रेन लिली, स्पायडर लिली यांना पावसात भरपूर फुले येतात. सोनटक्का, हळद, कर्दळ, रेड जिंजर ही साधारण एकाच वर्गात मोडणारी झाडेही उत्तम फुलतात. गावठी गुलाब, मोगऱ्याच्या काही जाती तसेच, मॉर्निंग ग्लोरी, कमळ, कुमुद यांनाही पावसात उत्तम बहर येतो. गोकर्ण, सदाफुली तगर भरभरून फुलतात. या सगळ्या वनस्पती परागीभवनासाठी किटकांना आकर्षित करतात. मधमाश्या, छोटे किटक, फुलपाखरे यांच्यामुळे फुलझाडांबरोबरच शेंग भाज्या आणि फळभाज्या चांगलं उत्पन्न देतात. घेवडा, फरसबी, काकडी, घोसाळी, चवळी, दुधी भोपळा, कारलं या फळभाज्या पावसाळ्यात लावल्या जातात. या भाज्यांच्या फुलांचं परागीभवन होणं अत्यंत गरजेचं असतं.

मागील लेखात आपण कंपोस्ट कसं बनवता येईल याविषयी माहिती घेतली. या लेखात आपल्या या परसबागेत पाऊस काळात कोणकोणती फुलझाडं लावू शकतो याविषयी माहिती घेऊ या.

फळभाज्या, पालेभाज्या, शेंग भाज्या यांची लागवड करताना बाग सुंदर आणि प्रसन्न दिसावी म्हणून फुलं, झाडं तर लावली पाहिजेत हे खरं, पण या फुलांचे उपयोग जर जाणले तर यांचं महत्त्व अधोरेखित होतं. रंगबिरंगी आणि सुगंधी फुलं किटकांना आपल्याकडे आकर्षून घेतात, यामुळे आपल्या या छोट्या बागेत लावलेल्या भाज्यांच्या परागीभवनासाठी त्याचा उपयोग होतो.

हेही वाचा… महिलांच्या हाती सुरक्षेची दोरी! ‘या’ राज्यात आहेत ११.५ टक्के महिला पोलिस अधिकारी कार्यरत, पाहा

रेन लिली, स्पायडर लिली यांना पावसात भरपूर फुले येतात. सोनटक्का, हळद, कर्दळ, रेड जिंजर ही साधारण एकाच वर्गात मोडणारी झाडेही उत्तम फुलतात. गावठी गुलाब, मोगऱ्याच्या काही जाती तसेच, मॉर्निंग ग्लोरी, कमळ, कुमुद यांनाही पावसात उत्तम बहर येतो. गोकर्ण, सदाफुली तगर भरभरून फुलतात. या सगळ्या वनस्पती परागीभवनासाठी किटकांना आकर्षित करतात. मधमाश्या, छोटे किटक, फुलपाखरे यांच्यामुळे फुलझाडांबरोबरच शेंग भाज्या आणि फळभाज्या चांगलं उत्पन्न देतात. घेवडा, फरसबी, काकडी, घोसाळी, चवळी, दुधी भोपळा, कारलं या फळभाज्या पावसाळ्यात लावल्या जातात. या भाज्यांच्या फुलांचं परागीभवन होणं अत्यंत गरजेचं असतं. पुरेशा प्रमाणात किटक जर बागेला भेट देत नसतील तर आपल्याला कृत्रिम परागीभवन करावं लागतं. हे काम जरा निगुतीने योग्य वेळ साधत करावं लागतं. याउलट जर किटकांचा पुरेसा वावर असेल तर हे काम सहजी होतं आणि थोड्या प्रमाणात का होईना, पण नियमित उत्पन्न मिळतं.

अडतीसाव्या मजल्यावरच्या गच्चीत मी एकदा हौसेने दुधी भोपळ्याचे बी लावलं. चांगलं देशी वाण होतं. बिया रूजुन काही दिवसांतच वेल फोफावला. नर आणि मादी फुलंही आली. काही प्रमाणात पराग सिंचन होऊन छोटे दुधीभोपळे वाढीला सुद्धा लागले. पण ते पुरेसे मोठे होऊ शकले नाही. हाच प्रकार काकडी बाबतही झाला. वांगी लावली त्यावेळीही त्याची फुलं गळून पडत होती. अशावेळी ब्रश घेऊन नर फुलातील पराग हळूवारपणे मादी फुलातील कुक्षीवर स्थानांतरित करावे लागले, तेव्हा कुठे काकडी आणि वांग्याला फळं धरली.

हेही वाचा… इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिली ‘पॉवर ड्रेसिंग’ला नवी ओळख; सर्वत्र होते ‘अरमानी’ची चर्चा, पाहा

प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला होता, पण हे सतत करणं वेळखाऊ आणि जिकिरीचं होतं. शिवाय यात फारसं यशही हाती लागत नव्हतं. मग यासाठी उपाय म्हणजे फुलझाडांची लागवड करणं. सदाफुली, कोरांटी, गोकर्ण, जास्वंद यांच्या कडे मोठ्याप्रमाणावर किटक आकर्षित होतात. शिवाय कितीही पाऊस पडला तरी ही झाडं तो सहन करून उत्तम बहरतात. त्यामुळे बागेतील चैतन्य तर टिकून राहतच, पण सोबत लावलेल्या फळभाज्यांमधे ही चांगली फळधारणा होते.

किटकांनी आपल्या बागेला नियमित भेट द्यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर फुलझाडं तर लावली पाहिजेत, पण त्यांची आणि भाज्यांच्या रोपांची जपणूक करताना मित्र किटक कोणते, त्यांचा आपल्या बागेला कसा उपयोग होईल. उपद्रवी किटक असतील तर त्यांच्यासाठी कोणती सेंद्रिय किटकनाशके वापरायची याचं ज्ञानही करून घ्यावं लागेल.

तर पुढच्या लेखात आपण हीच सगळी माहिती घेणार आहोत.

mythreye.kjkelkar@gmail.com