डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“वैशाली, कटलेट खूप छान झालेत. तू अन्नपूर्णाच आहेस! कसं जमत गं तुला हे सगळं करायला? नाहीतर किटी पार्टीत आम्ही सगळ्याजणी बाहेरचे पदार्थ विकत आणतो.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

“खरं आहे रमा तुझं! वैशाली प्रत्येक वेळी घरीच नवीन पदार्थ बनवते, म्हणूनच आपण सगळ्याजणी वैशालीच्या टर्नची वाट बघत असतो!”

सगळ्याजणी वैशालीचं कौतुक करत होत्या. किटी पार्टी म्हटलं, की तिची आदल्या दिवसापासून तयारी सुरू असायची. सगळ्यांना आपण केलेला पदार्थ आवडला आणि सर्वांनी पोटभरून खाल्लं की तिचं मन भरून जायचं.

आजच्या पार्टीला रमाबरोबर तिची भाची सानियाही आली होती. नुकताच कॉलेज जीवनात प्रवेश केला होता तिनं. तिनं वैशालीला विचारलं, “काकू, तुझ्या नवऱ्याची काय मजा असेल ना? त्याला रोज छान चवीचे पदार्थ खायला मिळत असतील!”

“कसलं काय! अगं त्यांना असे पदार्थ खाण्याची आजिबात आवड नाही. अगदी ‘डायट कॉन्शियस’ आहेत ते. मोजकंच खायचं आणि त्या त्या वेळेलाच खायचं. त्यामुळे त्यांना या पदार्थांचं आजिबात कौतुक नाही.” वैशालीनं तिची नाराजी व्यक्त केली.

“खरंय तुझं वैशाली, जिथे पिकतं, तिथे विकत नाही.” रमानं दुजोरा दिला आणि म्हणाली, “मी संगीत विशारद आहे. मला गाण्याच्या कार्यक्रमासाठी लोक बोलावतात, पण राजेशला गाण्याची आजिबात आवड नाही. तो ट्रेकिंगमध्ये बिझी. त्याला माझ्या गाण्याचं आजिबात कौतुक नसतं.”

इतक्या वेळ खाण्यात गुंग झालेली सारिका पुढे आली हातातली डिश बाजूला ठेवत म्हणाली, “मला नाटक, सिनेमा बघायला इतकं आवडतं, पण नवरा कधी माझ्यासोबत यायला तयारच नसतो. त्याला हे सगळं वेळ घालवणं आहे असं वाटतं. त्याच्या शेअर मार्केटमध्ये तो सतत बुडलेला असतो.”

सर्वजणी आपली आणि नवऱ्याची आवड कशी वेगळी आहे याबद्दलचं म्हणणं मांडत होत्या. सानिया सर्वांचं ऐकत होती, ती मध्येच निरागसपणे बोलून गेली, “अरे बापरे, म्हणजे सगळ्यांचे जोडीदार भिन्न विचारांचे आहेत. म्हणजे तुमचं पटणारच नाही का?… लवकरच सगळ्यांचे घटस्फोट होणार की काय?…”

रमानं तिला दटावलं. “सानिया, असं बोलतात का? तू लहान आहेस. तुला अजून काही कळत नाही.”

“आत्या, कालच तू आईला म्हणत होतीस, की सानिया कॉलेजला गेली आता. लवकरच तिच्या लग्नाचं बघावं लागेल वगैरे… आज म्हणतेस मी लहान आहे! काल तूच आईला सांगत होतीस ना, की सानियाच्या विचारांशी मिळताजुळता जोडीदार बघायला हवा, म्हणजे संसार चांगला होईल. आता तूच सांग, अशा वेगळ्या आवडीनिवडी असतील तर संसार चांगला होईल का? अशा वेगळ्या माणसाबरोबर किती दिवस राहणार?… म्हणजे शेवटी घटस्फोटच होणार ना?” आता रमाला काय बोलावं तेच कळेना.

