आराधना जोशी

मागच्या लेखामध्ये आपण शाळेत न जाणाऱ्या वयाच्या मुलांचा गृहपाठ नेमका कसा असतो आणि तो त्यांच्यासाठी का महत्त्वाचा ठरू शकतो, याबद्दल माहिती घेतली. आजच्या लेखात शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी गृहपाठ आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे विचारात घेणार आहोत.

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Self Awareness and Self Acceptance are very important steps to succeed in any interview
पहिले पाऊल: मुलाखतीला सामोरे जाताना
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी

हल्ली अनेक आई-वडिलांची तक्रार असते की, आम्ही सोबत बसल्याशिवाय मूल होमवर्क करतच नाही. त्याच्याकडून होमवर्क करून घेणं, हे पेशन्सचं काम आहे. मध्यंतरी होमवर्क करून घेण्यासाठी कोचिंग क्लास सुरू झाले आहेत, अशीही बातमी वाचनात आली होती. मुळात होमवर्क न करणं किंवा त्याचा कंटाळा करणं याचं मुख्य कारण म्हणजे तो विषयच मुलाला समजलेला नसणं. त्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतोय, हे मान्य करण्याऐवजी, पालकांचा ओरडा बसू नये म्हणून अनेकदा मूल होमवर्क टाळण्याचा प्रयत्न करत असतं. याच्या जोडीला आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे मुलांना येणारा थकवा.

हेही वाचा >> आई-वडिलांचा स्वभाव, हावभाव अन् बोलणं न्याहाळत असतं तान्ह बाळ; पालक म्हणून वावरताना ‘ही’ काळजी घ्याच!

अनेकदा आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेच्या जोडीला इतर ॲक्टिव्हिटीजचे क्लासेस लावले जातात. शाळा, इतर क्लासेस यामुळे थकलेलं मूल अर्थातच होमवर्क करण्याच्या शारीरिक आणि मानसिक परिस्थितीत नसते. मात्र पालक जबरदस्तीने हा होमवर्क करून घेत असतील तर, मरगळलेल्या मुलाच्या मनात त्याबद्दल तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाच्या किरकोळ आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.

पालक म्हणून आपल्या मुलांनी वेळेत होमवर्क करावा असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे मुलांना त्यात मदत करण्याऐवजी अनेकदा पालकच त्यांचा होमवर्क पूर्ण करतात. अनेकदा होमवर्क करताना आणि करवून घेताना मुलांचं रडणं, पालकांचं ओरडणं या गोष्टी बघायला मिळतात. अपूर्ण होमवर्कमुळे शाळेत होणाऱ्या शिक्षेला घाबरून ते पूर्ण करण्याचा अट्टसास केला जातो. याऐवजी जर पुढील मुद्दे विचारात घेतले गेले तर, होमवर्क करणं अधिक सुसह्य होऊ शकतं.

हेही वाचा >> मुलांसाठी आवडीने खेळणी घेताना पालक म्हणून ‘हा’ विचार करता का?

या सोप्या ट्रीक्स वापरता येतील

1) शिक्षा होते म्हणून होमवर्क करायचा यापेक्षा त्यातून आपला अभ्यास होतो, हे मुलांना पटवून दिलं तर, अनेकदा मुलं स्वतः तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

2) अभ्यासाची योग्य वेळ ठरवा. मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांनी लगेच होमवर्क पूर्ण करावा अशी जर पालकांची अपेक्षा असेल तर, ती बदलण्याचा पालकांनी प्रयत्न करावा. ऑफिसमधून आल्यानंतर काही काळ शांतपणे बसणं किंवा विश्रांती घेणं, जसं पालकांसाठी गरजेचं असतं तसंच, ते मुलांसाठीही आवश्यक असतं. योग्य खाणं आणि विश्रांती झाल्यानंतरच अभ्यासाला मुलं बसली तर, उत्साहाने ती होमवर्क पूर्ण करतील. 

