Women’s Day Gift Ideas: आजच्या काळातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. काही क्षेत्रांमध्ये त्या पुरुषांना मागे टाकत आहेत. त्या ऑफिसमध्ये काम करुन नंतर घर देखील सांभाळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तवणूकीचे प्रमाण वाढले आहे. अशात घराबाहेर असताना कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी सोबतीला सेफ्टी गॅजेट्स असणे फायदेशीर ठरते. ८ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने आई, बहिण, बायको किंवा मैत्रिण यांना हे सेफ्टी गॅजेट्स भेट म्हणून देऊ शकता.

पेपर स्प्रे गन (Pepper Spray Gun)

महिलांच्या स्व-संरक्षणासाठी पेपर स्प्रे वापरण्याला कायद्याने परवानगी दिली आहे. ही गन सामान्य पेपर स्प्रेपेक्षा वेगळी असते. सामान्य पेपर स्प्रे डोळ्यांवर मारल्याने गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो. पण या विशिष्ट पेपर स्प्रे गनच्या वापरामुळे त्याचे डोळे आणि चेहऱ्याची त्वचा प्रभावित होतात आणि तेथे जळजळ व्हायला लागते. याचा वापर फक्त दोनदा करणे पुरेसे ठरते. एकाच वेळी जास्त वापर केल्यास काही सेकंदांमध्ये बाटली रिकामी होऊ शकते.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
What is the 4B movement that started in South Korea
स्त्री ‘वि’श्व : ‘४ बी’ चळवळ समजून घेताना…
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये महिलांचं प्रमाण का कमी आहे? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Women in Defence Forces : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये महिलांचं प्रमाण का कमी आहे?

सेफर स्मार्ट पेन्डंट (Safer Smart Pendant)

SAFER नावाच्या या लहानशा पेन्डंटचा वापर वेळ प्रसंगी मदत मिळवण्यासाठी करता येतो. संकटसमयी या पेन्डंटवर दोनदा क्लिक केल्यावर यामार्फत सुरक्षित नसल्याचा एक मेसेज आईवडील आणि जवळच्या मित्रांपर्यंत पोहोचतो. त्या मेसेजमध्ये लोकेशनची माहिती दिलेली असते. या लहानशा पेन्डंटची नेहमीच मदत होईल.

आणखी वाचा – International Women’s Day ‘८ मार्च’ रोजी साजरा करण्यामागे खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर..

सेफ्टी टॉर्च (Safety Torch)

ही रिचार्जेबल सेफ्टी टॉर्च छोट्या बॅगेमध्ये मावते. एलईडी फ्लॅश लाइटमध्ये छुप्या पद्धतीने इलेक्ट्रिक शॉक देण्याची सोय आहे. याच्यामार्फत दिल्या गेलेल्या व्होल्टेजमुळे एखादी व्यक्ती काही मिनिटांसाठी हादरुन जाऊ शकते. बिकट प्रसंग आल्यावर समोरच्या व्यक्तीला सेफ्टी टॉर्चद्वारे विजेचा झटका देऊन स्व:संरक्षण करता येईल.

ई-अलार्म साउंड ग्रेनेड (E-Alarm Sound Grenade)

ई-अलार्म साउंट ग्रेनेड हा २० ग्रॅम वजनाचा १२० डेसिबलपर्यंत आवाज करणारा सायरन आहे. या उपकरणाच्या आवाजाने १०० मीटरच्या आत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचेलक्ष वेधून घेता येते. याच्या आवाजामुळे चोरी, बलात्कार, लुटमार किंवा अन्य कठीण प्रसंगाच्या वेळी आसपासच्या लोकांची मदत मिळवणे शक्य होते. काही वेळेस स्मार्टफोनपर्यंत पोहचणे शक्य नसते अशा वेळी बॅगेमध्ये ठेवलेल्या साउंड ग्रेनेडची मदत घेऊ शकता. हा मोठा आवाज करण्यासाठी ग्रेनेडची पीन खेचावी लागेल.

आणखी वाचा – International women’s day 2023 यशस्विनी : भाजीविक्रेती ते प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ; डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांचा थक्क करणारा प्रवास

सेफ्टी रॉड्स (Safety rods)

हे उपकरण म्हणजे फोल्डिंग मेटल रॉड्स आहेत. वजनाने हलक्या असलेल्या या रॉड्सच्या एका झटक्याने हल्लेखाराला दुखापत होऊ शकते. सेफ्टी रॉड्सचा आकार मोठा असल्याने त्या बॅगेमध्ये मावत नाही. गाडीमध्ये हे उपकरण ठेवता येते. रस्त्याने लांबचा प्रवास करताना या फोल्ड होणाऱ्या रॉड्सची मदत होऊ शकते.

ही सर्व उपकरणे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करु शकता. या सेफ्टी गॅजेट्सच्या किंमतीची सुरुवात फक्त ५०० रुपयांपासून होते.

Story img Loader