संजना घरात आली तेच वैतागून. आईच्या लक्षात आलं, की काहीतरी बिनसलंय. आईनं विचारायच्या आधीच तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “मला सांग आई, तुम्ही मला आणि दादाला इतकं का शिकवलत?”
“का म्हणजे? तुम्ही शिकून एक स्वतंत्र, यशस्वी, जबाबदार व्यक्ती बनावं म्हणून, पण काय झालं ते तर सांग.”
“आता दादा अमेरिकेत नोकरी करणार म्हणजे याची दाट शक्यता आहे, की तो भारतात परत राहायला येणारच नाही. उद्या तुम्हाला काहीही गरज लागली तर ताबडतोब मदत करण्याची कुवत तुम्ही माझ्यात निर्माण केली आहे. आहे की नाही?”
“नक्कीच आहे बेटा.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा : आहारवेद : शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी फणस
“हो ना? मग हे कुठून आलं, की मुलगी म्हणजे परक्याचं धन? आता बघ, आपण अनेक लग्नात मुलीची ‘पाठवणी’ किंवा ‘विदाई’ सोहळा अनुभवतो ना? त्यात पार्श्वसंगीत म्हणून हमखास वाजवली जाणारी गाणी आठवा बरं. ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘बाबुल की दुवाए लेती जा’ ‘बेटिया जो ब्याही जाये मुडती नही हैं, फसले जो काटी जाये उगती नही है…काहीही काय? लग्न झाल्यावर मुलगी पुन्हा येतंच नाही की काय घरी ? का असली गाणी लावतात लोक लग्नात? किती नकारात्मक आहेत हे विचार.”
“हो हो संजू, पण इतकं तापायला काय झालं तुला?”
आणखी वाचा : सुंदर त्वचा हवी? ‘बनाना’ हैं ना!
“अगं, काल माझ्या लग्नाचा विषय काढून सुलू आत्या म्हणत होती, की मुलगी काय असून नसल्यासारखी. शेवटी एक दिवस निघून जाणार. मी म्हणाले, सासरी गेली म्हणजे काय माहेर संपतं की काय? मी आई बाबांची मुलगी आहे, आणि मरेपर्यंत त्यांची मुलगीच असणार आहे ना? आणि कमावती आहे तर त्यांची जबाबदारीही घेईन. तर ती म्हणाली, ‘तू कितीही कमव गं, पैसा तर परक्याच्याच घरी जाणार. तुला खर्च करताना सारखं तिकडच्यांची परवानगी लागणार.’ असं म्हणाली.
आणखी वाचा : मासिक पाळीच्या वेदनांनी त्रासला आहात? आता येतोय वेदना संपवणारा ‘बॉडीसूट’!
“मग तू काय उत्तर दिलंस?” मी म्हणाले, तुमच्या आधीच्या पिढीसाठी कदाचित हे अंशतः खरं ठरत असेल, कारण आजी आजोबांच्या काळात मुलींना जास्त शिकवत नसत. सतत कुणाच्या तरी आधाराने जीवन जगायचं इतकंच त्यांना माहीत. आधी वडील, मग नवरा आणि शेवटी मुलं. त्यांच्या मर्जीनेच बायकांनी वागायचं. पण आत्या देखील पदवीधर आहे ना गं? शाळेत नोकरी करतेय ना. तरीही तिनं असं बोलावं? समस्त सगळ्या मुलींनी ठरवलं, की लग्नानंतर आपण सासरी जायचंच नाही, नवरेच येतील इथे. आमच्याकडे. तर कसला हाहा:कार माजेल नाही? त्यांना म्हणणार का परक्याचं धन?”
तिच्या या बोलण्यावर आई खूप हसली. “नको गं बाई मला घर जावई.”
आणखी वाचा : UNION BUDGET 2023: केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ खास योजना!
“का नको? घरसून चालते, तर घरजावई का नाही? त्याला कमी का लेखायचं? मग मुलगी सासरी जाते तेव्हा तिला का कमी लेखत नाही? ते गृहितच धरलं आहे ना? नवरा बायको दोघंही कमावतात. मग कोण कुणाकडे गेलं यामुळे फरक का पडतो? हे असे प्रश्न कुणीच नाही विचारत. आणि बुळबुळीत वाक्यं तोंडावर फेकतात, की मुलगी म्हणे परक्याचं धन! समस्त मुलींनी जर लग्नानंतर सासरी जाण्यास नकार दिला तर?”
“हे बघ बेटा, स्त्री शरीराने आणि मनाने अत्यंत लवचिक असते. नवीन वातावरणात सामावून जाण्याची आणि समोरच्याचं मन राखण्याची जन्मजात कुवत तिच्याकडे असते. शिवाय पूर्वी कमावता व्यक्ती फक्त पुरुष असल्याने तेव्हापासून ही सोयीस्कर प्रथा पडलेली आहे. आता राहिला तुझा प्रश्न की दोघंही घर चालवण्यास सक्षम असतील तर त्याग मुलींनीच का करायचा तर तो खरंच क्रांतिकारक आहे. मग आजच्या मुलांना आणि मुलींच्या पालकांना विचारावे लागेल की तुम्ही एकमेकांशी जुळवून घ्याल का? होऊ शकतं असं… क्रांती घडेल क्रांती.”
“विचार कर की समस्त मुलगे लग्नानंतर नवरीच्या घरी जात आहेत. मुलाची पाठवणी केली जातेय. कसलं भारी! असं जर झालं तरीही आम्ही मुली नक्कीच नवऱ्याच्या आई वडिलांची जबाबदारी घेऊ. ते टाळणार नाही. निदान तेव्हा तरी समाज म्हणणार नाही की मुलगा म्हणजे परक्याचं धन!”
adaparnadeshpande@gmail.com