Kolkata Rape : कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्काराची ( Kolkata Rape ) घटना घडल्याने सगळा देश हादरला. यामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात भारतातली लोकप्रिय इन्फ्लुएन्सर तान्या खानिजोने एक पोस्ट लिहिली आहे. कृपा करा आणि भारतात येऊ नका असं आवाहन तिने जगातल्या मुलींना केलं आहे. त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

नेमकी काय घडली घटना?

कोलकाता या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape ) करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेने कोलकातासह देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशात लोकप्रिय इन्फ्लुएन्सरने जगभरातल्या मुलींना आणि महिलांना भारतात येऊ नका असं आवाहन केलं आहे. ९ ऑगस्टला कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape ) आणि हत्या प्रकरणात कोलकातामध्ये निदर्शनंही करण्यात आली.

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

तान्या खानिजोची पोस्ट काय?

तान्याने पोस्ट करत म्हटलं आहे, “भारतात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. विदेशांत राहणाऱ्या माझ्या सगळ्या महिला मैत्रिणींना मी आवाहन करते आहे की कृपा करुन भारतात येऊ नका. आमच्या देशात जोपर्यंत महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होत नाही, आमचे नेते त्याविषयीचा कठोर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काहीही झालं तरीही भारतात येऊ नका.” या आशयाची पोस्ट तान्याने केली आहे.

हे पण वाचा- Kolkata Doctor Rape Case : “पीडितेला न्याय देण्याऐवजी…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “कोणत्या विश्वासाने…”

तान्याच्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया

तान्याने केलेल्या या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की बलात्काराची ( Kolkata Rape ) एक घटना घडल्यानंतर तान्या तू लोकांची दिशाभूल का करते आहेस? काहींनी असं म्हटलं आहे की तान्या ही पोस्ट तू केली आहेस पण ज्या राज्यात घटना घडली आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर तू देशाला दुषणं का देत आहेस? असा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे.

तान्याने टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर

तान्याने या पोस्टनाही उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “मी ही पोस्ट केली आहे कारण जोपर्यंत महिला सुरक्षेकडे आपण लक्ष देत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. मी स्वतः देशभरात फिरले आहे. अनेकदा शोषणही सहन केलं आहे. मात्र जोपर्यंत कठोर कारवाईची तरतूद केली जात नाही तोपर्यंत महिलांना आपण सुरक्षित वातावरणात आहोत.” असं म्हणत तान्याने तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तरही दिलं आहे. तान्या पुढे म्हणते, “ही एकच घटना नाही, आत्तापर्यंत अनेक घटना देशात घडल्या आहेत. तुम्ही महिलांना विचारुन बघा मला खात्री आहे की त्या सांगतील की त्यांना कधी ना कधीतरी त्रास सहन करावा लागला आहे.” असं असलं तरीही अनेक लोकांना तान्याची पोस्ट पटलेली नाही. काही जणांनी तिला पाकिस्तानात जाण्याचाही सल्ला दिला.

Story img Loader