आपण अशा अनेक उद्योगपतींबाबत ऐकले असेल ज्यांनी शुन्यातून व्यवसायाची सुरुवात केली आणि कोट्यावधीची संपत्ती कमवली. आई-वडिलांच्या या व्यवसायाला त्यांच्या मुलांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर आणखीन वाढवलं आणि उद्योगक्षेत्रात मोठं नाव कमावलं. आज आपण अशाच एका महिला उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी केवळ आपल्या वडिलांचा व्यवसाय वाढवला नाही तर उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळखही निर्माण केली आहे. सुनीता रेड्डी असे या महिला उद्योजकाचे नाव आहे.

हेही वाचा- वडिलांची साथ अन् मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS; कोण आहेत स्वाती मीना? जाणून घ्या खास कहाणी

सुनीता या अपोलो हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि हृदयरोगतज्ज्ञ प्रताप रेड्डी यांच्या कन्या आहेत. प्रताप रेड्डी यांनी १९८३ साली अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझची स्थापना केली. फोर्ब्सच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रताप रेड्डी यांची एकूण संपत्ती २३ हजार कोटी रुपये आहे. तर अपोलो हॉस्पिटल्सचे बाजार भांडवल एकूण ८२ हजार ४९२ कोटी रुपये आहे.

हेही वाचा- विदेशात शिक्षण. उद्योग क्षेत्रात दबदबा; मुकेश अंबानींची भाची इशिता साळगावकर कोण आहेत?

सुनीता यांनी चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून पब्लिक रिलेशन्स, इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्चमधून फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल (HBS), USA येथे ऑनर/प्रेसिडेंट मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला आहे. करिअरबरोबच सुनीता आपल्या आरोग्याकडेही तेवढेच लक्ष देतात. सुनीता यांना इंदूरच्या SAGE विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये मानद डॉक्टरेट मिळाली आहे.

हेही वाचा- ‘ही’ आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला; कमाईच्या बाबतीत अंबानी-अदाणींनाही टाकलं मागे; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

सुनीता या अनेक वर्षांपासून हेल्थकेअर कौन्सिलच्या अध्यक्षा आहेत. भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी काम करणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. आपल्या कारकिर्दीत सुनीता यांनी रुग्णालयांच्या उभारणी आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही रुग्णालये पूर्णपणे नवीन बांधण्यात आली आहेत तर काही अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांचा विस्तार करून नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. सुनीता हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल या दोन्ही शैक्षणिक संस्थाच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.

Story img Loader