अमेरिकमध्ये एका जोडप्याला धक्कादायक असाच अनुभव आला आणि त्याची चर्चा आता जगभरात सुरू झाली आहे. २३ वर्षीय पेयटन स्टोवर या महिलेला अचानक लक्षात आले की, ती गरोदर आहे आणि त्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्येच प्रसव वेदना सुरू झाल्या आणि तिचे बाळ जन्मासही आले. असे नेमके का होते, या मागची कारणे काय याची साधकबाधक आणि वैद्यकीय चर्चाही आता जगभरात सुरू झाली आहे.
आणखी वाचा : हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर वेळीच व्हा सावध! महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका
केइटीव्हीवर दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ओमाहा येथे ही घटना घडली. शाळेतील पहिलीची शिक्षिका असलेल्या स्टोवर यांना उमासे येऊ लागले, खाण्यापिण्याची इच्छाही गेली, पायांना सूज आली. सुरुवातीस त्यांना वाटले की, नोकरीमधील ताणतणावाचा हा परिणाम असावा. मात्र खूपच त्रास सुरु झाल्यानंतर त्यांची थेट डॉक्टरचीच भेट घेऊन तपासण्याही केल्या. त्यामध्ये असे लक्षात आले की, त्या गरोदर आहेत. मुळात हाच तिच्यासाठी मोठा धक्का होता. डॉक्टरने त्यानंतर खातरजमा करण्यासाठी अल्ट्रासाऊंड तपासणी करून गरोदरपणाची खातरजमाही केली. पोटातले बाळच त्यांनी थेट स्क्रीनवर दाखवले.
आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?
गरोदर असणे ही कोणत्याही ‘चतुरा’साठी आनंदाचीच बातमी असते. मात्र स्टोवरसाठी ही बातमी काहीशी नव्हे तर मोठीच चिंता घेऊन आली. डॉक्टरांनी तिला तिच्या शारीरिक स्थितीची नेमकी कल्पनाही दिली. ज्या विकारामुळे हे असे होते त्याला प्रीक्लॅम्शिया असे म्हणतात. यात गरोदरपणामध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होते. अतिउच्च रक्तदाब सुरू होतो आणि त्याचा परिणाम यकृत किंवा मूत्रपिंडांवरही होतो.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक
स्टोवरच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आले की, तिचे यकृत आणि मूत्रपिंड दोन्हींवर त्याचा विपरित परिणाम झाला होता. अखेरीस तिची शारीरिक स्थिती वाईट असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. आणि त्याच रात्री तिने बाळाला जन्म दिलादेखील. गरोदरपणाची खातरजमा ते बाळाचा जन्म हा केवळ ४८ तासांचा धक्कादायक असा घटनाक्रम होता, अशी माहिती या बाळाचा पिता असलेल्या तेविस कोएस्टर्स याने ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला दिली. प्रीक्लॅम्शियाच्या विकारात इतर अवयवही निकामी होण्याचा धोका असतो, असे डॉक्टरांनी सांगितले. बाळाचा जन्म तब्बल १० आठवडे आधी झाला होता. जन्माच्या वेळेस बाळाचे वजन अवघे ४ पौंडस् एवढेच होते. ही घटना निमित्त ठरली आणि आता प्रीक्लॅम्शियाची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.
तीची नेमकी कल्पनाही दिली. ज्या विकारामुळे हे असे होते त्याला प्रीक्लॅम्शिया असे म्हणतात. यात गरोदरपणामध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होते. अतिउच्च रक्तदाब सुरू होतो आणि त्याचा परिणाम यकृत किंवा मूत्रपिंडांवरही होतो.
स्टोवरच्या तपासण्या केल्यानंतर लक्षात आले की, तिचे यकृत आणि मूत्रपिंड दोन्हींवर त्याचा विपरित परिणाम झाला होता. अखेरीस तिची शारीरिक स्थिती वाईट असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. आणि त्याच रात्री तिने बाळाला जन्म दिलादेखील. गरोदरपणाची खातरजमा ते बाळाचा जन्म हा केवळ ४८ तासांचा धक्कादायक असा घटनाक्रम होता, अशी माहिती या बाळाचा पिता असलेल्या तेविस कोएस्टर्स याने ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ला दिली. प्रीक्लॅम्शियाच्या विकारात इतर अवयवही निकामी होण्याचा धोकाअसतो, असे डॉक्टरांनी सांगितले. बाळाचा जन्म तब्बल १० आठवडे आधी झाला होता. जन्माच्या वेळेस बाळाचे वजन अवघे ४ पौंडस् एवढेच होते. ही घटना निमित्त ठरली आणि आता प्रीक्लॅम्शियाची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.