Independence Day 2024, Women Freedom Fighters in India: यंदा १५ ऑगस्ट रोजी आपण भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्यात भारतीय इतिहासात महिलांचे कार्य व योगदान उल्लेखनीय असेच राहिले आहे. आपल्या देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्व पणाला लावले. परंतु, या स्वातंत्र्य सैनिकांमधली काही नावे आपल्याला माहिती आहेत तर काही नावे आपल्याला माहितीदेखील नाहीत. स्वातंत्र्यासाठी काही महिला स्वातंत्र्य सैनिकांनीदेखील आपले आयुष्य वेचले. अनेक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनमोल योगदान देणाऱ्या काही महिलांची माहिती आज आपण घेणार आहोत.

सरोजिनी नायडू –

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी
maharashtra assembly election 2024 cm eknath shinde slams opposition in campaign rally in thane
आम्ही पैसे लाटणारे नाही, तर जनतेचे पैसे जनतेला वाटणारे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा, राजकीय नेत्या आणि महिला हक्कांच्या समर्थक आणि स्वातंत्र्य सैनिक सरोजिनी नायडू या कवयित्री होत्या. स्वातंत्र्यलढ्यात सरोजिनी नायडू यांनी निस्वार्थपणे काम केले आणि महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला.

राणी लक्ष्मीबाई –

“खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी” कवयित्री शुभद्रा कुमारी चौहान यांच्या “झांसी की रानी” या कवितेतील या ओळी राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी सर्वात अचूक आहेत. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते. स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी लढणारी दुर्गा आजच्याच तिथीला अर्थात ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला लढता लढता देवाघरी गेली.

सावित्रीबाई फुले

देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करताना फुले यांनी त्यांना अभ्यास करण्याचे आवाहन केले आणि विशेषत: मागासलेल्या जातींमधून येणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. महिलांना सामाजिक भेदभावातून मुक्त करण्यासाठी शिक्षण हे शस्त्र म्हणून मदत करेल, असे त्या म्हणाल्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. अशा सावित्रीबाई फुले यांचा स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

महादेवी वर्मा –

१९०६ मध्ये एका पुरोगामी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या महादेवी वर्मा या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री, स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. गांधीवादी विचारांचा अवलंब करून त्यांनी अलाहाबादमधील महिलांसाठी निवासी महाविद्यालय, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्य आणि नंतर कुलगुरू म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी सहगल –

१९१४ मध्ये जन्मलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि १९३८ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. एका स्वातंत्र्य सैनिकापेक्षाही सहगल या देशातील जातीवादाच्या विरोधात त्यांच्या प्रयत्नांसाठी ओळखल्या जातात. सुभाषचंद्र बोस यांच्या कृतीच्या आवाहनामुळे स्वातंत्र्य चळवळीकडे वळलेल्या सहगल यांनी नेताजींच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याची पहिली सर्व महिला रेजिमेंट तयार करण्यास आणि कमांड करण्यास मदत केली होती, यामुळेच त्यांना कॅप्टन लक्ष्मी सहगल ही पदवी मिळाली.

बसंती देवी –

पती चित्तरंजन दास यांच्या अटकेनंतर स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्यामुळे, बसंती देवी खिलाफत चळवळ तसेच सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाल्या होत्या. महिलांना शिक्षण देणाऱ्या नारी कर्म मंदिराच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या होत्या. कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथे खादी विकल्याबद्दल त्यांना अल्प कालावधीसाठी तुरुंगवासही भोगावा लागला होता.

उमाबाई कुंदापूर –

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील लढ्यात जास्त समोर न आलेले नाव म्हणजे उमाबाई कुंदापूर. या भगिनी मंडळाच्या संस्थापक होत्या. १९४६ मध्ये महात्मा गांधींनी कस्तुरबा ट्रस्टच्या कर्नाटक शाखेसाठी त्यांची एजंट म्हणून नियुक्ती केली होती.

तारा राणी श्रीवास्तव –

तारा राणी या त्यांचे पती फुलेंदू बाबू यांच्यासह १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात सामील झाल्या. त्यावेळी त्यांनी निदर्शने केली आणि बिहारच्या सिवान पोलिस ठाण्यावर भारतीय ध्वज फडकवण्याची योजना आखली. त्यांनी जमावाला पोलिस ठाण्याच्या दिशेने नेले, तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. यावेळी त्यांचे पती फुलेंदूला मार लागला, तरीही त्यांनी पदयात्रा सुरू ठेवली. मात्र, जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांचा नवरा मृतावस्थेत आढळला.

हेही वाचा >> Paris Olympics 2024: बाईपण भारी देवा! कुणी गरोदर, तर कुणाचं तान्हं बाळ; ऑलिम्पिकमध्ये ‘या’ महिलांच्या कामगिरीमागचा संघर्ष एकदा वाचाच…

अरुणा असफ अली –

अरुणा असफ अली या एक प्रमुख राजकीय नेत्या म्हणून १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात सक्रिय भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्याआधी १९३१ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना पकडण्यात आले आणि नऊ महिने तुरुंगवासही भोगावा लागला.

कमला चट्टोपाध्याय –

कमला चट्टोपाध्याय या महात्मा गांधींच्या विश्वासू म्हणून मोठे पद भूषवणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग असल्याने राष्ट्रवादी चळवळीच्या सक्रिय सदस्य राहिल्या.

ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही.