Harassment, bias, maternity leave stop women’s career growth: जागतिक व्यावसायिक सेवा फर्म ‘Aon plc’ च्या अभ्यासाचा हवाला देऊन, The Economic Times ने अहवाल दिला आहे की, महिलांना कामाच्या ठिकाणी असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांना मिळणाऱ्या संधी गमावल्या जातात; ज्या त्यांच्या नियंत्रणाबाहेर असतात.

‘2024 Voice of Women Study India’ नावाच्या या अभ्यासात ५६० कंपन्यांमधील २४,००० व्यावसायिक महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
rape case
खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
Crime against women prostitution in Navale Pool area
नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर गुन्हा, नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
UP Woman Keeps Karwa Chauth Fast, Then Kills Husband By Poisoning Him
Women Kills Husband : धक्कादायक! पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास धरला अन् उपवास सोडताच पतीची केली हत्या; नेमकं काय घडलं?
Delhi Bus Viral Video Woman Threatened To Fire The Conductor From His Job Due To A Verbal Fight With Her shocking video
“ऐ तुझी नोकरी खाऊन टाकेन” कंडक्टरबरोबर भांडताना महिलेनं ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?

यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असूनही बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या करिअरच्या वाढीस अडथळा आणणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील निष्कर्षांवरून असे दिसून आले की, ७३ टक्के महिला अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत; तर ९० टक्के महिलांनी यश मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा… २० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा

तथापि, कामाच्या ठिकाणी पूर्वग्रह, मानसिक थकवा आणि प्रसूतीनंतरची आव्हाने यांमुळे एक वेगळेच आव्हान उभे राहते; ज्यामुळे नोकरी सोडणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध पक्षपात आणि छळ (Bias & harassment against women at workplace)

या अभ्यासात असे दिसून आले आहे की, त्यांच्या करिअरला पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार असूनही, अनेक महिलांना अजूनही कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बाबतीत भेदभावाचा सामना करावा लागतो.

अंदाजे ४२ टक्के महिलांनी पूर्वग्रह किंवा संभाव्य पूर्वग्रहाचा सामना करीत असल्याचे मत नोंदवले; तर ३७ टक्के महिलांनी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी असंवेदनशील वर्तन अनुभवले. अधिक चिंताजनक बाब म्हणजे सहा टक्के महिलांनी (सुमारे १.४०० महिलांनी) किमान एकदा कामावर लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. अर्ध्याहून कमी महिलांनी या घटनांची अधिकृतपणे त्यांच्या बॉसकडे तक्रार करणे पसंत केले, असे अभ्यासात म्हटले आहे.

या निष्कर्षांवरून असे कळून येते की, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक समावेशक असे कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी संस्थांनी तातडीने अधिक मजबूत उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

करिअरच्या प्रगतीवर मातृत्वाचा प्रभाव (Impact of motherhood on career progression)

नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ क्लॉडिया गोल्डिन (Claudia Goldin) यांनी त्यांच्या व्यापक श्रम बाजार संशोधनात दस्तऐवजीकरण केल्याप्रमाणे Aon अभ्यासाने ‘motherhood penalty’सारख्या घटनेवर प्रकाश टाकला.

अभ्यासानुसार ७५ टक्के महिलांना प्रसूती रजेवरून परतल्यानंतर एक ते दोन वर्षांपर्यंत त्यांच्या करिअरमध्ये धक्के सहन करावे लागले. त्याव्यतिरिक्त ४० टक्के महिलांनी खंत व्यक्त केली की, प्रसूती रजा घेतल्याने त्यांच्या पगारावर नकारात्मक परिणाम झाला आणि अनेकांना त्यांच्या पदासंबंधित (roles and responsibility) भूमिका व जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाल्याचे आढळले आणि हे बदल काही त्यांनी स्वीकारलेल्या पदाशी निगडित / जुळणारे नव्हते.

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालचं आंतरधर्मीय लग्न आम्हाला मान्य नाही! अभिनेत्रीचं व्यक्तिस्वातंत्र्य ट्रोलर्सच्या हातात?

हा भेदभाव नेतृत्वाच्या भूमिकेपर्यंत (Roles)देखील विस्तारला गेला आहे. ३४ टक्के ज्येष्ठ महिलांनी पक्षपाताचा अनुभव नोंदवला आहे. त्या तुलनेत एन्ट्री लेव्हल पदांवर असलेल्या १७ टक्के महिलांना अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला. या अभ्यासात पुढे असेही दिसून आले की, अशा पक्षपातीपणाचा सामना करणाऱ्या एक-पंचमांश स्त्रिया एक वर्षाच्या आत त्यांची संस्था सोडण्याचा विचार करतात.

मात्र, या अहवालात आशेचा किरणदेखील दिसत आहे. संस्थांमध्ये महिला नेत्यांची उपस्थिती इतर महिला कर्मचाऱ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकते. महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत पाहिलेल्या सुमारे ५३ टक्के प्रतिसादकर्त्या महिलांना त्यांच्या करिअरमधील संभाव्य भवितव्याबद्दल अधिक आत्मविश्वास वाटला.

समान टक्केवारीत प्रमोशन्स, परफॉरमन्स रिव्ह्यू, भरपाई पद्धती यात कमी भेदभाव दिसून असल्याचेही समोर आले आहे. यामुळे अधिक न्याय्य कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन दिले गेले.