IAS Pari Bishnoi: UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणं हे सर्वात कठीण मानलं जातं. या परीक्षेत पास होण्यासाठी उत्तम शिकवणीच्या शोधात अनेक विद्यार्थी आपल्या घरापासून लांब, मोठ्या शहरांत येऊन राहतात. परंतु, या स्पर्धात्मक जगात पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांनाच यश मिळेल असं नाही.

कोण आहेत परी बिश्नोई? (Who is Pari Bishnoi)

नागरी सेवक बनून देशाची सेवा करण्याची संधी अत्यंत कमी लोकांना मिळते, अशीच संधी आयएएस परी बिश्नोई यांना मिळाली. राजस्थानमधील बिकानेर येथे राहणाऱ्या परी बिश्नोई सध्या चर्चेत आहेत. परी यांचे वडील वकील आहेत, तर त्यांची आई जीआरपीमध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम करते.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून

हेही वाचा… संसाराची कसरत आणि स्वप्नांचा पाठलाग, IPS तनुश्रीने केलं लग्नानंतर स्वप्न साकार

परी बिश्नोई यांनी अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन्समध्ये बॅचलरचा अभ्यास करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या. तसंच त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अजमेरच्या एमडीएस विद्यापीठात प्रवेश घेतला.

…अशी केली IASची तयारी

त्यांच्या पदवीनंतर परी बिश्नोई यांनी आयएएस (IAS) परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विचार सुरू केला. या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्यांचा फोन वापरणं पूर्णपणे बंद केलं आणि त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलिट केले.

हेही वाचा… पतीच्या प्रकृतीमुळे घेतला ‘हा’ धाडसी निर्णय, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या महिला कॅब ड्रायव्हरची प्रेरणादायी गोष्ट

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हाच त्यांचा ध्यास होता. पहिल्या दोन्ही प्रयत्नात अपयश हाती लागल्यानंतर २०१९ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात परी यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्या संपूर्ण भारतात ३० व्या (AIR) रॅंकला होत्या.

परी बिश्नोई सध्या IAS आहेत, ज्या सिक्कीममधील गंगटोक येथे उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयात (Ministry of Petroleum and Gas) सहाय्यक सचिव म्हणून काम केले होते.

हेही वाचा… महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

परी बिश्नोई यांचे लग्न आदमपूर, हिसार येथे जन्मलेल्या हरियाणातील सर्वात तरुण विधानसभा सदस्य भव्य बिश्नोईशी झाले आहे. भव्य हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू आणि भाजपा नेते कुलदीप बिश्नोई यांचे सुपुत्र आहेत.

Story img Loader