डॉ. स्मिता प्रकाश जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“सोनल, माझ्याशी काहीच बोलत नाही. घरी आल्यापासून ती तिच्याच विचारात असते, मुलांकडेही तिचं लक्ष नसतं. तिला नक्की काय हवंय मलाच कळत नाही.” अभय मला सांगत होता.
न्यायालयात घटस्फोटाची केस प्रलंबित ठेवून अभय आणि सोनल एकत्र राहायला लागले होते, पण सोनल अजूनही गोंधळलेली होती. ती खूश दिसत नव्हती.
“सोनल, तू न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी केस दाखल केलेली असलीस तरी तुला मनापासून हे नातं तोडायचं नव्हतं, संसार वाचवण्याची तुझीही इच्छा होतीच म्हणूनच मी अभयला काही गोष्टींची समज दिली आणि समुपदेशनानंतर त्यानं त्याच्या चुकांची कबुली दिली आणि मागील सर्व गोष्टी विसरून पुन्हा तुम्ही एकत्र राहण्यासाठी गेलात, मग आता तुला हे नातं निभावणं अवघड का वाटतंय?”
आणखी वाचा : करिअर- घर बॅलन्स : स्वतःशी असलेलं नातंच महत्त्वाचं
“मी खूप विसरण्याचा प्रयत्न करते आहे मॅडम, पण तो जवळ आला की मला सगळं आठवतं. त्या फेसबुक फेसबुक फ्रेण्डबरोबरचे त्याचे संवाद, त्यांचे चॅट माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागतात. एका फेसबुक फ्रेण्ड साठी तो आमचे पतीपत्नीचे नाते विसरला? त्याच्यासोबत मी कशी राहू? मी त्याला कसे स्वीकारू? मी त्याच्याशी काही बोलतच नाही. कधी कधी वाटतं, सगळं सोडून कुठे तरी दूर निघून जावं, नाही तर स्वतःच्या जिवाचं काही तरी करून घ्यावं म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील. त्याला जे करायचे आहे ते करू देत, पण मग मुलांचा विचार येतो आणि मी पुन्हा शांत होते. मी काय करू?”
“सोनल, अगं, तुझ्या मनाची ही तडफड थांबवण्यासाठी तू त्याच्याशी बोलायला हवं, त्याची चूक झाली आहेच. ‘फेसबुक’वरची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारताना नीट विचार करायला हवा, हे त्या वेळी त्याला सुचलं नाही. तो वाहावत गेला. त्या मुलीच्या सांगण्याला बळी पडत गेला आणि त्याच्यात अडकला, हे त्यानं अनेक वेळा मान्य केलं आहे; पण तेच तेच आठवून तू स्वतःला किती त्रास करून घेशील?”
“मॅडम, मूल होण्यासाठी मी किती उपचार करून घेतले, मूल होत नाही म्हणून घरातल्यांचं, समाजाचं ऐकून घेतलं, किती यातना सहन केल्या. आता उपचारानंतर जुळी मुलं झाली. आई झाल्याचा खूप आनंद झाला. आता आपल्या आयुष्यात केवळ आनंदच आहे असे वाटत असताना माझा नवराच माझ्यापासून दूर गेल्याचं सत्य माझ्यासमोर आलं, माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षणच नाहीत का? माझं नशीबच फुटकं आहे का?” म्हणताना सोनलला रडू फुटलं.
सोनलला जुळं होणार हे समजल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईनं तिला माहेरी नेलं होतं. अभयच्या आईचं दोन वर्षांपूर्वी करोनानं निधन झालं होतं. त्यानंतर त्याचे वडील शक्यतो त्याच्या बहिणीकडे जास्त राहायचे, त्यामुळे अभयनंही सोनलला माहेरी राहण्यास सांगितलं. गरोदरपण आणि बाळंतपण असे सोनल जवळजवळ १० महिन्यांपेक्षा जास्त काळ माहेरी राहिली. त्याच कालावधीत अभयची एका मुलीशी ‘फेसबुक’वर मैत्री झाली. ते दोघेही प्रत्यक्ष भेटले नाहीत; पण त्यांचं ‘एफबी’ आणि ‘व्हाॅट्सॲप’ वर चॅटिंग सुरू झाले, ते वाढत गेले आणि त्यांच्यात virtual relationship (आभासी संबंध) निर्माण झाले. दोघेही रोज virtual sex talk करत होते, एकमेकांना हवे तसे फोटो शेअर करीत होते.
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : प्राजक्ता माळी म्हणते, “‘तू फक्त लढ’ म्हणणारा आश्वासक मेन्टॉर महत्त्वाचा”
सोनल जेव्हा दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा घरी परतली तेव्हापासून अभयला त्या फेसबुकफ्रेण्डशी बोलणं कठीण होऊ लागलं. तो टाळाटाळ करतो आहे हे पाहून ती तरुणी चिडली. त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागली, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून ‘तुझी बदनामी करेन’, अशी धमकी देऊ लागली आणि एक दिवस तिनं सोनलचा नंबर शोधून तिच्या मोबाइलवर व्हिडीओ पाठवले, चॅटिंग पाठवले, ते सर्व बघून सोनल भयंकर चिडली, मुलांना घेऊन माहेरी निघून आली आणि घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात केस दाखल केली; पण समुपदेशनात अभयनं चूक मान्य केल्यामुळे आणि पुन्हा असे घडणार नाही अशी हमी दिल्यानं दोघांना एकत्र राहायला पाठवले होते, पण सोनल मागच्या गोष्टी विसरू शकत नव्हती, मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
“सोनल, कधीकधी परिस्थितीला आहे तसंच सोडून देणं आणि शांत राहणंदेखील सोईचं ठरतं. तू सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहिलीस आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना कवटाळून बसलीस तर तुला वर्तमानात राहणे अवघड होईल. नात्यांमध्ये आपल्या व्यक्तींच्या चुकांना माफही करता यायला हवं. स्वतःकडून घडलेल्या अक्षम्य गुन्ह्याची टोचणी त्यालाही आहेच, तू अशीच वागत राहिलीस तर तो स्वतःलाही माफ करणार नाही, त्यातून कोणताही अनर्थ घडायला नको. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा तुझ्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची जबाबदारी तू घे. काही घडलंच नाही असं समजून नव्याने सुरुवात कर. हे तुला खूप अवघड जाणार आहे, पण तब्येत बरी होण्यासाठी जसं कडू औषध घ्यावं लागतं तसंच नाती दुरुस्त होण्यासाठी भूतकाळातील कटू आठवणी गिळून टाकणे आवश्यक असते, त्या विचारांना थारा देऊ नकोस. बघ, तुझा भविष्यकाळ तुझ्याच हातात असेल.”
काही वेळ शांतपणे विचार केल्यानंतर सोनलच्या मनातील वादळ शांत झालं. मुलांच्या वाढदिवसाला नक्की या, असे आमंत्रण देऊन पुढच्या तयारीसाठी उत्साहानं ती माझ्या चेंबरमधून बाहेर पडली.
(लेखिका समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com