Women’s Day 2024 Special :: महिला दिन हा स्त्री शक्तीचा आदर आणि सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. महिलांचे हक्क आणि अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महिला आज पुरुषांच्या बरोबरीने जवळपास प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. एक काळ असा होता, जेव्हा महिलांना नेहमी चूल आणि मूल या कर्तव्यामध्ये बांधून ठेवले जात असे; पण आता काळ बदलला आहे. महिला नोकरी करत आहे, विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहे. अनेक महिला उद्योजक म्हणून यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत. स्वयंपाकघरापुरती मर्यादित असलेली महिलांची ओळख आज उद्योजिका म्हणून बदलत आहे. अनेक महिला उद्योजिका अशा आहेत, ज्यांनी आपल्या स्वयंपाकघरातून सुरू केलेला व्यवसाय आज यशस्वी करून दाखवला आहे. महिलादिनानिमित्त आज आपण अशाच महिलांबाबत जाणून घेणार आहोत.

पाटील काकी (Patil Kaki)

२०१६ मध्ये गीता पाटील यांच्या पतीने नोकरी गमावली. त्यानंतर आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणि गोड पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या कलागुणांना त्यांनी संधी म्हणून पाहिले. पाटील काकींनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. गीता यांनी कमीत कमी गुंतवणुकीत तयार होणारे मोदक, पुरणपोळी, चकली, पोहे, चिवडा असे नाश्त्याचे पदार्थ विकायला सुरुवात केली. घरगुती चवीमुळे अल्पावधीमध्येच त्यांचे खाद्यपदार्थ लोकप्रिय झाले. कालांतराने त्यांचा व्यवसाय वाढला. साथीच्या रोगामुळे २०२० मध्ये Ptilkaki.com या ऑनलाइन वेबसाइटद्वारे व्यवसाय सुरू झाला. त्या वार्षिक ३,००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवितात, ज्यामुळे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल त्यांना मिळतो. आज त्यांच्या कंपनीमध्ये जवळपास २५ लोक काम करत आहेत. स्वयंपाकघरातून सुरू झालेला व्यवसायापर्यंतचा पाटील काकींचा हा प्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड
Children, illegal marriage, birth registration,
अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही जन्मनोंदणीचा हक्क
secrecy in marriage
वैवाहिक नात्यातही गोपनीयता महत्त्वाची!
nisargalipi pot gardening
निसर्गलिपी : हंडीतली बाग
Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ
guests at home, diwali celebration, tips
दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…
no alt text set
स्त्री आरोग्य : लघवीच्या ठिकाणी खाजतंय? दुर्लक्ष करू नका 
physical presence of couple not insist in mutual consent divorce madras high court
सहमतीने घटस्फोटाकरता प्रत्यक्ष हजेरी आवश्यक नाही
Nisargalipi, Indoor-outdoor tree design, tree,
निसर्गलिपी : इनडोअर – आऊटडोअर झाडांची रचना

कोकणराज (Kokanraj)


पुण्यातील महिला उद्योजिका ललिता खैरे यांनी त्यांच्या घरी बनवलेले कोकम सरबत विकण्यासाठी ‘कोकणराज’ नावाचा बँड सुरू केला आहे. पण, त्यांचा उद्योजिका म्हणून प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांना अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले. स्वतःचा व्यवसाय चालवण्याच्या इच्छेमुळे नातेवाईकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. आपल्या व्यवसायासाठी त्यांना स्वत:चे घरही विकावे लागले. नोकरीला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना उद्योजक होण्याची तिची इच्छा पटवून देणे हे ललिता यांच्यासाठी एक कठीण काम होते. आज तिची वार्षिक कमाई अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ललिता (वय ५०) यांनी सुमारे दोन दशकांपूर्वी कोकम सरबत बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. करोना काळात जवळपास तीन वर्षांपासून त्या तोट्यामध्ये व्यवसाय चालवत होत्या. ललिता यांनी लग्नानंतर सुमारे दोन वर्षांनी १९९२ मध्ये कोकणराज उद्योजकीय उपक्रम सुरू केला. १९९५ मध्ये, ललिता आणि संजय यांनी कोकम सरबत तयार करण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीचे नाव कोकणराज ठेवले. व्यवसायात वाढ होण्यास सुमारे चार वर्षे लागली. गेल्या काही वर्षांत या जोडप्याने भारतभर वितरकांचे मजबूत नेटवर्क तयार केले आहे. त्यांच्या काही वितरकांमध्ये बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश, डी-मार्ट, बिग बाजार, दोराबजी आणि स्टार बाजार यांचा समावेश आहे. त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी नवी उमेद देणारा आहे.

किप गुड शेप (Keep Good Shape)

गेल्या १५ वर्षांपासून रिअल इस्टेट कंपनीत काम करणाऱ्या मेघना बाफना यांना त्यांच्या सॅलेड स्किल्सबद्दल पूर्ण खात्री होती, म्हणून त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन मेसेजिंग ग्रुप्सद्वारे त्यांनी सॅलेड्सची विक्री करण्यास सुरुवात केली. मेघनाचा हा छंद आणि अर्धवेळ काम तिला दरमहा लाखोंची कमाई करण्यास मदत करते. त्यांनी चना चाट, मिक्स कॉर्न, बीटरूट आणि पास्ता सॅलेड विकण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यांना ऑर्डर येऊ लागल्या. करोना काळामध्ये तिला व्यवसायामध्ये अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. २०१७ मध्ये ३५०० रुपये गुंतवून सुरू केलेल्या ‘किप गुड शेप’ या सॅलेड व्यवसायातून ती दरमहा १,५०,००० रुपये कमवते. त्यांनी सात गरजू महिलांनाही रोजगार दिला आहे. मेघनाने गेल्या काही वर्षात अनेक आव्हानांचा सामना केला, पण कोणतीही अडचण तिला यशस्वी होण्यापासून रोखू शकले नाही

पूर्णब्रह्म (Purnabraham)

नागपूरची कन्या जयंती कठाळे यांना एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखले जाते. जेव्हा कामानिमित्त त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये जावे लागते तेव्हा त्यांना घरगुती जेवण खाण्याची इच्छा होत होती. त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या रेस्टॉरटंचा शोध घेतल्यानंतर तिथे काही पर्याय उपलब्ध नव्हते. तिथे राहणाऱ्या काही भारतीय कुटुंबाकडेच घरगुती जेवण मिळत होते. त्यानंतर जेव्हा त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ तयार करण्याचा आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या जयंती यांनी आपली इन्फोसिसमधील नोकरी सोडली आणि मोदक विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. आज त्या ‘पूर्णब्रह्म’ची संस्थापक आहेत, जे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे ११ रेस्टॉरंट आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ७० टक्के महिला आहेत. पूर्णब्रह्म खऱ्या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची मूळ चव देण्यासाठी ओळखले जाते. मसालेदार मिसळ पावपासून ते साबुदाणा वडा, श्रीखंड पुरी आणि पुरण पोळीपर्यंत सर्व खाद्यपदार्थ येथे मिळतात. आपले पहिले आउटलेट उघडण्यासाठी त्यांना पाच वर्षांचे संशोधन आणि प्रयोग करावे लागले. आता जगभरात ५,००० रेस्टॉरंट्स स्थापन करण्याचे स्वप्न त्या पाहात आहेत. जयंती कठाळे यांचा हा यशस्वी उद्योजिकेचा प्रवास नक्कीच अनेक महिलांना नवीन स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देत आहे.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या महिला उद्योजिकांच्या यशोगाथा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.