) या नावाने ओळखले जाणारे कुळीथ ‘रोसीडी’ या कुळातील आहे.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी

साधारणतः कुळथाची पेरणी ही आषाढ महिन्यात केली जाते. त्याचे रोप दीड ते दोन फूट उंचीचे असते व ते जमिनीवर पसरते. हे रोप साधारणतः उडदाच्या रोपासारखे असते व याची पाने उडदाच्या पानांसारखीच असतात. कुळथाच्या रोपाला शेंगा येऊन त्या वाकड्या व लवयुक्त असतात. याच शेंगांमध्ये पिवळसर किंवा भुरकट रंगाचे चार ते सहा दाणे असतात. हे दाणे अळशीच्या दाण्यांसारखेच दिसतात. लाल, पांढरे आणि काळे असे तीन प्रकार कुळथाचे आहेत. या तीनही प्रकारांत आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळे कुळीथ उत्तम असतात. परंतु काळे कुळीथ क्वचितच आढळतात.

औषधी गुणधर्म :

कषायस्वादुरुक्षोष्णाः कुलत्थारक्तपित्तलाः । घ्नन्ति शुक्राश्मरी शुक्रं दृष्टिं शोफं तथोदरम् ।।

अष्टांग संग्रह सूत्रस्थान ७

आयुर्वेदानुसार : कुळीथ चवीला तुरट, गोड, आम्लविपाकी व उष्ण आहे. तसेच ते रक्तपित्तकर, कफघ्न व मूत्रल आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : कुळथामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व इत्यादी पोषक घटक असतात. उपयोग :

१) वरील गुणधर्मामुळे ते सर्दी, खोकला, दमा या रोगांवर, तसेच स्थौल्य, मूतखडा या आजारांवरही उपयुक्त आहे. मूतखडा लघवीतून विरघळून जाण्यासाठी दररोज पाच वाट्या कुळथाचे सूप किंवा कढण प्यावे.

२) स्त्रियांमध्ये गर्भाशयासंदर्भातील, तसेच अंगावरून पांढरे जाणे या विकारावर कुळथाचा उपयोग होतो.

३) कुळीथ उकळून ते पाणी गाळून घ्यावे. हे पाणी भाताबरोबर थोडेसे तिखट, हिंग व लसूण यांची फोडणी देऊन प्यायला द्यावे. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढून वातविकार कमी होतात.

४) कुळथाची उसळ बनवून ती खाल्ल्याने उदर रोग बरा होतो.

५) कुळीथ, पाषाणभेद व गोक्षुर यांचा काढा करून प्यायल्याने मूतखडा विरघळून लघवीद्वारे पडून जातो.

६) आहारामध्ये नियमितपणे कुळीथ खाल्ल्यास वाढलेले वजन आटोक्यात येऊन शरीर सुडौल बनते.

७) थंडीतापामध्ये सुरुवातीला थंडी वाजून नंतर खूप घाम येतो. अशा वेळी घाम बंद करून शरीरात उष्णता आणण्यासाठी कुळथाच्या पिठाने त्वचेवर उद्वर्तन (चोळावे) करावे.

८) लघवी थेंब थेंब होत असेल, तर कुळथाचे सूप करून प्यावे. यामुळे मूत्रमार्गात अडकलेले बारीक रेतीसारखे कण पडून जाण्यास मदत होते. फक्त या सूपबरोबर पाणी पिण्याचेही प्रमाण वाढवावे. यामुळे मूत्रमार्गावर दाब येऊन रेतीचे कण निघून जातात.

९) बाळंतिणीला दोन ते चार आठवडे कुळथाचा काढा द्यावा. यामुळे प्रसूतीनंतर प्रसरण पावलेले गर्भाशय आकुंचन होण्यास मदत होते.

१०) कुळीथ उदररोग, अतिसार, नेत्रविकार, कृमीदोष, ज्वर, मूत्रविकार, हृदयविकार अशा अनेक विकारांवर उपयुक्त आहे.

११) स्त्रियांना मासिक पाळीच्या दोषांमध्ये, प्रसूतीच्या वेळी किंवा गर्भपातानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी साधारणतः सात दिवस कुळथाचा काढा प्यायला द्यावा.

१२) कुळथाच्या पिठामध्ये थोडे तिखट, मीठ, कोथिंबीर व लसूण टाकून ते पीठ पाणी घालून मळावे व या गोळ्यांपासून पोळपाटावर शेंगुळे वळवावेत व पाण्याला उकळी आणून त्यामध्ये ते शिजवावेत. शिजवलेले शेंगुळे गरम गरम खाल्ल्यास सर्दी, खोकला, ताप नाहीसा होतो. हे चवीस अतिशय रुचकर असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खेडेगावांमध्ये याचा मुख्य आहार म्हणून उपयोग केला जातो.

१३) कुळथाच्या पिठाला जिरे, मोहरी, लसूण, तिखट व हिंग यांची तेलामध्ये फोडणी देऊन पिठले बनवावे. हे पिठले ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खावे. याची चव अत्यंत रुचकर असून, ते पौष्टिकही आहे.

सावधानता : कुळीथ हे पित्तकारक, विदाही, उष्ण व तीक्ष्ण असल्याने गर्भवती स्त्रियांनी, पित्तप्रकृत्ती असणाऱ्यांनी, तसेच रक्तपित्त झालेल्यांनी त्याचा उपयोग सहसा करू नये.