पूजा सामंत

प्रदीर्घ कालावधीनंतर मी माझ्या जन्मभूमीत, भारतात परतले, ‘सिटाडेल’ या माझ्या वेब शोचे प्रमोशन हा दौऱ्याचा मुख्य हेतू. ‘ॲमेझॉन’ची प्रस्तुती असलेल्या ‘सिटाडेल’ शोची चर्चा जगभर चालू आहे. रस्सेल ब्रदर्स (अँथनी एन्ड जो) यांनी या वेब शोची निर्मिती केली असून माझ्यासह रिचर्ड मद्देन, स्टॅनली तुसी, डेव्हिड वी या अमेरिकी कलावंतांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हिंदी ‘सिटाडेल’ आवृत्तीत सिकंदर खेर, सामंथा रूथ प्रभू तसेच वरुण धवन यांसारख्या कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत. मी दोन्ही आवृत्त्यांमध्ये आहे.

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
govinda misses diwali celebration
गोविंदाने साजरी केली नाही यंदाची दिवाळी, कारण सांगत पत्नी सुनीता आहुजा म्हणाली…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
rajpal yadav apologies fans
Video: अभिनेता राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी हात जोडून मागितली माफी, नेमकं काय घडलं?
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”
raj kapoor prepare dimple kapadia look in bobby
‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”
Amy Jackson Announces Pregnancy
पहिल्या रिलेशनशिपमधून ५ वर्षांचा मुलगा, दोन महिन्यांपूर्वी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

‘सिटाडेल’ ही अमेरिकी शोची फ्रेंचायजी आहे. याचं चित्रीकरण आधुनिक पद्धतीने होतं. सगळे कलावंत, टेक्निशियन तब्बल ४०० जणांचा क्र्यू एकमेकांच्या संपर्कात असतात. सगळ्या तांत्रिक अडचणी तात्काळ सुटाव्यात, काही सृजनात्मक कल्पनांची तात्काळ देवाणघेवाण व्हावी, अशा आधुनिक पद्धतीने ऐकण्याची साधने लावलेली असतात, त्यामुळे अशा वेब शोचे चित्रीकरण हा एक अद्भुत अनुभव असतो.

मी ‘सिटाडेल’ मालिकेत गुप्तहेराची व्यक्तिरेखा करतेय. ५-६ वर्षांपूर्वी अमेरिकेतच प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘क्वांटिको’ने माझ्या हॉलीवूड भूमिकांची सुरुवात झाली. ‘क्वांटिको’ने मला नाव मिळवून दिलं, प्रसिद्धी दिली. तेव्हापासून मला हॉलीवूडमध्ये ऑफर्स येतच आहेत. हॉलीवूडमधील माझ्या कारकीर्दीमुळे माझी आणि निक जोनास या गायक संगीतकाराची ओळख झाली, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आम्हाला एक मुलगी आहे, मालती मारी. अलीकडेच तिनं एक वर्ष पूर्ण केलं. मातृत्व आणि करियर यांचा सुवर्णमध्य साधत मी सध्या माझ्या आयुष्याचा आनंद घेतेय. मातृत्वानंतर करियर आणि मुलाचं संगोपन यात समतोल राखला तर त्या आईला दुहेरी आनंद मिळेल, असं मला नेहमी वाटतं.

आणखी वाचा-सलमान खान, आता मेंदूचीच साफसफाई करावी लागेल!

माझा पहिला डेब्यू होता एक तमिळ चित्रपट, त्यानंतर अनिल शर्मा यांचा ‘द हिरो – द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ चित्रपटापासून माझ्या बॉलीवूड कारकीर्दीला सुरुवात झाली. माझे आईवडील दोघेही डॉक्टर, चोप्रा कुटुंबातील बरेच सदस्य आर्मीमध्ये, त्यामुळे माझा फिल्मी दुनियेशी अजिबात संबंध नव्हता. कुठल्याही ॲक्टिंग स्कूलमधून जाऊन मी अभिनय शिकले नाही. अभिनय करता करता, मला जे बरे-वाईट अनुभव आलेत त्यातून मी शिकत गेले, घडत गेले. आज मला ‘हॉलीवूड ॲक्ट्रेस’ म्हणून ओळखलं जात असलं, तरीही माझा पाया हिंदी चित्रपटच आहेत हे मी अभिमानाने सांगेन. हिंदी चित्रपटसृष्टीतला माझा शेवटचा चित्रपट, ‘द स्काय इज पिंक’ २०१९ मध्ये रीलीज झाला होता. या सिनेमाचे शूटिंगदेखील बरेचसे भारताबाहेरच झाले. आता पुढचा कधी माहीत नाही.

