केतकी जोशी

एखादी हवीहवीशी गोष्ट झाल्यावर, खूप प्रयत्नांनी यश मिळाल्यावर, कौतुक झाल्यावर, खूप वाईट वाटल्यावर, एखाद्याचा राग आल्यावर, उदास वाटत असताना, तुम्हाला कुणाशी बोलावंसं वाटतं? अशी जिवलग मैत्रीण तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. पण तुम्हीही जर असं कुणासाठी हक्काचा आधार असाल तर तेही खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा महिला आपल्या मनातलं मोकळेपणानं बोलू शकत नाहीत. अगदी आपला नवरा किंवा आई-वडील, भावंडं यांच्याशीही त्या मोकळेपणानं काही गोष्टी सांगू शकत नाहीत. अशा वेळेस मैत्रिणी हा हक्काचा आधार असतात. विशेषत: जेव्हा आपल्याला उदास वाटत असतं तेव्हा जर तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी बोललात तर नक्कीच मूड चेंज व्हायला मदत होते.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

गरजेच्या वेळेस वेळ द्या-

एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते, असं उपहासानं म्हटलं जातं. टीव्ही मालिकांमध्ये तर स्त्रियांमधील ईर्ष्या, अपमान, चढाओढ याचंचं चित्रीकरण जास्त असतं. पण तरीही प्रत्यक्ष जीवनात आपण एकमेकींचा आधार होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला खूप काही वेगळं करायची गरज नाही. आपल्या मैत्रिणीला गरज असेल तेव्हा मदत करणं, तिला वेळ देणं, सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिचं म्हणणं ऐकून घेणं हे जरी केलं तरी पुरेसं आहे.

मोकळेपणानं कौतुक करा-

 तुमची एखादी मैत्रीण किंवा अगदी ओळखीतल्या एखाद्या स्त्रीला यश मिळालं, तिनं काही वेगळं अचिव्ह केलं तर त्याचं मोकळेपणानं कौतुक करा. जर तिला आपल्या यशाचा आनंद तुमच्याबरोबर साजरा करायचा असेल तर त्यात मोकळेपणानं, कोणतीही असूया न ठेवता सहभागी व्हा. यामुळे तुमची दोस्ती आणखीच मजबूत होईल. तुमच्या मैत्रिणीलाही खूप छान वाटेल आणि तिला मानसिक आधारही मिळेल. याचा अर्थातच सकारात्मक परिणाम होईल. 

ऐकून घेणारी सखी व्हा!    

  सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांकडे सगळं काही आहे, फक्त वेळ नाही. किंवा अनेकदा ज्यातून फक्त फायदा होईल अशाच गोष्टी ऐकायला लोकांना आवडतं. त्यामुळे अनेकदा मनातल्या गोष्टी मनातच राहतात. स्त्रियांच्या तर अनेक गोष्टी अशा मनातच राहून जातात आणि मग मनातल्या मनात त्या खंतावतात. आपल्या मनातलं शांतपणे ऐकून घेणारी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यातला असा कान होऊ शकता. तिच्या काही अडचणी असतील, ती उदास असेल, तिला काही सांगायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल किंवा विचारायचं असेल तर तिनं तुम्हाला फोन केला तर शांतपणे तिचं ऐकून घ्या. कधी कधी तिला तुमच्या कोणत्याही सल्ल्याची, उत्तराची गरज नसते. तर फक्त तिचं ऐकून घेणं हेच गरजेचं असतं. तिनं तिच्या मनातलं सांगितल्यावर कोणत्याही प्रकारे जजमेंटल बनून मत व्यक्त करू नका. तिनं विचारल्यावर तिला सकारात्मक सल्लाच द्या. आपलं ऐकून घेणारं कुणी तरी आहे ही भावनाच खूप सुखद असते.

मैत्रिणींबरोबर करा ध्येय साध्य

आपल्या मैत्रिणींबरोबर तुम्ही तुमचे गोल्स शेअर करू शकता. खरं तर अनेक स्त्रियांच्या अगदी साध्या अपेक्षा असतात. दर वेळेस खूप मोठी महत्त्वाकांक्षा हवी असं नाही. वजन कमी करणं, डाएट करणं, योगा-प्राणायाम, व्यायाम शिकणं, नृत्य-संगीत शिकणं, चित्रकला किंवा अन्य एखादी कला शिकणं अशांसारख्या इंटरेस्ट असलेल्या गोष्टी एकमेकींबरोबर शेअर करू शकता. अनेकदा एकत्र केलेला व्यायाम, डाएट, एखादी कला किंवा नवीन काही तरी शिकणं हे वेगळाच आनंद देऊन जातं. तुम्ही एकमेकींना प्रोत्साहन देऊ शकता, त्यातील अडचणी समजून घेऊ शकता.

व्हा हक्काचा आधार –

तुमच्या फक्त मैत्रिणीच नाही तर आजूबाजूच्या अनेक स्त्रियांसाठी तुम्ही एक हक्काचा आधार बनू शकता. त्यांना हवी असेल ती मदत करून, त्यांना प्रोत्साहन देऊ शकता. त्याचबरोबर एखादी गोष्ट करण्यासाठी एखादीला भीती वाटत असेल तर तिची हिंमत वाढवू शकता. तुमचा एखादा छोटासा मेसेजही त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवू शकतो, त्यांची हिंमत वाढवू शकतो. ती त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरू शकते. एखाद्या धडपड्या मैत्रिणीला साथ दिलीत तर तिच्या आयुष्यातल्या अडचणी कमी होऊ शकतात. एखादी नवीन व्यवसाय सुरू करत असेल तर तिला मदत करणं, तिच्यासाठी संपर्क गोळा करणं या गोष्टी तर आपण करूच शकतो. एखादी तिच्या मोठ्या आजारातून, दु:खातून बाहेर पडत असेल तर तिच्यासोबत थोडा वेळ घालवणं, आपण तिच्याबरोबर आहोत ही जाणीव करून देणं या गोष्टी खूप मोलाच्या आहेत.

स्वप्नपूर्तीसाठी मदत करा- 

 अनेक जणींचं शिक्षणाचं स्वप्नं लग्न झाल्यामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे अर्धवटच राहतं. अशा एखाद्या मैत्रिणीला आपण नक्कीच मदत करू शकतो. जर तुमच्या मदतीनं तिनं तिचं शिक्षणाचं स्वप्नं पूर्ण केलं तर तुम्हीही तिच्या स्वप्नपूर्तीतील साहाय्यक ठरू शकता. अनेकदा आपल्या मैत्रिणी खूप काही करू शकतात, पण त्यांना तसा आत्मविश्वासच नसतो. तुम्ही त्यांना त्यांची ही सकारात्मक बाजू दाखवू द्या. त्यांना आवडती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा.

मोकळेपणानं व्यक्त व्हा –

 आपल्या मैत्रिणींशी मैत्री, इमोशनल बाॅण्डिंग, प्रेम अशा गोष्टींवर अगदी मोकळेपणानं चर्चा करा. त्यांचा सल्ला घ्या. तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणानं बोललात तर त्याही तुमच्याशी तितक्याच मोकळेपणाने बोलू शकतील. त्यांच्याशी बोलणं, आपलं मन मोकळं करणं, थट्टामस्करी करणं, त्यांच्याशी आपलं दु:ख शेअर करणं, आनंद शेअर करणं यामुळे आपल्या आयुष्यातही एक हक्काचा आधार असतो. आपल्या आईवडलांनंतर, जोडीदारानंतर आपल्याला ओळखणारी मैत्रीण हीदेखील आपल्या आयुष्यभराची साथी-सोबती असते. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी खूप दिवसांत बोलला नाहीत का? वाट कसली बघताय, लावा फोन आणि सुरू करा मनमोकळ्या गप्पा…