3) खेळण्यातून शिकवणं शक्य असेल तर, तसं करा. लहान मुलांना रंग शिकवताना किचनमधल्या वस्तू किंवा त्यांची खेळणी वापरता येतील. बेरीज वजाबाकी शिकायला घरातल्या वस्तू उपयोगात आणता येतात.

४) कोविड काळात ऑनलाइन शिक्षण पद्धतीत व्हिडीओज, लर्निंग ॲप खूपच फायदेशीर ठरली होती. आताही एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी अशा व्हिडिओज् किंवा ॲपची मदत फायदेशीर ठरेल. शाळेतल्या साचेबद्ध व्यवस्थेपेक्षा थोडीशी वेगळी व्यवस्था मुलांचा इंटरेस्ट वाढवू शकते.

५) कोणतीही व्यक्ती सलग २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे मुलांकडून होमवर्क करवून घेताना त्यांना थोड्या थोड्या वेळाने छोटे ब्रेक देत जा.

हेही वाचा >> बाळासाठी पाळणाघराची निवड कशी करावी? ‘या’ गोष्टी ध्यानात ठेवाच!

6) अभ्यासाची जागा नक्की करा आणि शक्य असेल तर टेबल खुर्चीची व्यवस्था करा. कसंतरी बसून, आडवं होऊन होमवर्क केला जात असेल तर, अनेकदा आळसच येतो. 

7) अभ्यासासाठी आवश्यक गोष्टी जर मुलांच्या आवडीच्या असतील (कार्टून असलेली टेबल खुर्ची, आवडीच्या रंगाची पेन्सिल, पेन) तर मुलं आनंदाने होमवर्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

8) लहान वयातच जर मुलांना रोजच्या रोज होमवर्क पूर्ण करण्याची सवय लावली तर वरच्या इयत्तेत गेल्यावर त्याचं दडपण मुलांना वाटणार नाही.

9) शाळेतला प्रत्येकच विषय मुलांना आवडू शकत नाही. जो विषय नावडता आहे त्याबद्दल मुलांशीच चर्चा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. यासंदर्भात मुलांची मतं विचारात घ्या. ‘त्यांना काय कळतं? पालक म्हणून आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे,’ असं म्हणून क्लासेसना पाठवणं योग्य आहे का? याचा पालकांनी शांतपणे विचार करावा

10) संयम आणि शांतता हे गुण पालकांनी जोपासणं आवश्यक आहे. होमवर्क करवून घेताना पालकांचीच चिडचिड होत असेल तर, मूल अभ्यासाकडे हवं तसं लक्ष केंद्रित करू शकणार नाही किंवा आपल्याला काहीच येत नाही, हा न्यूनगंड त्याच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्यात पालक जर तुलना करणारे असतील तर, त्याचाही नकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होतो आणि अभ्यास, शाळा, परीक्षा, मार्कस् यांच्याबद्दल चीड निर्माण होऊ शकते.

गेल्या काही वर्षांपासून मुलांना होमवर्क देणे बंद होणार, सरकार तसा अध्यादेश काढणार अशा अनेक चर्चा वारंवार आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. होमवर्क म्हणजे शाळेत शिकवल्या गेलेल्या अभ्यासाची उजळणी. हा होमवर्क जर बंद झाला तर काय? याची छोटीशी झलक आपण कोरोना काळात अनुभवलेली आहे. पायाच कच्चा राहिला आहे, अभ्यासातल्या संकल्पना आपल्याला समजूनच घेता आल्या नाहीत, हे होमवर्कमुळे मुलांना आणि पालकांच्या लक्षात येईल. त्यामुळे होमवर्क हवाच, मात्र त्याचं स्वरूप मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारं असेल तर, ते करायला आणि करवून घ्यायला मुलं आणि पालक दोघांनाही नक्कीच आवडेल. 

उत्तरार्ध

Story img Loader