अलीकडच्या ४-५ वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत खूपसे बदल झपाट्याने झाले; सकारात्मक झाले. या बदलांची मुख्य पार्श्वभूमी आहे, ओटीटी प्लॅटफॉर्मचा उदय आणि भरभराट! करोनाकाळात घरोघरी ओटीटी हाच मनोरंजनाचा मुख्य मार्ग होता, ज्यात या माध्यमाने अतिशय वैविध्यपूर्ण आणि सकस मनोरंजन पुरवलं. याच माध्यमाने स्त्री कलाकारांना दर्जेदार, कसदार आणि महत्त्वपूर्ण भूमिका दिल्या, देत आहे. ओटीटी माध्यमावर कलाकारांचे लुक्स, त्यांचे स्टारडम, त्यांची लोकप्रियता यातले काहीही लक्षात घेतले जात नाही. खऱ्या अर्थाने इथे व्यक्तिरेखा, स्क्रिप्ट अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतात, त्यामुळे हा बदल सुखावह आणि ट्रेन्डसेटर ठरला. कुठला कलाकार कुठल्या कॅम्पमधून आला आहे, त्याची लास्ट रीलीज फिल्म हिट होती की फ्लॉप हे न पाहता तो जर त्या व्यक्तिरेखेसाठी योग्य ठरत असेल तर अनेकदा ऑडिशनद्वारे कास्टिंग केलं जातं, त्यामुळे पूर्वी ज्यांना काम मिळत नव्हतं त्यांनाही आता सुगीचे दिवस आलेत.

आणखी वाचा-गॉडफादर नाही, तरीही!

माझ्या आधीच्या काळात म्हणजे १९९०-२००० मध्ये माधुरी, श्रीदेवी या अभिनेत्रींनी स्वतःचं जे स्थान निर्माण केलं ते त्यानंतर अनेकींना मिळू शकलं नाही, कारण नायिकाप्रधान चित्रपट फार कमी बनतात, जे बनतात त्यातही कमालीची चुरस असते! हल्लीच्या पिढीत दीपिका पादुकोण, विद्या बालन, आलिया भट्ट अशीच २-३ नावं समोर येतात, पण याचा अर्थ असा नाही की, अन्य अभिनेत्री अभिनयात कमी आहेत! असो, पण ओटीटीमुळे प्रौढ, वयस्क कलाकारांनाही उत्तम भूमिका मिळू लागल्या आहेत. हा बदल नव्या बॉलीवूडचा आहे, जो मला प्रोत्साहित करतो.

मला असं वाटतं, करियरच्या सुरुवातीची ८-१० वर्षं टीनएजरच्या भूमिका केल्यानंतर व्यक्तिरेखांच्या प्रगल्भतेचा स्तर वाढला पाहिजे. आयुष्यभर नाचणं, गाणं किंवा हिरोसाठी स्वप्नरंजन करणं यातच नायिकेने तिची इतिकर्तव्यता मानायची का? आघाडीच्या नायिका यापेक्षा जास्त डिझर्व्ह करत नाहीत का? यातून बाहेर पडणं मला महत्त्वाचं वाटत होतं. अनुष्का शर्मा, दीपिका, आलिया या सगळ्या अभिनेत्री स्वतः निर्मात्या झाल्यात हे विशेष. मी तर जन्माने पंजाबी असून दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा- …आणि अभिनेत्री असूनही ‘ती’ आम्हाला आमच्यातलीच वाटली!

‘बॉलीवूड ते हॉलीवूड’ हा बदल, हे माझे संक्रमण रातोरात घडलेले नाही. मी भारतात राहात होते, काम करत होते, त्या वेळी मी नियुक्त केलेले माझे एजंट माझ्यासाठी हॉलीवूडमधील दिग्दर्शकांना भेटत होते, त्यांच्या वेळेनुसार मी त्यांना अमेरिकेत जाऊन भेटत होते. माझे येथील काम, भूमिका त्यांना दाखवत असे. माझे काम त्यांना पसंत पडल्यास आणि त्यांनी देऊ केलेली भूमिका मला पसंत पडल्यास मी होकार देत असे. यात बराच वेळ गेला. अर्थात पेशन्स, व्यवहार, गुडविल आमच्या व्यवसायात अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

विशेषतः एखादा भारतीय कलाकार ग्लोबली काम करतो तेव्हा काळजीपूर्वक, विचारपूर्वक, चोखंदळपणे वागणं माझे कर्तव्य आहे. आता मी आई, मुलगी आणि भारतीय अभिनेत्री आहे आणि अमेरिकेची सूनही आहे. भारत आणि अमेरिका माझ्यातील कलाकार घडवत आहेत. लवकरच माझ्या अधिक सशक्त भूमिका लोकांसमोर येतील.

samant.pooja@gmail.com