दरवर्षी अनेक उमेदवार अनेक अडथळे आणि आव्हानांना न जुमानता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करतात. यूपीएससी ही भारतातील सर्वांत कठीण भरती परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवारांना खूप कष्ट घ्यावे लागतात. स्वमेहनतीच्या जोरावर हे उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करीत आपले आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करतात. एवढेच नाही, तर गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून अभ्यास करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांची उदाहरणेही आपण बघितलीच असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- तब्बल पाच वेळा यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही सोडला नाही ध्यास; प्रियांका गोयलच्या यशाची कहाणी वाचाच

आज आपण अशाच एका आयएएस महिला अधिकारी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; जिने यूपीएससी परीक्षेसाठी लाखो रुपयांचा पगार असलेल्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. नेहा भोसले, असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. नेहाचा हा प्रवास नोकरी करीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

हेही वाचा- एकेकाळी ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम; आज अमेरीकेतील अब्जाधीश कंपनीच्या सीईओ

नेहा भोसलेचा जन्म मुंबईत झाला. लहानपणापासूनच ती हुशार विद्यार्थिनी होती. तिने विज्ञान शाखेतून ११ वी आणि १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिने मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर तिने आय़आय़एम (IIM) -लखनऊमधून एमबीएची पदवी पूर्ण केली. नेहाने एमबीएनंतर भारतीय कॉर्पोरेशनमध्ये तीन वर्षे काम केले.

हेही वाचा- जिद्दीला सलाम! हात नसतानाही मिळवले ड्रायव्हिंग लायसन्स; केरळच्या जिलुमोल मॅरिएटची असाधारण गोष्ट

नोकरी करतानाच नेहाच्या मनात यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली. नोकरी करता करताच तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पूर्णवेळ नोकरी करताना २०१७ मध्ये पहिल्यांदा नेहाने यूपीएससीची परीक्षा दिली; पण पहिल्या प्रयत्नात तिला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, या अपयशाने तिने खचून न जाता, पुन्हा आणखी जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा- एका हातात फुटबॉल, दुसऱ्या हातात दगड; ‘त्या’ एका घटनेनं बदललं काश्मीरच्या अफशानचं आयुष्य

अखेर २०१७ मध्ये नेहाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. अथक परिश्रम व दिवस-रात्र अभ्यास करून नेहाने तिसऱ्या प्रयत्नात म्हणजे २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून १५ वा क्रमांक मिळवला होता. सध्या नेहा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पीओ पदावर कार्यरत आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias neha bhosle first achieved 99 percentile in cat then cracked upsc and became ias officer with air dpj
Show comments