नीना गुप्ता
लवकरच माझा ‘वध’ हा हिंदी सिनेमा येतोय. या सिनेमात माझा नायक संजय मिश्रा आहे, त्याचं वय आहे ६४ वर्षं, तर मी नुकतीच वयाची ६४ वर्षं पूर्ण केली आहेत. योगायोगानं आम्हा दोघाही कलावंतांना वयाच्या उत्तरार्धात उत्तम भूमिका मिळत आहेत. नेमका असाच काहीसा प्रकार मी आणि अभिनेता गजराज राव यांच्याबाबतीतही झालाय. तेदेखील वयस्क कलाकार आहेत. पण काय एकेक भूमिका करत आहेत तेही. यावर मी एकच म्हणेन, ‘एज इज जस्ट अ नंबर!’ भगवान जबभी देता है छप्पर फाड के देता है! या म्हणीचा प्रत्यय मला माझ्या साठीनंतर येऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : लवकर म्हातारं न दिसण्यासाठी… या ९ टिप्स!

खरं तर मी फार वर्षांपासून या क्षेत्रात आहे. माझ्या करिअरला ४० वर्षं झालीत. या दरम्यान, मी रंगभूमी, हिंदी सिनेमा, दूरचित्रवाणी आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म सगळी माध्यमं हाताळली. अभिनय तर केलाच, पण त्याशिवाय मी निर्माती-दिग्दर्शकदेखील आहे. मी दिग्दर्शित केलेल्या मालिका खूप लोकप्रिय ठरल्या, पण त्या काळात त्या ‘दूरदर्शन’कडून संमत करून घेण्यासाठी ‘बहोत पापड बेलने पडे।’ पण मी तेव्हा तरुण होते, संघर्षाची हिंमत होती, म्हणून मी अनेक खटाटोप करू शकले. पुढच्या काळात ते ही जमेनासं झालं. मग जे चित्रपट मिळत गेले ते स्वीकारत गेले. माझी लेक मसाबा मोठी होत होती. मी ‘सिंगल मदर’ असल्याने तिच्या शिक्षणाचे, पालन पोषणाचे पैसे मलाच जमा करावे लागत होते, पण मनासारखी कामं मिळत नव्हती. भूमिका मिळवणं म्हणजे दमछाकच असायची. हा प्रकार फार पूर्वीपासून माझ्याबाबत आणि माझ्यासारख्या अनेकांच्या बाबत घडतोच आहे. टॅलेंट आहे, पण काम नाही, हा त्यांच्या नशिबाचा भाग म्हणू आपण…

आणखी वाचा : आई xx दे की रिप्लाय!

