थंडीचं आणि ओठ कोरडे पडण्याचं किंवा ओठ फुटण्याचं नातंच आहे. रात्रीच्या वेळी आणि सकाळी घरातून बाहेर जाताना लिप बाम लावला तरीही ओठ फुटतातच, असा खूप जणांचा अनुभव असतो. पण याचाच अर्थ तुम्हाला केवळ रात्री आणि काळी ओठांना मॉईश्चराईझ करणं पुरेसं होत नाहीये. अशा वेळी आणखी काळजी घ्यावी लागेल. ओठ कोरडे पडू नयेत यासाठी काय करावं, यासाठी ‘एएडी’ अर्थात ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटॉलॉजी सोसायटी’नं काही टिप्स दिल्या आहेत. त्या आज पाहू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : भार्गवी चिरमुले – एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असतो तुमचा मेन्टॉर !

लिप बाम निवडताना-
बाजारात अनेक कंपन्यांचे लिप बाम उपलब्ध आहेत. काही लिप बाम हे लिपस्टिकसारख्या पॅकेजिंगमध्ये असतात, तर काही डबी किंवा ट्युब पॅकेजिंगमध्ये विकले जातात. लिप बामचं पॅकेजिंग कसंही असो, तो खरेदी करताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात काही हानीकारक घटक नाहीत ना, ते पाहाणं. काही वेळा नवीन लिप बाम वापरल्यानंतर ओठांवर जळजळल्यासारखी भावना होते. अनेकांना वाटतं, की याचा अर्थ म्हणजे त्या उत्पादनानं आपलं काम करायला सुरूवात केली आहे! खरंतर तसं नसून याचा अर्थ तुम्हाला कदाचित तो लिप बाम चालत नाहीये. त्यामुळे लिप बाम लावल्यावर ओठांवर ‘इरिटेशन’ होत असल्यास तो वापरू नये, नाहीतर ओठांच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. हीच गोष्ट लिपस्टिक, लिपग्लॉस या वस्तू खरेदी करतानाही तपासावी.

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

इकडे लक्ष द्या-

  • ओठ थंडीनं कोरडे पडले असतील तर खालील घटक असलेला लिप बाम (किंवा हे घटक असलेलं कोणतंही ओठांसाठीचं उत्पादन) न वापरलेलाच चांगला- कापूर, निलगिरी तेल, लॅनोलिन, मेन्थॉल, ऑग्झीबेन्झोन, फेनॉल (फेनिल), प्रॉपिल गॅलेट, सॅलीसायलिक ॲसिड.
    -लिप बामला हे स्वाद/ वास शक्यतो नकोच-
    बहुतेक लिप बाम किंवा लिपस्टिकमध्ये विशिष्ट फ्लेव्हर्स आणि वास वापरलेले असतात. विविध फळांच्या वासांचे, बेकिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोहक सुगंधांचे किंवा मसाल्यांच्या वासांचे लिप बाम मिळतात. ओठ फुटलेले असतील, तर मात्र दालचिनी, संत्रं वा लिंबू (सिट्रस फ्लेव्हर), पेपरमिंट हे फ्लेव्हर्स असलेले लिप बाम वापरू नका. त्यामुळेही ओठांवर इरिटेशनची भावना निर्माण होऊ शकते.
  • शक्यतो कोणताही फ्लेव्हर वा फ्रेगरन्स नसलेला लिप बाम वापरलेला चांगला. हीच गोष्ट लिपस्टिकबाबतही सांगता येईल. तुमची त्वचा व ओठ अधिक संवेदनशील असतील, तर उत्पादन ‘हायपोॲलर्जेनिक’ही वापरता येईल.
  • ओठांवर लावण्याच्या उत्पादनांमध्ये खालील घटक असतील, तर ते ओठांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात-
    कॅस्टर सीड ऑईल, सेरामाईडस् , डायमेथिकोन, हेम्प सीड ऑईल, पेट्रोलेटम, शिया बटर, ऊन्हापासून बचाव करणारे घटक- उदा. टायटेनियम ऑक्साईड वा झिंक ऑक्साईड, व्हाईट पेट्रोलियम जेली वगैरे.

आणखी वाचा : केवळ ३१ टक्के भारतीय महिलांहाती मोबाईल! ; डिजिटल दरी वाढतेय!

लिप बाम किंवा ओठांसाठीच्या इतर उत्पादनांवर जे घटक पदार्थ लिहिलेले असतात, त्यात कोणते चांगले-वाईट घटक आहेत, याचा अंदाज यावरून येऊ शकतो.

  • ओठ कोरडे पडत असतील तर दिवसांत पुन्हा पुन्हा आणि रात्री झोपतानाही लिप बाम लावा.
    ओठांवरून जीभ फिरवणं नकोच-
    वारंवार ओठांवरून जीभ फिरवणं, ओठांवरची मृत त्वचा काढून टाकायला ओठ चावणं किंवा बोटांनी ही मृत त्वचा सारखी उकलून काढणं या सवयी खूप जणांना असतात. त्या प्रयत्नपूर्वक सोडायला हव्यात.
  • पुरेसं पाणी प्या-
    थंडीतही दिवसभर थोड्या थोड्या वेळानं पाणी पिणं आवश्यक असतं, पण ते अनेकांच्या लक्षात येत नाही. तेव्हा ध्यानात ठेवून पाणी पीत राहायला हवं आणि पुरेसं पाणी प्यावं.