International Daughters Day 2024 : आज जगभर जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं, मुलींचा जन्मदर वाढावा आणि स्त्री भ्रूण हत्यासारखे प्रकार बंद व्हावेत याकरता कन्या दिन साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत मुलींनी विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. कधी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तर कधी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचं जग उभारलं आहे. राजकारणातही अनेक महिलांनी स्वकष्टाने वरच्या पदापर्यंत मजल मारली आहे. आई-वडिलांकडून राजकीय वारसा घेतलेल्या कन्यांविषयी आज आपण जाणून घेऊयात.

इंदिरा गांधी

भारताचे पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि एकमेव पंतप्रधान राहिल्या आहेत. त्यांनी एकूण १५ वर्षे भारताच्या राजकीय इतिहासात कारकिर्द केली. आयर्न लेडी ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख असून हरित क्रांती, १९५२ चे पाकिस्तानबरोबरचे युद्ध आणि १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीसारख्या महत्त्वपूर्ण घटनांनी त्यांचा कार्यकाळ चर्चेत राहिला आहे.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

प्रियांका गांधी

माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनीही गेल्या काही वर्षांत राजकारणात स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. २०१९ मध्ये त्यांनी औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी झंझावाती दौरे केले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाचं श्रेय प्रियांका गांधी यांना देण्यात आलं होतं.

हेही वाचा >> राजकारणाच्या रिंगणात महिला ‘राज’; जाणून घ्या भारतातील महिला मुख्यमंत्र्यांविषयी

सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या म्हणजे सुप्रिया सुळे. संसद रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुप्रिया सुळे यांनीही राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर त्यांनी शरद पवार गटासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. महिलांच्या समस्या आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सातत्याने कार्य केलंय.

कनिमोझी करुणानिधी

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री द्रविड मुन्नेम कळघम पक्षाचे अध्यक्ष एम करुणानिधी यांची कन्या कनिमोझी यांनी राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे नाव कमावले आहे. त्या राज्यसभेच्या सदस्या असून डीएमकेमधील प्रमुख नेत्या आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या या नात्याने त्या विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिकाही मांडत असतात.

मीसा भारती

मीसा भारती या बिहारच्या माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या आहेत, मीसा भारती या मुख्यमंत्रीही होत्या. तिच्या जन्मावेळीच मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट (MISA)अंतर्गत लालू प्रसाद यादव यांना ताब्यात घेण्यात आले होते मीसा यांनी कुटुंबाच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. वडिलांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाचे प्रतिनिधित्व करून राज्यसभेत खासदार म्हणून काम केले आहे . मीसा यांनी पक्षाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि बिहारच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मेहबुबा मुफ्ती

मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी, मेहबूबा मुफ्ती यांनी तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आणि राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली. राज्यात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा या नात्याने, जम्मू आणि काश्मीरच्या जटिल राजकारणात त्या कायम चर्चेत असतात.