मागील लेखात आपण काचपात्रातील बागेची प्राथमिक माहिती घेतली. या लेखात आपण यासाठी लागणारी माती कशी तयार करायची ते पाहू.

एकदा टेरारियम करायचे ठरले की त्यासाठी माती योग्य पद्धतीने तयार करणं आलंच. वेगवेगळ्या प्रकारच्या टेरारिअम साठी वेगवेगळी माती लागते. आपण सर्वसाधारण पणे आपल्या बागेतील झाडांचा वापर करून जर एखादं टेरारीयम करणार असू तर त्याची म्हणजे सिंपल टेरारिअमची माती कशी तयार करायची याविषयी…

Odisha Forest Department started efforts to bring back Zeenat tigress that entered forests of Jharkhand
‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय

मुळात काच पात्रात तयार होणारी ही बाग म्हणजे खऱ्याखुऱ्या बागेची प्रतीकृतीच असते, पण ही कृत्रिमरित्या तयार केलेली असल्याने तिची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. एअरपोर्टवर आपण नेहमी अतिशय तजेलदार, हिरवीगार झाडं पाहतो. त्यात सक्युंलंटस्, इनडोअर, आऊटडोअर प्लांटस्, ऑर्किड, फुलांची इतर झाडे असे सगळे प्रकार असतात. त्यांना पाहूनच फार प्रसन्न वाटतं. मलेशियातील एअरपोर्टवर असलेली ऑर्किड, बंगलोर विमानतळावरची फर्नस् मुंबई एअरपोर्टवरील इनडोअर प्लांट ही त्यांची काही उदाहरणं. बंदिस्त वातावरणात२४ तास एसीमध्ये वाढणारी ही झाडं पाहून आपल्याला फार आश्चर्य वाटतं. ही टिकवून कशी ठेवत असतील? असा प्रश्न सहाजिकच पडतो. त्याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे अतिदक्षता. नियमितपणे प्रत्येक पान हातात धरून हलक्या ओल्या कपड्याने पुसून त्यांची काळजी घेतली जाते. काही दिवसांच्या अंतराने हलक्या खोबरेल तेलाचा वापर करून त्यांना चमकदार ही बनवले जाते. अर्थात वारंवार खोबरेल तेलाचा वापर करणे रोपांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. याशिवाय ही रोपे छोट्या, हलक्या कुंड्यांमध्ये लावलेली असतात. जेणेकरून ती खराब झाल्यास सहज बदलता यावीत. या रोपांसाठी कोकोपीट आणि बारीक वाळू तसेच अगदी थोडी माती वापरली जाते. आठ एक दिवसांनी यांची जागा बदलून रचनेत विविधता साधली जाते. आळीपाळीने त्यांना ऊन मिळेल अशा जागी ती ठेवली जातात. यामुळे कालांतराने रोपं परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात व सुखेनैव वाढत राहतात. इतकी बारकाईने काळजी घेतल्यामुळेच आपण कधीही पाहिली तरी एअरपोर्टवरील झाडं आपल्याला अत्यंत तजेलदार दिसतात.

हेही वाचा : मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

नेमक्या याच सगळ्या गोष्टींचा वापर आपण हंडीतील बाग तयार करताना करणार आहोत. अर्थात आपल्याला एअरपोर्टवरील झाडांसाठी घेतल्या जाणाऱ्या कष्टांइतके कष्ट काही घ्यावे लागणार नाहीत. कारण तुलनेने आपल्या काच पात्रातील रोपं संख्येने अगदीच थोडी असणार आहेत. एकदा टेरारियम करायचे ठरले की त्यासाठी माती योग्य पद्धतीने तयार करणं आलंच. वेगवेगळ्या प्रकारच्या टेरारिअम साठी वेगवेगळी माती लागते. आपण सर्वसाधारण पणे आपल्या बागेतील झाडांचा वापर करून जर एखादं टेरारीयम करणार असू तर त्याची म्हणजे सिंपल टेरारिअमची माती कशी तयार करायची ते पाहू.

प्रथम थोडे बारीक आकाराचे दगड मिळवावेत. छोटे रंगीत, पांढरे, काळे दगड फिशरीच्या दुकानातही मिळतात. यानंतर हवी बारीक वाळू. आता थोडं कोकोपीट घ्यायचं, थोडं गांडूळ खत, घरचं कंपोस्ट असेल तर ते वापरता येईल, नाहीतर वाळलेला पालापाचोळा चुरून घ्यायचा, थोड्या वाळलेल्या बारीक काड्या किंवा झाडांची वाळलेली साल ही बारीक करून वापरली तरी चालेल. या काड्या आणि झाडांची साल ही खता सारखं काम करतात.यांच्या विघटनाची प्रक्रिया अतिशय मंद गतीने होत असल्याने बरेच दिवस रोपांना खत मिळत रहाते.

हेही वाचा : Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान दोन दिवसांची सुट्टी देण्याचे मविआचे आश्वासन; संसद ते स्मृती इराणींपर्यंत या विषयाशी निगडित कोणते वाद झाले?

यासोबतच एक छोटा जाळीचा तुकडा घ्यायचा. बाऊल, बरणी जे काही आपण वापरणार असू त्यांच्या तळाच्या आकाराएवढा हा जाळीचा तुकडा हवा. ही जाळी बारीक हवी. डास येऊ नयेत म्हणून वापरतो तशी प्लास्टिकची जाळी चालेल. ती नसेल मिळत तर पातळ प्लास्टीक घेऊन त्याला छोटी भोकं पाडून त्याचाही वापर करता येतो. कोळशाचे बारीक तुकडे किंवा चुराही आपल्याला लागणार आहे. तो थोडा हवा. बागेतली थोडीशी माती घ्यावी. आता हे सगळे घटक वापरून आपण एक साधं टेरारियम बनवणार आहोत. पण हे सगळे घटक आपल्याला एकत्र करायचे नाहीत तर यांचे थर देत रचना करायची आहे. या सगळ्या गोष्टी आपण अगदी सविस्तर जाणून घेणारच आहोत, पण पुढील लेखात.
mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader