आपण बागेसाठी गरज असलेल्या काही कौशल्यांची माहिती करून घेणार आहोत. उदाहरणार्थ निरीक्षण, वनस्पतीचा अभ्यास, नोंदी आणि प्रयोग इत्यादी

निरीक्षण

बाग चांगली फुलवायची, उत्पादनशील करायची म्हणजे आपले निरीक्षण तेवढेच ताकदीचे असणे गरजेचे आहे. झाडांची होणारी वाढ, त्याला लागणारी कीड, पानांचा रंग, फळा-फुलांची वाढ याची सातत्याने निरीक्षणातून नोंद घेणे गरजेचे आहे. सातत्याने झाडांची पाहणी केलेल्या सरावातून निरीक्षण कौशल्य अवगत होते. फक्त पाणी देणे ही झाडांची गरज नाही. त्यासाठी प्रत्येक झाडाजवळ जाणे, त्याच्याशी संवाद करणे, पाना फुलांचे, बहराचे कौतुक करणे बागेला अपेक्षित असते. त्याने आपल्यालाही समाधान आणि आनंद मिळतो.

Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
The first college in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे पुण्यात! २०० वर्षे जुने हे कॉलेज माहितेय का?
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

हेही वाचा – नवऱ्याच्या घरात भावंडांत दुजाभाव?… कसं वागावं?

वनस्पतीचा अभ्यास…

बाग फुलवण्यासाठीचे दुसरे तंत्र म्हणजे वनस्पतीचा अभ्यास होय. आपल्या वेगवेगळ्या फुलांच्या, फळांच्या, भाजीपाल्याची आवड जोपासताना हा अभ्यास निरंतर चालू ठेवावा लागतो. वनस्पती ओळखणे, त्याची चव, त्याची वाढ किती होते, त्याला किती मातीची, सूर्यप्रकाशाची, पाण्याची किती गरज आहे, त्याचे जीवनचक्र कसे आहे. त्याचे रंगरूप, पुनर्लागवड कशी होते, बियाणांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आपल्या मुलांची जशी काळजी घेतो तशी काळजी घेणे. काय हवे नको ते आपणहून समजून घेणे बागेसाठी गरजेचे आहे. हे कौशल्य हळूहळू जमते. वनस्पतीच्या अभ्यासासाठी आपली बाग, मित्रपरिवार, नातेवाईकांची बाग, नर्सरीतील, जंगलातील झाडे, फळझाडांच्या बागा, पुस्तक, इंटरनेट याद्वारे अभ्यास करता येतो. या ठिकाणी कोणती झाडे कुठे, केव्हा, कशी वाढली आहेत या स्थळ, काळाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हे काम म्हणून न करता ती आवड म्हणून करावे म्हणजे बागेच्या अभ्यासाचा कंटाळा येत नाही.

प्रयोग…

बागेची आवड जोपासताना विविध प्रयोगांची नितांत गरज असते. काय केल्याने काय होते हे प्रत्यक्ष करून पाहिले तरच बाग फुलवण्याचा आनंद घेवू शकतो. कुणी सांगितलेली अथवा ऐकिव माहिती, पुस्तकातील माहिती हे प्रत्यक्ष प्रयोग करून तपासून घेतली पाहिजे. आधीच्या प्रयोगात आपल्या स्वत:च्या कल्पनांची भर टाकावी. म्हणजे प्रयोगकरता येतात. मुद्दामहून चुका कराव्यात म्हणजे त्यातून येणारे परिणाम हे चांगलेच लक्षात राहतात. तसेच अभ्यासाला येतात. बरंच नवीन ज्ञान आपल्याला मिळते आणि त्या बागेला फुलवण्यास मदतगार होतात. अशी विविध प्रयोगांतूनच निसर्गाचं चमत्कारिकपण आपल्याला अनुभवायला मिळतात आणि निसर्गाच्या कल्पकतेविषयी, त्याच्या रचनेविषयी आपण हरखून जातो.

हेही वाचा – चल ना गडे ‘पिकनिक’ला!

नोंदी…

बाग तयार करताना बरेचदा नव्याने सुरुवात करतो. आपल्याला येणारे अनुभव, निसर्गाचे चमत्कारिकपण आपण रोजच्या कामात विसरून जातो. अशा वेळेस सुरुवातीला आपल्या बागेची लिखित स्वरुपात नोंदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोंदवही हाताशी असू द्यावी. गरज पडल्यास त्याचे डिजिटल फोटो काढून ठेवावेत. बागेतील बदलाविषयी, झाडांच्या वाढीविषयी, त्याच्या लागवडीविषयी, फळधारणे विषयी अशा अनेक नोंदी दिवस, आठवडा, पंधरावड्यानुसार नोंदी करू शकतो. आठवडा-पंधरा दिवसांतून ही नोंदवही चाळावी. एकदा लक्षात ठेवण्याची सवय जडली की नोंदवही बाजूला पडते. पण बागेची नोंदवही करण्याची सवय पाळल्याने माहितीचे ज्ञानात रुपांतर होते.

सोशल मीडिया…

बाग फुलवणे ही माणसाची गरज आहेच. पण आज निसर्गाचीही गरज झाली आहे. माणसापेक्षा निसर्गच आपल्या जवळ येण्याला आसुसलेला आहे. त्याची थोडीशी घडी बसवून दिली की निसर्ग जोमाने आपल्या घरात फुलवता येतो. अशा या उपयोगी निसर्गाचे कौतुक म्हणून काढलेले दोन चार फोटो इतरांनाही प्रेरणादायी ठरतात. तेव्हा आपल्या बागेचे फोटो सोशल मीडियावरह नक्की शेअर करा. आपल्याला मिळालेली माहिती, ज्ञान इतरांनाही द्या. आपण स्वत: समृद्ध झाल्याची तृप्तता अनुभवायास येईल.

(sandeepkchavan79@gmail.com)