उन्हाळा सुरु झाला की घाम येण्याचं प्रमाण वाढतं आणि घामामुळे घामोळंही येतंच. ज्यांना घाम येण्याचं प्रमाण जास्त आहे त्यांना तर उन्हाळा अगदी नकोसा वाटतो. अतिघामामुळे त्वचेवर पुरळ येतं. हे पुरळ लाल रंगाचं असतं. आणि त्यामुळे खाज येते. अर्थातच त्यामुळे खूप अस्वस्थ वाटतं. सहसा घामोळं मानेवर आणि पाठीच्या वरच्या भागात जास्त होतं. पण काहीजणांना मात्र घामोळ्याचा त्रास वाढतो. मग पाठीवर, गळ्यावर, कमरेच्या खाली आणि काहीवेळेस तर कपाळावरही घामोळं येतं. उन्हामध्ये बाहेर फिरणाऱ्यांना तर हा त्रास जास्तच जाणवतो. सलवार-कुर्ता, साडी किंवा ऑफिस फॉर्मल्स कोणतेही कपडे घातले तरी घामोळ्याचा त्रास होत असेल तर अस्वस्थ वाटत राहतं. लग्नसमारंभ किंवा कार्यक्रमांना जाण्याचं जीवावर येतं.

आणखी वाचा : आहारवेद – गर्भवतींसाठी आणि हाडांसाठी उपयुक्त करवंद

modi dont have time for Manipur marathi news
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद
Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

घामोळ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या प्रिकली हिट पावडर मिळतात. त्यानं थोडाफार आराम मिळतो. पण काहीजणांना त्या पावडरची अॅलर्जी असू शकते. काहीवेळेस अतिप्रमाणात घामोळं असेल तर संपूर्ण शरीर लाल रंगाचं होतं, घामोळं आलेल्या जागेवर आगआग होते. अशावेळेस बाजारात मिळणाऱ्या प्रिकलीहिट पावडरमुळे काहीजणांचे स्किन पोर्स किंवा ब्लॉक होतात. पण घामोळे झाल्याचं लवकर लक्षात आलं तर त्यावर काही घरगुती उपायही करता येतात, त्यामुळे घामोळ्यापासून लवकर सुटका होते.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग: तेलाच्या डब्यांचा असाही वापर

चंदन पावडर
चंदन पावडर हा आपला पारंपरिक हमखास उपाय आहे. चंदन थंडावा देते. घामोळे अगदी मुळापासून नष्ट करण्यामध्ये चंदन उपयुक्त आहे. त्वचेला थंडावा देण्याबरोबरच त्वचेची आग होणे आणि खाजही चंदनामुळे कमी होते. दोन चमचे चंदन पावडरमध्ये ४ ते ५ चमचे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. घामोळे झालेल्या जागेवर ही पेस्ट लावा. १० ते १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने ते धुऊन टाका. आठवड्य़ातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्यास चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे चंदन पावडर आणि धणे पावडर समप्रमाणात घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा. हा लेप घामोळ्यांवर लावा.
मुलतानी माती
मुलतानी मातीमध्ये अँटीमायक्रोबियल्स गुणधर्म असतात. त्यामुळे फंगस, बुरशी, बॅक्टेरिया किंवा जंतूसंसर्ग रोखला जातो. तसंच मुलतानी माती त्वचेला थंडावाही देते. मुलतानी मातीचा लेप लावल्यास उष्णतेमुळे उठलेलं पुरळ कमी होतं. एक चमचा मुलतानी मातीमध्ये थोडंसं पाणी घाला आणि पेस्ट तयार करुन घामोळे आलेल्या जागेवर लावा. जेव्हा हा लेप सुकेल तेव्हा थंड पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून चार वेळा हा उपाय केल्यास घामोळे नक्की कमी होतात.

आणखी वाचा :

आणखी वाचा : विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

कोरफड
कोरफडीला गुणांचा खजिना असं म्हटलं जातं, ते काही उगाचच नाही.घामोळे आलेल्या जागी कोरफड लावल्याने आराम मिळतो. किंवा घामोळे झालेल्या जागेवर दोन चमचे एलोव्हेरा जेल लावा. अर्धा तास तसंच राहू द्या. अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुऊन टाका. यामुळे बराच थंडावा मिळतो.
कच्ची कैरी
घामोळ्यांवरचा हा हमखास उपाय आहे. अनेक घरांमध्ये आजीच्या बटव्यातला हा उपाय केला जातो. उन्हाळा म्हणजे कैरीचा हंगाम. कच्ची कैरी गॅसवर ठेवून भाजून घ्या. त्याचा गर काढून तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंड झाल्यावर हा गर शरीरावर लावा. काहीवेळाने धुऊन टाका. या उपायाने घामोळ्यांपासून आराम मिळतो आणि शरीरातील उष्णताही कमी होते.
दही
दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जंतुसंसर्गापासून सुटका होते. एका बाऊलमध्ये दही चांगल्या तऱ्हेनं फेटून घ्या आणि या पेस्टला घामोळे झालेल्या जागेवर लावा. १५ ते २० मिनिटांनंतर धुऊन टाका. दररोज दिवसातून एकदा हा लेप लावू शकता.
काकडी
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने थंडावा मिळतो. तसंच काकडीमुळे घामोळ्याचा त्रासही कमी होतो. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस घाला आणि त्यात काकडीचे पातळ तुकडे कापून टाका. घामोळे झालेल्या जागेवर हलक्या हाताने रगडून चोळा आणि तसेच राहू द्या. काहीवेळानंतर धुऊन टाका.
कडुनिंब
कडुलिंब बहुगुणी, औषधी आहे. कडुलिंबाची पानं एक लीटर पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने रोज अंघोळ केल्यास घामोळ्यांचा त्रास कमी होतो. त्याशिवाय कडुलिंबाची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट घामोळे झालेल्या जागेवर लावा. काहीवेळ तशीच राहू द्या. १५ मिनिटांनंतर गार पाण्याने स्वच्छ धुऊन टाका.आठवड्यातून दोनदा तुम्ही ही पेस्ट लावू शकता.
तुळस
तुळशीचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत आहेत. तुळस नैसर्गिक जंतूनाशक आहे. त्यामुळे घामोळ्यावर तुळशीची पावडर किंवा तुळशीच्या पानांच्या लेपाचाही उपयोग होतो. तुळशीचं लाकूड बारीक करून त्याचं चूर्ण करा आणि घामोळ्यांवर त्याचा लेप लावा, यामुळे खूप बरं वाटेल.
बर्फ
उन्हाळ्यात एकवेळ बर्फ जास्त खाल्ल्याने तुमच्या घशाला त्रास होऊ शकेल. पण घामोळ्यांसाठी मात्र बर्फ चांगला उपाय आहे. एका कॉटनच्या कापडात बर्फाचे तुकडे घ्या आणि घामोळ्याच्या जागी लावा. यामुळे थंडावा मिळतो.
हे उपाय घरगुती आहेत.पण घामोळ्यांचा त्रास खूपच वाढला असेल तर वेळेवरच डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या.