आराधना जोशी 

हिरव्या रंगाच्या कॅक्टसच्या आकारात असलेलं आणि समोरच्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करणारं खेळणं आणि त्याला घाबरून रडणारी बाळं असा व्हिडीओ आपल्या प्रत्येकाने किमान एकदा तरी बघितलाच असेल. अगदी लहान वयातच अशी मनात भीती निर्माण करणारी खेळणी मुलांसमोर आणणं योग्य आहे का? पालक म्हणून आपण याचा विचार कधी केला आहे का?

Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

खेळणी ही मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. हे विचारात घेऊनच आपल्या मुलांच्या वयानुसार योग्य खेळण्यांची निवड करायला हवी. खेळणी निवडताना त्यांचे रंग कोणते हे सुद्धा विचारात घ्यावे. अगदी तान्ह्या बाळाला पहिला रंग ओळखता येतो तो लाल. म्हणूनच त्यांच्यासाठी असणाऱ्या खेळण्यांमध्ये लाल रंगाचा वापर जास्त केलेला असतो. याच काळात आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तीसुद्धा बाळांसाठी एक प्रकारची खेळणीच असतात. आपली माणसं कोणती? याचा अंदाज बाळ घ्यायला, हळूहळू शिकायला लागलेलं असतं. या व्यक्ती, घराबाहेरून येणाऱ्या कावळा, चिमणी, गाय, कुत्रा यांचे आवाज बाळाच्या कानावर पडत असतात. म्हणूनच आवाज करणारी खेळणी – खुळखुळा, पाळणा असेल तर त्यावर टांगलेल्या बाहुल्या, पक्षी – बाळांना आवडतात. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या काही भागांची ओळख बाळाला व्हायला लागते. हातांच्या बोटांच्या वेगवेगळ्या हालचाली करणं, हात हवेत उडवत राहणं हे याच काळात बाळाचे खेळ बनतात.

रांगायला लागलेल्या किंवा बसायला लागलेल्या बाळांसाठी अवती-भवती वावरणाऱ्या माणसांचे निरीक्षण करणे सुरू होते. अशावेळी त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारणे, बडबड गीते म्हणणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणे – जमलं तर त्या गोष्टींमध्ये असणाऱ्या पक्षी, प्राण्यांचे आवाज काढणे- आपडी थापडी, चाऊ म्याऊ किंवा लहान प्रमाणात लपंडाव यासारखे खेळ नक्कीच खेळता येतात. याबरोबरच मुलांसाठी असणारी चित्रमय पुस्तकं त्यांच्यासमोर ठेवली तर रंग, आकार, अक्षरं, आकडे यासारख्या गोष्टी यातून शिकतील.

हेही वाचा >> बाळासाठी पाळणाघराची निवड कशी करावी? ‘या’ गोष्टी ध्यानात ठेवाच!

आवाज आणि स्पर्श महत्त्वाचा

आवाज हा घटक या टप्प्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे घरातली भांडी, त्यांचे आवाज मुलांना आकर्षित करणारे असतात. ताटावर चमचा वाजवणं किंवा आवाज करणारी खेळणी – झांजा वाजवणारं माकड, ढोल, देवघरातली घंटा – मुलांना प्रचंड आवडतात.
चालायला लागलेलं मूल जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रचंड उत्सुक असतं. वस्तूंना हाताळणं ते याच काळात शिकतं. विविध वस्तूंचे आकार, रंग याबरोबरच आता त्यांचा स्पर्श हा घटक महत्त्वाचा ठरतो. गार – गरम, मऊ – कठीण, टणक, कडक हे ते स्पर्शातून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बोटांवरही बाळाचे बऱ्यापैकी नियंत्रण आलेलं असतं. त्यामुळे लाकडी ठोकळे, ब्लॉक यापासून वेगवेगळ्या रचना करणे, क्ले मळणे अशा क्रिया करायला मुलांना आवडतात.

बुद्धीला चालना मिळतील असे खेळ खेळा

मुलं जसजशी मोठी होतात, त्यांच्या आवडी निवडी बदलतात, त्याप्रमाणे खेळण्यांबद्दलच्या मागण्या बदलत जातात. मात्र त्यांचं वय आणि गरज यांचा विचार करून पालकांनी त्यानुसारच खेळण्यांची निवड करायला हवी. बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांची याच काळात मुलांना ओळख करून द्यावी. वेगवेगळी पझल्स, स्क्रॅबल, अगदी नाव, गाव, फळ, फूल यासारखे खेळ मुलांशी खेळाचे. माझी मुलगी लहान असताना अनेकदा प्रवासात, भाजी घ्यायला जाताना रस्त्यात आम्ही मायलेकी शब्द साखळी खेळायचो. एक शब्द घेऊन त्याच्या शेवटच्या मुळाक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द आलटून पालटून प्रत्येकीने सांगायचा. या खेळातून शब्दांची ओळख व्हायला मुलीला खूप मदत झाली. वाचनाची गोडीही याच काळात जर जाणीवपूर्वक मुलांना लावली तर नक्की त्याचा फायदा होतो. पुस्तकं विकत आणण्यापेक्षा आपल्या जवळ एखादी लायब्ररी असेल तर मुलांसाठी लावावी, त्याद्वारे नवनव्या पुस्तकांची ओळख मुलांना होते.

खेळण्यांची लायब्ररी तयार करा

जी गोष्ट पुस्तकांची तीच गोष्ट खेळण्यांची. प्रत्येक वेळी बाजारातून खेळणी विकत घेण्यापेक्षा खेळण्यांची पण लायब्ररी असेल तर, त्याचं सभासदत्व घ्यावं. अनेकदा त्याच त्याच खेळण्यांशी खेळणं मुलांना कंटाळवाणं होऊ शकतं. अशावेळी खेळण्यांची लायब्ररी हा उत्तम पर्याय ठरतो. शिवाय, घरातल्याच अनेक वस्तूंपासून खेळ तयार करता येतात. गरज असते ती पालकांच्या पेशन्सची आणि क्रिएटिव्ह मनाची. पालक जर मुलांसाठी घरीच खेळ तयार करत असतील किंवा त्यांच्याशी खेळत असतील तर पालक आणि मुलांमध्ये तयार होणारे भावबंध वेगळेच असतात.

खरंतर, खेळणी आणि मूल यांचा खूप जवळचा असतो. ज्या घरात मुलं त्या घरी खेळण्यांचा पसारा असणारच. खेळण्यांसोबत खेळताना मुलं मनानं आणि शरीरानंही वाढत असतात. इतकंच नाही तर, त्यांचं भावविश्व खेळण्यांशी जोडलेलं असतं. त्यामुळे खेळणी ही जरी मुलांचं मन रमवण्यासाठी असली तरी, त्यांची निवड करताना खूप काळजी घ्यावी लागते.

हेही वाचा >> आज खाऊच्या डब्यात काय देऊ? आईला सतत पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं?

खेळणी ही घाबरवणारी किंवा भीती दाखवणारी असतील तर मुलांच्या मनावर त्याचा खोल परिणाम होतो. तीच गोष्ट मुलींच्या हातात दिसणाऱ्या बाहुल्यांबद्दल. पु. लं. नी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी असणाऱ्या लाकडी ठोकळ्यांना बाहुली – बाहुला म्हणणं म्हणजे बालपणावर मोठा अन्याय होता. तसंच आताच्या स्लिम ट्रीम असणाऱ्या बाहुल्यांमुळे मुलींच्या मनात फार लहानपणीच सौंदर्य, सुंदरता याबद्दल चुकीच्या संकल्पना निर्माण होतात आणि आपण त्यात बसतो की नाही याची तुलना मुलींच्या मनात नकळतपणे सुरू होते. यातून स्वतःबद्दल तिरस्कारही निर्माण होतो असं अभ्यासकांचं मत आहे.

हेही वाचा >> मुलांना घडवताना पालकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे

खेळ म्हणजे शरीर आणि बुद्धीला खाद्य पुरवणारं माध्यम. ऑनलाइन गेम किंवा कॉम्प्युटर गेम म्हणजे खेळणं नाही. दुर्दैवानं, हल्लीची मुलं यातच अडकलेली आहेत. सुजाण पालकांची ही जबाबदारी आहे की, हा स्क्रीन टाइम कमी करून मुलांना अर्थपूर्ण खेळांकडे वळवण्याची. ती तुम्ही कशी पार पाडता यावर नकळतपणे आपल्याच मुलांचं भावविश्व अवलंबून असणार आहे!