मुलगी विशीत आली, की तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला जातो. अभिनेत्री कंगना रणौतवर असा दबाव कधी आला होता का, याविषयी बोलताना तिनं आपल्या आईला वाटत असलेली चिंता उघड केली. “२५ वर्षांनंतर मुलींचं लग्नाचं वय उलटून गेलं हा (गैर)समज दुर्दैवानं कायम आहे! माझी आई माझ्या लहानपणापासून म्हणत आलीये, की हिच्या वाचाळपणामुळे हिला नवरा मिळणार नाही! आता माझी तिशी उलटून गेलीय. आता ती म्हणते, ‘अगं कंगना, आता तरी लग्न कर! तुझ्या तोंडाळ स्वभावामुळे तुला मुलगा तरी कसा मिळणार म्हणा? जरा तोंडाला आवर घाल!’ मी फटकळ आहे, मनातल्या भावना व्यक्त करते, त्यामुळे मला वर मिळणार नाही असं त्या बापडीला वाटतं! माझ्यासाठी परमेश्वरानं योग्य जोडीदार योजून ठेवलाच असेल, फक्त ती वेळ अजून यायची आहे. मला लग्न करण्याची घाई नाहीये, कारण माझ्या करिअरनं मला खूप समाधान दिलंय. ‘मॅरेजेस आर मेड इन हेवन’ असंच माझं ठाम मत आहे.”

आणखी वाचा: टोमॅटोचे दर गगनाला… तुम्हाला सुचतोय का पर्याय?

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

‘पंगा क्वीन’ (चित्रपट नव्हे. खरोखरीचा!) अशी अलिखित पदवी नावाच्या मागे लागलेल्या कंगनानं नायकप्रधान बॉलिवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सध्या ही क्वीन पुन्हा एकदा चर्चेत आहे ती ‘निर्माती’ या भूमिकेत पदार्पण करण्याच्या निमित्ताने. ‘ॲमेझॉन प्राईम’वर तिची निर्मिती असलेला ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. ‘‘बॉलिवूड ‘नेपोटिझम’वर उभारलेलं आहे. जर माझ्यासारख्या ‘नॉन फिल्मी बॅकग्राउंड’ असलेल्या अभिनेत्रीनं निर्माती झाल्यावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली नाही, तर इतरांवर नेपोटिझमचा आरोप करण्याचा मला हक्क काय?’’ असं म्हणत कंगना रणौतनं पुन्हा एकदा ‘नेपोटिझम’वर शेरा मारला.

आणखी वाचा: गच्चीवरची बाग: मोठ्या प्रमाणावर खतनिर्मिती करणारा… डेव्हिल डायजेस्टर कंपोस्टिंग ड्रम

“निर्माती-दिग्दर्शिका व्हावंसं का वाटलं, असा प्रश्न मला वारंवार विचारला जातो, पण मी निर्माती का होऊ नये? ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटादरम्यान माझे दिग्दर्शकाशी काही तात्विक मतभेद झाले आणि बराचसा भाग मी दिग्दर्शित केला. या चित्रपटाला यश मिळालं. दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, मला इंडस्ट्रीत ज्युनियर असलेली क्रिती सनोन या निर्मात्या झाल्यात. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ हे माझं बॅनर आहेच. मी निर्मिती-दिग्दर्शन याकडे निव्वळ बिझनेस म्हणून न पाहता माझ्यातली ‘ग्रोथ’ म्हणून पाहतेय. मी निर्माती असूनही ‘टीकू वेडस् शेरू’ चित्रपटात नवाजुद्दीन सिदि्दकीच्या नायिकेची भूमिका करण्याचा मोह मला झाला नाही. एका अतिशय तरुण नायिकेची या चित्रपटास गरज होती. माझं वय ३५ आहे आणि मी मेकअप करून ते १० वर्षांनी कमी करू सकत असले, तरी कथानकात तरुण अभिनेत्री हवी असताना मी स्वतः नायिका होण्याचा अट्टहास का करावा? अनेक महिने आम्ही टीनएजर, सुंदर मुलीच्या शोधात होतो. शेवटी अवनीत कौर या नवोदित अभिनेत्रीची भेट झाली आणि चित्रपट सुरु झाला. अवनीत या कथेनुसार भोळीभाबडी, साधीसुधी आहे. तिला व्यवहार-जगरहाटी कशाशी खातात हे ठाऊक नाही. चित्रपटाच्या कथेतही जगाविषयी अनभिज्ञ असणारी अशीच ही नायिका असते. बॉलीवूडला नव्या, फ्रेश चेहऱ्यांची नितांत आवश्यकता आहे.”

आणखी वाचा: आहारवेद : कॅल्शिअमने समृद्ध नाचणी

लवकरच कंगनाचं दिग्दर्शन असलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा तिनं यात साकारली असून कथा-दिग्दर्शन हे सबकुछ कंगनाचंच आहे. तिचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘तेजस’ हाही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यात तिनं एअरफोर्स अधिकाऱ्याची भूमिका केलीय. “२०१६ मधील एका सत्यघटनेवर आधारित या चित्रपटातल्या भूमिकेनं माझ्यावर गारुड केलंय. मी प्रत्यक्षात जशी खंबीर, सडेतोड आहे, त्या माझ्या स्वभावाशी या भूमिकेचं साधर्म्य आहे.

‘आपल्याला चित्रपटांमधून संदेश वगैरे द्यायला आवडत नाही,’ असं सांगताना कंगनानं ‘लगे हाथ’ ‘आदिपुरूष’ चित्रपटावर ताशेरे ओढले! “आताचा प्रेक्षक ‘स्मार्ट’ आहे. आधी अत्यंत उत्सुकता वाटत असलेल्या, रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रेक्षकांनी नंतर किती छी-थू केली ते आपण पाहात आहोत. निव्वळ ३-डी फिल्म म्हणून आजचे प्रेक्षक ‘आदिपुरुष’ला डोक्यावर घेणार नाहीत हे निर्माते विसरले. माझं मत असं, की आजच्या प्रेक्षकाला फिल्ममधून संदेश वगैरे नकोय. फक्त सुसंगत-रीलेव्हंट असं मनोरंजन द्या. कधी ‘अंडरकरंट’ असलेला संदेश प्रेक्षक चालवून घेतात. त्यांच्या बुद्धीला पटेल असं द्या! आजच्या काळात आपण रूढ अर्थानं दिसणाऱ्या यशाला अनन्यसाधारण महत्त्व दिलंय. पैसा असलेल्यानं तो पैसा कसा मिळवला हा प्रश्न गौण मानला जातो! जी व्यक्ती अपयशी ठरते तिच्याकडे मात्र आपण अपराधी म्हणून बघितल्यासारखं बघतो. पण अनेक अपयशाच्या पायऱ्यानंतर नंतर यशाचा सूर लाभतो आणि यशाचं महत्त्व अधोरेखित होतं. मला ‘मेसेज ओरिएंटेड फिल्म्स’ आवडत नाहीत, पण मी संस्कार, नीतीमत्ता, आचरण यांना मानते. कुठल्याही सिनेमात एखादी व्यक्तिरेखा तरी अशी असते, जी आपल्याला भावते, आपण त्या व्यतिरेखेशी रीलेट करतो, हाच संदेश समजावा.”

Story img Loader