क्रीडा क्षेत्रापासून ते व्यवसाय क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांत आपले वर्चस्व स्थापन करत आहेत, इतरांना प्रेरणा देत आहेत. दरम्यान, २९ वर्षांच्या मानवी लोहियाने, ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा स्त्रियांसाठी एक उत्तम आदर्श बनल्या आहेत. मानवी ही तिच्या जिद्दीने आणि कठोर परिश्रमाने आज एक यशस्वी व्यावसायिक बनली आहे. मानवी लोहिया ही ‘एकांताच्या वेलनेस आणि आहार विभागासह [Ekaanta’s wellness and food and beverage departments], सर्वांगीण आरोग्य विकासाचीदेखील जबाबदारी सांभाळत आहे. वेलनेसतज्ज्ञ असणाऱ्या मानवीने कोविड-१९ दरम्यान आफ्रिकेमध्ये प्रमाणित आरोग्य सेवा कर्मचारी म्हणून काम केलेल्या प्रवासाबद्दल आणि एकंदरीत तिच्या या क्षेत्रातील अनुभवाबद्दल इंडिया डॉट कॉमला माहिती दिली आहे.

आहारतज्ज्ञ आणि वेलनेसतज्ज्ञ, मानवी लोहिया

मानवी लोहियाने डिस्नेमधून पेस्ट्री आणि बेकिंग कलेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पाककला शिकत असणाऱ्या मानवीने आहारतज्ज्ञ क्षेत्रात असणारी तिची आवड जोपासण्यास सुरुवात केली. मानवीने, मानसिक आणि शारीरिक जखमा, हृदय, मूत्रपिंड आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारख्या आजारांसाठी अतिदक्षता विभागात (ICU) साधारण दीड वर्ष काम केले आहे. अशा पद्धतीने इतरांच्या उत्तम आरोग्यासाठी काम करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तिने बोस्टन विद्यापीठातून एपिडेमियोलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्समधील मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ क्षेत्रात आपले शिक्षण घेतले.

हेही वाचा : जगातील पहिल्या मिस AI ब्युटी स्पर्धेत भारतीय मॉडेल अंतिम स्पर्धेत! पाहा कोण आहे ‘झारा शतावरी’?

मानवीने आपली आवड, व्यवसाय म्हणून कशी पुढे आणली?

हार्वर्डमध्ये संशोधन कामात स्वत:ला झोकून दिल्यानंतर, मानवीला पुन्हा तिच्या मायदेशी, म्हणजेच भारतात येऊन आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रात योगदान द्यावे असे वाटू लागले. मानवी आजवर शिकलेल्या गोष्टींच्या मदतीने इतरांचे आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रचंड उत्सुक होती.

मानवीने, वैज्ञानिक शोध आणि पारंपरिक, प्राचीन आरोग्य पद्धतींमधील दरी भरून काढली. “मी एक नोंदणीकृत आहारतज्ज्ञ असून, मला सहा वर्षांचा अनुभव आहे. या काळात मी जवळपास ५०० हून अधिक रुग्णांबरोबर काम केले आहे. त्यांच्यासह काम करताना मी कायमच पुराव्यांवर आधारित संशोधनावर भर दिला आहे. लोकांना आहारासंबंधी विश्वासार्ह आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असलेला सल्ला देणे हेच माझ्या कामाचे मुख्य ध्येय आहे”, असे मानवीने इंडिया डॉट कॉमला दिलेल्या माहितीत सांगितले असल्याचे समजते.

हेही वाचा : Perinatal Depression : गरोदरपणात ताण घेणं सोडा! ‘या’ महिलांना हृदयविकाराचा अधिक धोका; नवा अभ्यास काय सांगतो?

मानवीच्या एकांता या वेलनेस सेंटरमध्ये लोकांना अतिशय स्थिर आणि शांत वातावरण अनुभवण्यास मिळते. “मी विविध हेल्थकेअरमध्ये काम करताना एक गोष्ट सतत अनुभवली. ती म्हणजे, आजच्या प्रगत आणि गतिमान आयुष्यात अनेक व्यक्तींना आपले आरोग्य चांगले ठेवणे अतिशय अवघड जात असते. तणाव, चिंता आणि चिडचिड यांसारख्या गोष्टी साधारणपणे पारंपरिक औषधोपचार पद्धतींच्या प्रभावितेला कमी समजत असे. मी एकांताकडे एखाद्या पवित्र ठिकाणांप्रमाणे पाहते. जिथे लोक रोजच्या आयुष्यातील गोंधळापासून दूर येऊन, शांतता मिळवू शकतील. तसेच स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्याच्या प्रवासाला सुरुवात करतील.”

“माझ्या देशातील माझ्या लोकांचे आरोग्य आणि त्यांचे कल्याण करणे हेच माझ्या एकांताच्या ध्येयाचे मूळ उद्दिष्ट आहे”, असे मानवीचे म्हणणे आहे.