स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आता जवळपास ६२ वर्षे उलटून गेली. या ६२ वर्षांत महाराष्ट्राच्या विधान परिषदेला फक्त दोनच महिला उपसभापती लाभल्या आहेत. पहिल्या जे. टी. सिपाहमलानी आणि दुसऱ्या नीलम गोऱ्हे. नीलम गोऱ्हे यांचं उपसभापतीपद अलीकडेच धोक्यात आलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी कायदेशीर बाजू मांडल्याने पद कायम राहिलं आहे. परंतु, या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की, राज्याच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढत असताना राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होण्याची संधी या ६२ वर्षांत केवळ दोनच महिलांना का मिळाली?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१९३५ साली भारत सरकार कायदा (Government of India Act 1935) संमत झाला. या कायद्यानुसार, संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली गेली. या कायद्यान्वये १९३७ साली विधानसभा व विधान परिषद अशी दोन सभागृहे अस्तित्वात आली. १९३७ साली अस्तित्वात आलेली विधान परिषद ही मुंबई विधान परिषद या नावाने ओळखली जात होती. मुंबई विधान परिषदेचे पहिले उपसभापती म्हणून रामचंद्र सोमण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी जवळपास दहा वर्षे हे पद भुषवले. त्यानंतर १९४७ साली हे पद शांतीलाल हरजीवन शहा यांच्याकडे गेले. त्यांनी पाच वर्षे हे पद भुषवल्यानंतर व्ही.जी लिमये यांनी उपसभापती पदाचा कार्यभार उचलला. तीन वर्षे उपसभापतीची जबाबदारी पार पाडल्यानंतर मुंबई विधान परिषदेला पहिल्या महिला उपसभापती लाभल्या, त्यांचं नाव जे.टी. सिपाहमलानी. १९५५ ते १९६० या पाच वर्षांत त्यांनी मुंबई विधान परिषदेच्या उपसभापती पदाची जबाबदारी पेलली.
दरम्यान, १९६० साली मुंबईसह महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुंबई विधान परिषदेचं महाराष्ट्र विधान परिषद असं नामकरण आणि विस्तार करण्यात आला. त्यानंतरही महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर उपसभापती म्हणून जे.टी. सिपाहमलानीच विराजमान होत्या. त्यांनी १९६२ पर्यंत हे कामकाज सांभाळलं, त्यानंतर विष्णूप्रसाद देसाई यांना उपसभापती करण्यात आलं.
१९३७ साली अस्तित्वात आलेल्या मुंबई विधान परिषदेत १८ वर्षांनी पहिली महिला उपसभापती लाभली. परंतु, संयुक्त महाराष्ट्राला सिपाहमलानी यांच्यानंतर महिला उपसभापती लाभण्यास तब्बल ६० वर्षे वाट पाहावी लागली. २०१९ साली शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती पदाचा कार्यभार स्वीकारला, तो आजगायत त्यांच्याकडे आहे. म्हणजेच, १९३७ पासून ते आतापर्यंत महाराष्ट्राला फक्त दोनच महिला उपसभापती लाभल्या. तर, महाराष्ट्राला तब्बल ६० वर्षांनी महिला उपसभापती लाभल्या. एकीकडे राजकारणात महिलांचा सहभाग वाढतोय. परंतु, आंदोलन, चळवळी उभरण्यापुरतीच त्यांना जबाबदारी मिळते आणि महत्त्वाच्या पदावर त्यांना डावललं जातंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
हेही वाचा >> आपल्याला सुट्टी हवी… त्यांना का नको?
नीलम गोऱ्हे यांची राजकीय पार्श्वभूमी
पेशाने डॉक्टर असलेल्या नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेतील फायर ब्रॅण्ड नेत्या म्हणतात. महिला आणि दलितांच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटाची बाजू लावून धरली होती. महिला आघाडीची तोफ नीलम गोऱ्हे यांनी कायम धडाडत ठेवली. परंतु, काहीच दिवसांपूर्वी त्या शिंदे गटात सामील झाल्या, त्यामुळे त्यांचं उपसभापती पद धोक्यात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पक्षांतर केल्याचा दावा करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी विधान परिषदेत केली. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कायदेशीर बाजू स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचं हे पद कायम राहिलं आहे. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नीलम गोऱ्हे या उपसभापती कशा झाल्या हे पाहूयात.
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता नीलम गोऱ्हे यांनी १९७७ साली युवक क्रांती दलातून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. परंतु, त्यांनी त्यांची चौकट केवळ महिला चळवळीपुरती मर्यादित ठेवली नाही. ऊसतोडणी कामगार, शोषित, मजूर, भूमीहीन दलित, मजुरांसाठीही त्यांनी चळवळ उभारली. ज्या काळात राजकारणात पुरुषी वातावरण होतं, त्या काळात नीलम गोऱ्हे यांनी आपली राजकीय कारकिर्द जोरात सुरू केली. त्यांनी लक्ष वेधलेल्या महिलांच्या प्रश्नांमुळे राजकारणाच्या पटलावर नवा अजेंडा निर्माण होत होता. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता समाजकारणासह राजकारणही गरजेचं असल्याचं त्यांना कळलं, म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचालही सुरू केली. महिलांचे प्रश्न, दलितांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी १९८७ साली रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला. राज्याच्या राजकारणात नीलम गोऱ्हेंचा झंझावात वाढत गेला. प्रखर महत्त्वाकांक्षा असलेलं निडर व्यक्तिमत्त्व नीलम गोऱ्हेंच्या रुपाने मिळत होतं. त्यातूनच, त्यांनी पुढे शिवसेनेची वाट निवडली.
हेही वाचा >> लेशपाल…! कुठे कुठे आणि कसा पोहोचणार? बघ्यांच्या समाजात बाई तू…
बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती. त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव जुळला. यातून नीलम गोऱ्हेंचं पक्षातील वर्चस्व वाढत गेलं. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न मांडले. शिवसेनेतील महिला आघाडी गोऱ्हेंनी मजबूत केली. गोऱ्हेंच्या कामाचा झंझावात पाहून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं. २००२ साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या. २००२ पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांना २०१९ साली उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली.
२०१९ साली बिनविरोध निवड
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. काँग्रेसकडून जोगेंद्र कवाडे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे, नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
आतापर्यंत झालेले उपसभापती
मुंबई विधान परिषद
- रामचंद्र गणेश सोमण १९३७-१९४७
- शांतीलाल हरजीवन शहा १९४७-१९५२
- व्ही.जी.लिमये १९५२ – १९५५
- जे.टी. सिपाहमलानी १९५५-१९६०
महाराष्ट्र विधान परिषद
- जे. टी. सिपाहमलानी १९६०-१९६२
- विष्णुप्रसाद सूर्यभानजी गवई १९६८ – १९७८
- अर्जुन गिरिधर पवार १९८७-१९८४
- दाजीबा पर्वत पाटील १९८४-१९८६
- सूर्यभान रघुनाथ वहाडणे १९८८-१९९४
- प्रा.नारायण सादशिव फरांदे १९९४-१९९८
- वसंत शंकर डावखरे २००४-२०१६
- माणिकराव गोविंदराव ठाकरे २०१६-२०१९
- नीलम गोऱ्हे २०१९- आजपर्यंत