माझी ओळख मॉडेल -अभिनेत्री अशी जरी असली तरी मी नम्रपणे सांगू इच्छिते मी एक बिझनेस वूमन देखील आहे. हैद्राबाद येथे २ आणि विशाखापट्टणम येथे २ अशा ४ आधुनिक जिम आहेत.
मी ग्लॅमर क्षेत्रात आल्याने फिटनेस फ्रीक आहे अशातला भाग नाही. आम्ही दिल्लीकर. माझे वडील आर्मीत असल्याने जन्मापासूनच अत्यंत शिस्तप्रिय वातावरण आमच्या घरी होते, अजूनही आहे. सकाळी वेळेवर उठण्यापासून ते ब्रेकफास्ट, जेवणाच्या वेळा, व्यायाम सगळे ठरल्या वेळी होत असे. व्यायाम केल्याशिवाय कुणालाच जेवण मिळत नसे. याच सवयी नियमित दिनचर्येच्या अपरिहार्य भाग कधी बनल्या हे समजले नाही. जे उत्पन्न तुम्हांला मिळेल त्यातील काही भाग भविष्याच्या तजविजेसाठी ठेवला पाहिजे हाही संस्काराचा भाग होता, म्हणूनच मी जेंव्हा माझ्या कारकिर्दीची सुरुवात आधी मॉडेल आणि नंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून केला, तिथे नावारूपाला आले, मला चांगले मानधन मिळू लागले तेव्हा मी माझ्या उत्पन्न्नाचा काही भाग ‘फिटनेस’इंडस्ट्रीमध्ये गुंतवला, आणि जिम सुरु केल्या.
मुंबईत स्थायिक होऊन मला अवघी ३ वर्षं झालीत, पण अभिनयाच्या क्षेत्रात मला १० वर्षं झालीत. त्यामुळे हैदराबादला मी स्वत:चे फ्लॅट घेतले आणि तिथेच स्थायिक झाले. माझी सुरुवातीची सगळी वर्षं हैद्राबाद, चेन्नई येथे साऊथ फिल्म्स करण्यात गेलीत. बॉलिवूड फिल्म्स जेव्हा मला नियमित रूपात मिळू लागल्या तेव्हा मी मुंबईत स्वतःचा फ्लॅट घेतला.
मी पंजाबी भाषिक (शीख ) असूनही साऊथ फिल्ममधे आघाडीची अभिनेत्री म्हणूनच नावारूपाला आले. साऊथमध्ये वक्तशीरपणे काम चालतं. कलाकारांमध्ये एकोपा जाणवतो. गेली २ वर्षं मी बॉलिवूड फिल्म्स करणं एन्जॉय करू लागले आहे . मला व्यक्तिशः शांत, प्रदूषणविरहित वातावरण खूप प्रिय आहे. दर ३-४ महिन्यात मी ‘शॉर्ट ब्रेक’ घेते आणि अशा पर्यटन स्थळी जाते जिथे खूप शांतता असेल. आणि मी मेडिटेशन, योगा सहज करू शकेन. गेल्या काही महिन्यापूर्वी मी शिलिमला गेले होते. तेथे आयुर्वेदिक रिसॉर्ट आहे, खूप आवडले मला तिथे जाणे ! सिटी लाईफ मला फारसे आवडत नाही.
मम्मी कह्ती है, मै बचपनमें टॉम बॉय थी। स्पोर्ट्समध्ये आघाडीवर होते. आमच्या घरात प्रत्येकाला आपले विचार खुलेपणाने मांडण्याची पूर्ण परवानगी असल्याने मी काय करावं हा माझ्या आवडीचा प्रश्न असेल असे ठरले. आईनेच मला सुचवलं मी अभिनयक्षेत्रात जावं. सौन्दर्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर मी अभिनयात नाव कमवू शकेन असं आईचं मत होते. तिचा विचार सगळ्यांना पटला. आईनेच माझा ‘मिस इंडिया’ सौन्दर्य स्पर्धेसाठी फॉर्म भरला ज्यात मी रनर अप ठरले, आणि मग माझ्याकडे अनेक जाहिरातींचा येऊ लागल्या. ओघ वाढला. अनेक जाहिरातीत माझा चेहरा झळकला असला पण मला पहिला ब्रेक मिळाला तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत. अने फिल्म्सचे प्रस्ताव आले. मला मला दाक्षिणात्य भाषा येत नाहीत, मी त्या फिल्म्स कशा करू, हा प्रश्न मला पडला, पण इथेही माझं मनोबल घरच्यांनी वाढवलं. हल्ली भाषा हा करियरचा ‘बॅरियर’ठरू शकत नाही, हे पटलं आणि एका मागोमाग मी त्यांच्या फिल्म करू लागले. तिथे सुपर स्टार ठरले. एका आर्मी ऑफिसरच्या मुलीने अभिनयाची पार्श्वभूमी नसताना यशाची पायरी गाठली खरी !
अलीकडेच अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्या सह ‘रनवे -३४’ या चित्रपटाला लक्षवेधी यश लाभलं. झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर माझा ‘छत्रीवाली’ सिनेमा रिलीज झाला त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट ‘सेक्स एजुकेशन’ विषयवार महत्वाचे भाष्य करतो. लोकशाहीत स्त्रियांना ५० टक्के महत्व आहे, मग वैवाहिक नात्यात स्त्रियांना मातृत्व कधी हवे अथवा कधी नको हे ठरवण्याचा अधिकार का नाही? कमी वयात मातृत्व स्त्रियांवर खूपदा अनिच्छेने लादले जाते ज्याचा तिच्या शरीरावर-मनावर परिणाम होतो, हे सगळे टाळायचे असल्यास सेक्स एजुकेशन अतिशय महत्वाचे आहे हे हा चित्रपट अधोरेखित करतो. या सिनेमाच्या शूटिंगसाठी मी पुण्यात एका कॉन्डोम फॅक्ट्रीत शूटिंग करत होते, या या फॅक्टरीत स्त्रियांच काम करतात हे विशेष !
अशा धाडसी, आऊट ऑफ द बॉक्स विषयांचे सिनेमे करणं मला नेहमीच आवडतं. आज सिनेमा आणि उद्योग या दोन्ही आघाड्यांवर मी छान मुशाफिरी करते आहे. त्याचा आनंद एन्जॉय करते आहे.
Written by पूजा सामंत