नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण करणे सोपे नाही. अनेक वेळा उमेदवारांना एक, दोन किंवा तीन वेळा प्रयत्न करूनही या परीक्षेत यश मिळत नाही. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेक उमेदवार मोठ्या प्रमाणात शुल्क भरून शिकवणीही लावतात. मात्र, काही उमेदवार असेही आहेत की, ज्यांनी कोणतीही महागडी शिकवणी न लावता स्वयंअध्ययनाच्या जोरावर यूपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आज आपण अशाच एका IAS महिला अधिकारी व्यक्तीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत; जिने कोणत्याही शिकवणी किंवा कोचिंगच्या मदतीशिवाय यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपले IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सलोनी वर्मा, असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सलोनीचा हा प्रवास अनेक यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सलोनी वर्मा ही मूळची झारखंडमधील जमशेदपूरची रहिवासी आहे. मात्र, आयुष्याचा बराचसा काळ तिने दिल्लीत घालवला आहे. पदवीनंतर लगेचच तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली. तिने यूपीएससी परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या शिकवणीचा आधार घेतला नाही. सलोनीने स्वयंअध्ययनाद्वारे परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि आपल्या जिद्द व प्रयत्नांच्या जोरावर ती २०२० मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.
अनेक मुलाखतींमध्ये सलोमी वर्माने यूपीएससी परीक्षेची तयारी नेमकी कशी केली याबाबत सविस्तर सांगितले होते. सलोनी म्हणालेली, “वेळापत्रक बनवण्यापूर्वी मी परीक्षेसंबंधित सगळा अभ्यासक्रम वाचून घेतला. मी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना नेहमी नियोजन व वेळापत्रकाचे पालन करूनच अभ्यास करण्याचा सल्ला देते. सातत्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर द्या. तसेच विद्यार्थ्यांनी सतत आपल्या अभ्यासाची उजळणी करण्याबरोबरच लेखनाचाही सराव ठेवला पाहिजे.”