सानियाचे विचार ऐकून अपर्णाला हसूच आलं. ती गप्पांत सामील झाली आणि सानियाला म्हणाली, “अगं बेटा, हाताची पाची बोटं सारखी असतात का? पण ती एकत्र असतील तरच काम होत ना? नवरा बायकोचं नातं असंच. त्यांचे विचार भिन्न असले, तरी ते एकत्र नांदतात आणि संसाराचा गाडा पुढे नेतात.”

सानियाला पटेना. ती म्हणाली, “पण अपर्णा काकू, यापेक्षा आवडीनिवडी सारख्या असणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करावं ना!”

“सानिया, खरं सांगू का? बऱ्याचदा जोड्या विजोडच असतात. अनेक गोष्टी जोडीदारांमध्ये भिन्न असतात, पण या भिन्नतेत गोडवा हवा. हल्ली मी मुलामुलींचं पाहिलं आहे- ‘आमच्याच क्षेत्रातला जोडीदार नको’ असं म्हणतात. घरात तेच आणि नोकरी-व्यवसायात तेच नको, घरात काहीतरी वेगळा विषय हवा, असा विचार करणारे लोक आहेत. आवडीनिवडी, विचार वेगळे असतील तरी चालेल, पण एकमेकांच्या विचारांचा आदर व्हायला हवा. स्वतंत्र विचाराचाही स्वीकार व्हायला हवा. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी जपण्याचं स्वातंत्र्य हवं.”

सानिया विचारात पडली. ते बघून अपर्णा म्हणाली, “तुझी रमा आत्या संगीत विशारद आहे. तिच्या नवऱ्याला गाण्याची आवड नसली, तरी त्यांनी तुझ्या आत्याला तिच्या आवडीपासून परावृत्त केलेलं नाही. तिनं आवड जपावी यासाठी ते सहकार्यच करतात. त्यांना अभिमान आहे तिचा; हे जाणवतं. तुझ्या वैशाली काकूचा नवरा स्वतः खवय्या नसला तरी तिला सर्वांना खाऊ घालायला आवडतं म्हणून ते वैशालीला भाजी आणि वाणसामान आणून देणं, काही भाज्या निवडून ठेवणं, पार्टीची तयारी करणं, अशी मदत करतात.”

आता एक-एक करून सर्वजणी आपल्या नवऱ्याची अशी सकारात्मक बाजू सांगायला लागल्या होत्या.

अपर्णा म्हणाली, “बघितलंस सानिया, विचार आणि आवडीनिवडी भिन्न असल्या तरी एकमेकांना समजून घेतलं तर संसाराची गोडी टिकून राहते. तूपण हे लक्षात ठेव. ज्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार म्हणून आपण स्वीकारतो, तेव्हा त्याच्या गुण-दोषासहित त्याचा स्वीकार करायला हवा. अमुक मनासारखं नाही, याची कुरकुर करीत राहाल तर दोघांपैकी कुणालाच सुख मिळणार नाही.”

सानिया म्हणाली,“अपर्णा काकू, पटतंय मला. पण मग आधी या सर्वजणी तक्रारी का करत होत्या?…”

सगळ्या हसू लागल्या, वैशाली म्हणाली, “सानिया, महिन्यातून एकदा आम्ही किटी पार्टी करतो, ते एकत्र येण्यासाठी. एकमेकांशी दिलखुलास बोलण्यासाठी. थोडं गॉसिप, थोडी मजा, लटक्या तक्रारी आणि मनातलं बोलून मोकळं होण्यासाठी. मनापासून हसण्यासाठी! यातून आमचे ताणतणाव दूर होतात आणि नव्या उत्साहानं आम्ही परत जातो. हे ‘लेडिज टॉक्स’ प्रत्येक स्त्रीला हवे असतात!”
…आणि किटी पार्टी पुन्हा मजा-मस्करीत रंगली.

smitajoshi606@gmail.com

Story img Loader