आराधना जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन बाळाचं होणारं आगमन ही घरातल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी असते. पण दुसऱ्यांदा पालक होणाऱ्यांसाठी मात्र ती काहीशी काळजीची गोष्ट ठरते. अनेकदा मोठ्या मुलांमध्ये धाकट्या भावंडांविषयी काहीसा कडवटपणा, शत्रूत्वाची भावना किंवा मत्सर, असूया बघायला मिळते. त्यामुळे आपलं मोठं मूल या नवीन बाळाला कसं स्वीकारेल? त्याच्या मनात असूया किंवा मत्सर निर्माण झाला तर? ही चिंता या पालकांना सतावत राहते.
नवीन बाळाच्या आगमनानंतर मोठा भाऊ किंवा बहीण यांची वर्तणूक बदलायला लागते. समजूतदार असणारी ही मुलं अचानक हट्टी बनतात, त्यांची चिडचिड वाढते, घरातल्या इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्या नादात आदळआपट करणं, भोकाड पसरून रडणं यासारख्या गोष्टी वाढत जातात. काहीवेळेला नवीन बाळाला काहीतरी इजा करण्यापर्यंतही मोठ्या भावंडांची मजल जाते. पालकांनाही यातून कसा मार्ग काढायचा हे समजत नाही. अशावेळी या भावंडांना शिक्षा करणं, ओरडणं, त्यांच्याशी अबोला धरणं असे प्रकार पालकांकडून होतात आणि नकळतपणे पालकच धाकट्या भावंडांबद्दल मुलांच्या मनात अजून नकारात्मक भावना निर्माण करण्यात हातभार लावतात.
हेही वाचा >> “बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!
मोठ्या भावंडांमध्ये असे बदल का होतात?
नवीन बाळाच्या आगमनानंतर अचानकपणे पालक मोठ्या भावंडांकडून समजूतदारपणाची अपेक्षा करायला लागतात. त्यांनी जबाबदारीने वागावं असं धरून चालतात. मोठ्या भावंडांच्या मनात मात्र या सगळ्या वातावरणामुळे प्रचंड गोंधळ निर्माण व्हायला लागतो. कालपर्यंत आपल्या अवतीभवती नाचणारी मोठी माणसं अचानक आपल्याकडे का दुर्लक्ष करायला लागली? आपली कामं आपण करावी, आईला फार त्रास देऊ नये अशा सूचना सतत का केल्या जातात? खेळताना फार आवाज का करायचा नाही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मोठ्या भावंडांसारखं वागायचं आणि तरीही पालकांकडून अजून तू लहान आहेस असंही ऐकून घ्यायचं यासगळ्या गोष्टी समजून घेणं, त्याचा स्वीकार करणं त्या बालमनाला वाटते तितकी सोपी गोष्ट नसते. कालपर्यंत आपल्या अवतीभवती फिरणारी आई अचानकपणे बाळाला का महत्त्व देते याचं कोडं त्यांना उलगडत नाही. सतत झोपणारं किंवा भुकेल्या वेळी रडणारं एवढंच ते बाळ घरातल्या सगळ्यांच्या कौतुकाचा किंवा काळजीचा विषय का बनले? या प्रश्नाचं उत्तर मोठ्या भावंडांना मिळत नाही. कालपर्यंत सगळ्या घरचे लाडके असणारे आपण अचानक दोडके कसे झालो हा विचार मोठ्या भावंडांच्या डोक्यात ठाण मांडून बसतो. यातूनच लहान भावंडांबद्दलचा मत्सर किंवा शत्रुत्वाची भावना जोर धरू लागते. वेळीच ही गोष्ट पालकांच्या लक्षात आली नाही तर पुढे जाऊन त्याचे नकारात्मक परिणाम पूर्ण कुटुंबावर होताना दिसतात.
हेही वाचा >> मुलांच्या हट्टीपणाला पालकच जबाबदार? पालकत्व सुसह्य होण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!
हे सगळं टाळायचं असेल तर पालकांनी पुढील गोष्टी आवर्जून कराव्यात –
- बाळाच्या आगमनापूर्वी मोठ्या भावंडांची मानसिक तयारी करा – आपल्याला बाळ होणार आहे याची खात्री झाल्यापासून मोठ्या मुलांना त्याची कल्पना द्यावी. नवीन बाळ कसं दिसेल, सुरुवातीचे काही महिने ते कसं वागेल याबद्दल मुलांशी चर्चा करा. मोठ्या मुलांना त्यांच्या लहानपणीचे फोटो दाखवून ते असे दिसायचे किंवा कसे वागायचे याची जाणीव करून द्या. म्हणजे बाळ सुरुवातीला कसं वागेल याची कल्पना त्यांना येईल. याशिवाय बाळाचं नाव काय ठेवायचं, त्यांच्यासाठी खेळणी कोणती आणायची, त्यांच्या येण्याची इतर तयारी कशी करायची याबद्दल त्यांच्याशी बोला, त्यांचे विचार समजून घ्या. या सगळ्यात त्यांना सहभागी करून घेतल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होईल ही भीती कमी होईल.
- बाळाच्या आगमननंतर मोठ्या मुलांना पुरेसा वेळ द्या – बाळाच्या आगमनानंतरही मोठ्या भावंडांसाठी पालकांनी पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. आईशी असणारं भावनिक नातं मोठ्या भावंडांसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आईने आपलं मोठं मूल एकटं पडणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शाळेची चौकशी करणं, रोज काय विशेष घडलं याबद्दल चर्चा करणं किंवा बाळाशी संबंधित कामामध्ये मोठ्यांना सहभागी करून घेणं अशा गोष्टी आवर्जून कराव्यात. यामुळे मोठ्यांच्या मनात आपोआपच प्रेम, आदर निर्माण होतो.
- पालकांनी बाळ आणि मोठी भावंडं यांच्यातील दुवा बनावं – बाळाला कोणत्या वेळी कशाची गरज आहे हे पालकांना जसं समजतं तसं मोठ्या भावंडांना नाही समजत. अशा वेळी मोठ्या मुलांना मदतीला घेऊन बाळाला आंघोळ घालणं, पावडर लावणं, कपडे कोणते घालायचे याबद्दल त्यांचं मत विचारात घेणं, बाळाबरोबर खेळणं अशा अनेक गोष्टींमध्ये मोठ्या भावंडांना मदतीला घेतलं तर त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते, बाळाबरोबरचं त्यांचं बॉन्डिंग वाढतं आणि मत्सराची भावना नष्ट होते.
- बाळासोबत कसं वागायचं याची स्पष्टता मोठ्या भावंडांना द्या – बाळासोबत कसे वागायचे याची स्पष्ट कल्पना मोठ्या मुलांना आधीच द्यावी. त्या नियमांचं त्यांनी पालन केलं तर त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं, कधीतरी छोटसं बक्षीस द्यावं. त्यांच्या अशा वागण्यामुळे बाळ कसं खूष आहे हे मोठ्या मुलांना सांगावं.
- गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्या – अनेक उपाय करूनही मोठ्या भावंडांच्या मनात कळत नकळत बाळाबद्दल मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. त्यावर वेळीच उपाययोजना केली तर गोष्टी आटोक्यात येतात. पण जर गोष्टी हाताबाहेर जात असतील तर बालमानसरोग तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सल्लागार यांची मदत नक्कीच घेता येते.
या उपायांमुळे भावंडांमध्ये सकारात्मक आणि निरोगी, निकोप नातं नक्कीच निर्माण व्हायला मदत होईल. सुजाण पालकत्वासाठी याचाही विचार नक्कीच केला जावा!