प्रियदर्शिनी मुळ्ये

मूल जरा जाणतं झालं की कुटुंबातील मोठी माणसं त्याला वळण आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, चांगले संस्कार देतात! यात आईची भूमिका अर्थातच महत्त्वाची असते. कारण कळती झालेली लहान मुलंही आईला धरून राहतात. आई त्यांची सगळ्यांत लाडकी तर असतेच, पण आईला ती बऱ्याच बाबतींत आदर्श मानत असतात.

There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात

बोलण्या-वागण्याची शिस्त, समज, समाजात वावरण्याचे संस्कार आणि शिस्त लावताना तुम्ही तुमच्या मुलाला ‘अर्थसाक्षर’ बनवणं ही आता काळाची गरज आहे! पैसा हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्थिक व्यवहार, गुंतवणुकी, खर्च हे योग्य प्रकारे केले, तर आयुष्य नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे जगता येतं. परंतु यासाठी पैसा, त्याचं महत्त्व, तो मिळवण्यामागचे कष्ट, खर्च आणि गुंतवणुकीचे मार्ग हे मुलांना लहानपणापासून नीट समजले पाहिजेत. तर बघू या, कशा प्रकारे तुम्ही मुलांना अर्थसाक्षर करू शकाल, ते.

१) पैसा या संकल्पनेची ओळख करून द्या

मूल अनुकरणातून जास्त शिकतं. पैसा हे असं माध्यम आहे, ज्यामुळे आपल्याला विविध वस्तू आणि सेवा मिळतात. तुम्ही बाजारात खरेदी करताना, एखादी सेवा घेताना तुमच्या मुलाला सोबत घ्या. वस्तूच्या किमतीतले चढउतार, प्रकारानुसार बदलत जाणाऱ्या किंमती आणि त्यासाठी तुमची आर्थिक क्षमता, यामुळे पैशाचं महागाई मूल्य समजायला मुलांना मदत होईल.

२) बचतीची संकल्पना आणि आवड

‘ गुल्लक ‘ अथवा piggy bank तुमच्या मुलाला जरूर द्या! वाढदिवस, सणवारप्रसंगी नातेवाईकांकडून मिळणारे रोख स्वरूपातील गिफ्ट इत्यादी तुम्ही त्या piggy bank मध्ये जमा करा . यामुळे ‘बचत’ या संकल्पनेशी मुलांची ओळख होईल.

३) बँकेत बचत खातं उघडा

वयाच्या साधारण १२-१३ व्या वर्षी तुमच्या मुलाचं/मुलीचं बँक खातं उघडा. त्याआधी उघडलं तरी चालेल, पण या वयात बँक व्यवहार, विविध प्रकारची खाती, चेक, इत्यादींशी तुमच्या मुलांची प्रत्यक्ष ओळख करून द्या.  त्याच्या piggy bank चे पैसे तुम्ही त्याच्या बचत खात्यामध्ये जमा करू शकता.

४) मुलाचे खर्चिक हट्ट पुरवण्याआधी विचार करा

मुलं अल्लड असतात. त्यांना एखादी गोष्ट आवडली की ती हवीशी वाटते. तुम्ही ती त्यांना अवश्य द्या, पण ती जर महाग, खर्चिक असेल, तर तुम्ही त्यांना सोपी सोपी उद्दिष्ट देऊन , ती पूर्ण झाल्यावर मग ती वस्तू त्यांना बक्षीस स्वरूपात द्या. यामुळे मुलांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाट पाहण्याची सवय लागेल आणि ती मिळवण्याचा आनंद कसा वेगळा असतो हेही उमगेल.

५) ‘बजेट’शी ओळखा करून द्या आणि शिकवा

तुमच्या मुलाला तुम्ही जर पॉकेट मनी देत असाल, तर त्यातून त्यांना त्यांचे वरखर्च भागवायला निक्षून सांगा. यामुळे त्यांना ‘गरज’ आणि ‘इच्छा’ यातील फरक समजेल, कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करणं गरजेचं आहे हे कळेल आणि त्यातून बजेटसुद्धा कळात जाईल.

६) कुटुंबात आर्थिक चर्चा करा

कुटुंबात जसा इतर विषयांवर मोकळा संवाद होतो, तसाच तो ‘आर्थिक’ विषयांवरही होऊ द्या. कौटुंबिक उत्पन्न, खर्च, महागाई, तुमचं बजेट, इत्यादी गोष्टींची हलक्याफुलक्या चर्चेतून ओळख करून द्या. यामुळे मुलांना वास्तवाचं भान राहील.

७) मुलांसाठी गुंतवणूक करा आणि त्याची ओळख करून द्या

बचतीबरोबर तुम्ही मुलांना गुंतवणुकीची ओळख करून द्या. त्यांचे बचतीचे पैसे तुम्ही पोस्ट ऑफिस गुंतवणुकी, बँक एफडी, सुयोग्य म्युच्युअल फंड, इत्यादी ठिकाणी गुंतवू शकता. पैसा बचतीसोबत तो गुंतवणुकीमुळे वाढू शकतो हे त्यांना हळूहळू समजेल. मुलं अनुकरण करतात आणि शिकतात. आर्थिक बाबतीत ती तुमचं योग्य अनुकरण करतील यासाठी सजग रहा!

पालक काय करू शकतील?

१) आपण कधीतरी मुलांना जवळच्या दुकानातून किंवा भाजीवाल्याकडून काही किरकोळ वस्तू आणायला पाठवतो. तेव्हा त्यांना दिलेले पैसे आणि शिल्लक पैसे यांचा हिशेब सांगायला लावा. 

२) तुमच्याबरोबर त्यांना आवर्जून खरेदीला न्या. आपण आज किती पैसे खर्च केले, हे त्यांना बघू द्या. दुकानातून मिळणाऱ्या पावत्या हाताळू द्या, वाचू द्या.

३) हे साधे संवाद पहा- “अरे, मागच्या आठवड्यात आपण टोमॅटो घ्यायला गेलो, तेव्हा भाजीवाला १५० रुपये किलो म्हणाला होता. आज बघ तो ‘टोमॅटो २० रुपये किलो’ असं ओरडतोय.”

किंवा

“आपण परवा फ्रीजमध्ये ठेवायला पाणी प्यायच्या प्लास्टिकच्या बाटल्या आणल्या होत्या. त्या बाटलीवर बघ, ४० रुपये किंमत लिहिलीय. काल आपण ट्रिपमध्ये ‘बिसलरी’ची बाटली घेतली, ती फक्त २० रुपयांना मिळाली. पण ती फार दिवस वापरता येणार नाही. काही दिवसांनी फेकून द्यावी लागेल. आपल्या फ्रिजमधल्या बाटल्या भरपूर टिकतील!”

ही अगदी साधी, रोजच्या जगण्यातली उदाहरणं! तुम्हाला अशी आणखी कितीतरी उदाहरणं सापडतील. लहान मुलांना अशा प्रत्येक घटनेमागची कारणं विस्तारानं आत्ता नाही समजली तरी चालेल. पण प्रत्येक विक्रीयोग्य वस्तूला एक किंमत असते, ती प्रसंगानुरूप वर-खाली होऊ शकते, वस्तूच्या प्रतीवर/ दर्जावर किंमत अवलंबून असायला हवी, अशा साध्या गोष्टी लहान वयापासून मुलांनाही कळू लागतील.

 (लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

priya199@gmail.com

Story img Loader