पूर्वी काम म्हणजे एक कमीटमेंट असायची. १९८३ मध्ये रिलीज झालेला ‘मंडी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक किस्सा सांगते. स्मिता पाटील, शबाना आझमी, इला अरुण, आणि मी असा स्त्रीवर्ग तर दुसरीकडे कुलभूषण खरबंदा, पंकज कपूर, नसरुद्दीन शाह, अमरीश पुरी अशी हिरो मंडळी होती. हैद्राबादच्या मुख्य शहरापासून १ तासाच्या अंतरावर लोकेशन होतं. आम्ही सगळे कलावंत २ महिने तिथे तळ ठोकून होतो. श्याम बेनेगल शिस्तप्रिय असल्याने सकाळी ८ वाजता हॉटेलच्या आवारात एक बस येई, सगळे कलावंत आपापले कॉश्च्युम -मेकअपसह बसमध्ये बसून लोकेशनवर पोहोचत असू. आम्ही सगळ्याजणी ‘मंडी’ मध्ये वेश्या व्यवसायातल्या स्त्रियांची भूमिका करत असल्यानं भडक मेकअप, उत्तान कपडे अशा अवतारातच सेटवर जात असू. उत्तानता दाखवण्यासाठी पॉइंटेड ब्राज्, नायलॉनच्या झिरझिरीत साड्या नेसाव्या लागत. ते सगळं लेवूनच आम्ही सेटवर पोहोचत असू, पण गंमत म्हणजे कित्येकदा अगदी ४-५ दिवस बसूनही आमचा एकही शॉट चित्रित होत नसे. त्या तशा अवतारात बसणं एक शिक्षाच होती, पण त्याला इलाज नसायचा. बसून बसून कंटाळा येतो म्हणून मग आम्ही सेटवर व्हॉलीबॉल खेळू लागलो, पत्ते खेळू लागलो. रोजच अशा अवतारात असल्याने ‘ऑकवर्डनेस’ कमी झाला. याच्याच एका शेड्युलमध्ये मी तापाने फणफणले. १०३ डिग्री ताप अंगात होता आणि श्याम बेनेगल यांचा साहाय्यक मला डान्सचं शूट करायचं आहे. तुम्हाला बोलावलं आहे, असा निरोप घेऊन आला. मी त्याला आजचे शूटिंग कॅन्सल करण्याविषयी सांगितले. मी म्हटलं, “ मी आजारी आहे, उठूही शकत नाही. तू श्याम सरांना हे सांग.” पण तो ५ मिनटांत परत आला. म्हणाला, “सरांनी सांगितलंय, तुम्हाला शॉट द्यायला यावंच लागेल, आपण ‘मॅनेज’ करू. मी सरांवर खूप चिडले. त्यांच्याकडे माणुसकी नाही, असंही बोलून गेले. तेव्हा शबानानं मला समजावलं, “नीना, तू फक्त तुझा विचार करतेस. बेनेगलसरांनी या शेड्युलमधल्या किमान १५० युनिट मेंबरचा विचार केला आहे. त्यांनी स्मिताचे २७ दिवस ,माझे ३४ दिवस, अमरीश पुरी यांचे १७ दिवस अशा गरजेनुसार सगळ्यांच्या डेट्स घेतल्या आहेत, एक दिवस जरी कलावंताचा दिवस फुकट घालवला तर पुढच्या सगळ्या शेड्युलची वाट लागेल. पुन्हा तारखा मॅच करणं सोपं नाही. शबानाने मला समजावल्यामुळे हे डेट्स प्रकरण माझ्या लक्षात आलं आणि त्या दिवशी मी तापात डान्स सिक्वेन्स पार पाडला. पण एक खंत राहिलीच, या तडजोडी, असे चित्रपट, पूर्ण सहकार्य करूनही मला श्याम बेनेगल यांनी त्यांच्या सिनेमात कधीही मुख्य भूमिका दिली नाही. स्मिता पाटील, शबाना आझमी त्यांच्या चित्रपटात असत. मी उत्तम अभिनेत्री होते, रूपंही काही वाईट नव्हतं, उत्तर भारतीय असल्यानं माझं हिंदी भाषेवर प्रभुत्व होतं. व्यक्तिरेखांसाठी श्रमही मी घेतच होते, पण श्याम बेनेगलसारख्या दिग्दर्शकांनी मला कधीच लीड रोल दिले नाहीत, मग कमर्शिअल सिनेमात लीड रोल्स कसे मिळणार?

आणखी वाचा : नवरा नको गं आई, मला नवरा नको!

काही वर्षं मी प्रतीक्षा केली आणि २०१७ मध्ये ‘फेसबुक’वर माझी ही खंत व्यक्त केली. ‘मी उत्तम अभिनेत्री आहे आणि मी चांगल्या भूमिकांच्या प्रतीक्षेत आहे ’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि एकच खळबळ माजली. ही पोस्ट दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या पाहण्यात आली आणि त्यांनी ‘बधाई हो’ या सिनेमासाठी माझी निवड केली. या अन्कन्व्हेन्शनल फिल्मला खूप यश मिळालं आणि २०१८ पासून माझ्या करिअरने जो ‘टेक ऑफ’ घेतला तो घेतलाच. त्यासाठी मी ईश्वराची ऋणी आहे. माझ्या वयाचे अनेक कलावंत उत्तम परफॉर्मर आहेत, पण त्यांच्यासाठी भूमिका आज अभावाने लिहिल्या जातात. आजच्या सिनेमाचा काळ उत्तम आहेच, पण हॉलीवूडसारखे आपल्याकडे व्हायला हवे. तिथे वयस्क कलावंतासाठीदेखील सिनेमे तयार होतात. आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक असतात. आज अनुपम खेर असो, मी असो किंवा चाळिशी उलटलेला नवाजुद्दीन सिद्दीकी असो अशांसाठी सिनेमे होत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे! वयाची पन्नाशी असो वा साठी. माणसाची इच्छाशक्ती त्याच्या वयापेक्षा श्रेष्ठ असते हेच माझ्या हल्लीच रिलीज झालेल्या ‘उंचाई’ या सिनेमात दाखवलं आहे. मी तसंच जगते आहे.

samant.pooja@gmail.com