शिकण्याची जिद्ध असेल तर वय, परिस्थिती अशा कोणत्याच गोष्टी अडचण वाटत नाही. भारतात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी अगदी कमी वयात शिक्षणास सुरुवात केली आणि कमी वयातच आपल्या उच्च शिक्षणाचे एक स्वप्न पूर्ण केले. यातीलच एक नाव म्हणजे नयना जैस्वाल. जिने भारतातील सर्वात तरुण महिला पीएचडी धारक होण्याचा मान मिळवला आहे. केवळ शिक्षणातच नाही तर खेळातही तिने आपले वेगळे नाव कमावले. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर एक टेबल टेनिस चॅम्पियन आहे.

नैनामध्ये अगदी लहान वयापासूनच शिक्षणाविषयीची असलेली तळमळ आणि जिद्द दिसून येत होती. ज्या वयात बहुतेक मुले प्राथमिक शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात. त्या वयात म्हणजे वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी तिने १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. वयाच्या १० व्या वर्षात तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले.

GBS Guillain Barre Syndrome suspected patient Karad
कराडमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Out of school tribal girls playing good cricket nagpur
शाळाबाह्य आदिवासी मुलींनी गाजवले क्रिकेटचे मैदान
India's Gongadi Trisha Historic Century first ever century in the History of U19 Women's T20 World Cup
U19 Women’s T20 World Cup: भारताच्या १९ वर्षीय त्रिशाचा वर्ल्ड रेकॉर्ड, महिलांच्या टी-२० विश्वचषकात ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिली फलंदाज
online rte admission process is getting good response with late applicants still eligible
आरटीईमध्ये प्रवेश हवा! अद्यापही अर्ज केला नसेल तर ही सूचना वाचा आणि…
Yannick Sinner made a statement about achieving success on other surfaces after winning the American and Australian championships
अन्य पृष्ठभागांवरही यश आवश्यक -सिन्नेर
Australian Open Tennis Tournament Madison Keys wins title
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: मॅडिसन कीजची मोहोर
Noman Ali becomes first Pakistan spinner to take Test hattrick In PAK vs WI 2nd Test
PAK vs WI: ३८ वर्षीय खेळाडू ठरला पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकिपटू, पाहा VIDEO

यानंतर तिने वयाच्या १३ व्या वर्षी मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात बॅचलर पदवी मिळवली. पण इथेच न थांबता नयनाला आयुष्यात कोणी कधीच साध्य न केलेली कामगिरी करायची होती. तिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून भारतातील सर्वात तरुण पदव्युत्तर पदवीधर म्हणून स्वत:ची उल्लेखनीय ओळख निर्माण केली.

त्यानंतर तिने वयाच्या १७ व्या वर्षी पीएचडीचा प्रवास सुरू केला. ती केवळ २२ वर्षांची असताना भारतातील सर्वात तरुण पीएचडी धारक म्हणून खिताब मिळवण्यात यशस्वी ठरली. यामुळे भारतातील सर्वात तरुण डॉक्टरेट पदवीधारक म्हणून इतिहासात तिचे नाव नोंदवले गेले. याव्यतिरिक्त तिने कायद्याची पदवी देखील घेतली आहे. शिक्षणाबरोबरच नैना ही आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आहे, जी राष्ट्रीय आणि दक्षिण आशियाई चॅम्पियन आहे. तिने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई केली आहे. तिच्या पालकांनी तिने होमस्कूलिंग करावे असा निर्णय घेतला, जेणेकरून तिला खेळताही येईल आणि शैक्षणिकदृष्ट्या तिला आणखी काही करायचे असेल तर त्यातही संतुलन राखू शकेल.

Story img Loader