अनेकदा आपल्या कानांवर ‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पडत असते. हे वाक्य कदाचित एखाद्या मालिकेतून, सिनेमातून किंवा आपल्या घरातच अनेकदा बोलले जाते. मात्र, समाजाचा असा समज किती चुकीचा आहे हे एका अभ्यासातून समोर आले आहे. जगभरातील स्त्रियांच्या तुलनेत भारतातील गृहिणी घरातील बिनपगाराची कामे ही त्यांच्या जोडीदारापेक्षा किंवा पुरुषांपेक्षा १० पटींनी जास्त करतात, अशी माहिती समोर आली आहे.

अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत विवाहित स्त्रियांवर घरातील कामांचा प्रचंड ताण आणि ओझे असते. हे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा जवळपास दुप्पट आहे, असे म्हणता येईल. तसेच योग्य पडताळणी करून, वरच्या वर्गातील हिंदू, मुस्लिम व शीख स्त्रियांवर अशा बिनपगारी घरगुती कामांचे ओझे सर्वाधिक असल्याचे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ च्या लेखात म्हटले आहे.

4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
Shocking Video madhya pradesh woman jumped from moving train after fighting with her husband
Shocking Video: नवऱ्याशी भांडता भांडता महिलेनं ट्रेनमधून घेतली उडी; लेकरांचा भयंकर आक्रोश अन् थरारक प्रकार कॅमेरात कैद
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
22 floor Hostel for Working Women by mhada
नोकरदार महिलांसाठी २२ मजली वसतीगृह, आचारसंहितेनंतर म्हाडाचा प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’

हेही वाचा : ‘१६ वर्षांच्या’ मुलीने सुरू केली स्वतःची कंपनी! आता करते ‘१०० कोटींची’ उलाढाल! कोण आहे, पाहा…

“जागतिक पातळीवर महिला पुरुषांच्या तुलनेत केवळ तिप्पट काम करतात. मात्र, भारतामध्ये घरातील कामे करण्याचा हा आकडा १० पटींवर जाऊन पोहोचतो. म्हणजेच भारतीय स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेत १० पट अधिक घरकामे करतात,” असे फॅमिली अॅण्ड इकॉनॉमिक इश्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आले आहे.

अभ्यासानुसार, केवळ घरातील मुलांच्या उपस्थितीमुळे एखाद्या महिलेचे काम वाढणे हे एकमेव कारण नसून, विभक्त कुटुंबात राहणे हेदेखील त्याचे अजून एक कारण आहे. ज्या स्त्रिया विभक्त कुटुंबात राहतात अशांना घरातील बिनपगारी कामे तुलनेने अधिक करावी लागतात, असे समजते.

घरगुती कामे करण्यामध्ये वयाचे बंधन न ठेवता, केल्या गेलेल्या अभ्यासानुसार, सहा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या स्त्रिया या घरगुती कामे करण्यासाठी ३०१ मिनिटे घालवतात. मात्र, त्याच तुलनेत पुरुष हे घरातील कामे करण्यासाठी केवळ ९८ मिनिटे घालवीत असल्याचे अभ्यासावरून समजते.

जानेवारी-डिसेंबर २०१९ साली नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) द्वारे केल्या गेलेल्या भारतातील वेळ वापर सर्वेक्षण (२०१९) यातील डेटाचा वापर करून असे समजते की, जन्मदाते माता-पिता हे सासरच्या लोकांपेक्षा अधिक आधार देणारे असतात. या कारणांमुळेही घरातील कामकाजांवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : अपघात, १४ सर्जरी अन् मोडलेला संसार; तरीही जिद्दीने बनली IAS अधिकारी! पाहा प्रीतीची प्रेरणादायी गोष्ट

ज्या घरात महिलाप्रधान कुटुंब असते तिथे जरी स्त्रियांच्या कामांचे प्रमाण कमी असले तरी जेव्हा त्या पुरुषप्रधान कुटुंबात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या कामांमध्ये वाढ होते.

“ज्या कामांचे मूल्य दिले जात नाही किंवा बिनपगारी कामे असतात त्यांना आर्थिक क्रियाकलापांचा भाग म्हणून धरले जात नाही. मात्र, जर अशा कामांची मोजणी केली, तर अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान हे जागतिक जीडीपीच्या १० ते ६०% इतके होईल; जे खरंच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,” असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक बलहासन अली म्हणतात.

दररोज स्वयंपाक करणे, स्वयंपाकाची तयारी करणे, घर स्वच्छ ठेवणे, कपडे किंवा घरातील इतर वस्तूंची सफाई आणि देखभाल इत्यादी अनेक किरकोळ कामांपासून ते घरातील सदस्यांची आणि पाहुणेमंडळींची देखभाल करणे अशा अनेक गोष्टी या बिनपगारी घरकामाच्या यादीमध्ये मोडतात.

ज्या घरांमध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असतात, त्या घरातील स्त्रियांवर मोठ्या कुटुंबात राहणाऱ्या स्त्रियांपेक्षा कामाचे अधिक ओझे असते. तसेच गरीब घरातील स्त्रियांना श्रीमंत महिलांच्या तुलनेत अधिक काम करावे लागते. गरीब घरातील स्त्रिया या साधारण दररोज ३१७ मिनिटे काम करतात; तर श्रीमंत महिला या दिवसाला ३०२ मिनिटे काम करीत असतात. सर्वांत शेवटी ज्या स्त्रिया इतर काम [नोकरी] करीत घरातील बिनपगारी कामे करतात तेव्हा त्यांच्या वेळा या त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि घरगुती वैशिष्ट्यांप्रमाणे बदलत असतात. मात्र, असे असले तरीही प्रत्येक स्त्रीवर बिनपगारी घरची कामे करण्याचा प्रचंड ताण हा असतोच, असे अली सांगतात.