सोनं हा आपल्या भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही स्त्रियांना सोन्याचं विशेष प्रेम असणं सार्वत्रिक दिसतं. थोडे थोडे पैसे जमवून सण-समारंभ, लग्नसराईसाठीसाठी सोन्याचा नवा दागिना घेणं, जुने दागिने मोडून त्यातून नवा दागिना करणं आणि मुख्य म्हणजे दागिने घालून छान नटून मिरवणं बहुसंख्य स्त्रियांच्या आवडीचं. पण सोनं ही नुसती आवड नसते, तर आपण त्याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहतो. विशेषत: स्त्रियांसाठी त्यांच्या स्वत:च्या लग्नात त्यांच्याबरोबर सासरच्या घरी येणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांपासून- अर्थात ‘स्त्रीधना’पासून ही गुंतवणूक सुरू होते. काहीही झालं तरी ही गुंतवणूक गाठीशी आहे, हा दिलासाही स्त्रीच्या मनाला कायम असतो. या भावनिक आणि व्यावहारिक अशा दुहेरी पैलूमुळे सोनं केवळ दागिन्यापुरतं राहात नाही. त्यामुळेच सोन्यातल्या गुंतवणुकीबाबतच्या काही गोष्टी खास करून स्त्रीनं (आणि सर्वांनीच) आवर्जून जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही या खरेदीबाबत जागरूक राहाल आणि तुमची कुणी फसवणूक करत असेल तर ते वेळीच ओळखणं तुम्हाला शक्य होईल.

आणखी वाचा : जिंदादिल मास्टरशेफ उर्मिला बा!

Gold and silver prices rise by Rs 3,100 per 10 grams and Rs 4,000 per kilogram in the past week.
Gold Rate : आठवड्याभरात सोन्याचे भाव हजारो रुपयांनी वाढले, चांदीही चकाकली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
pune senior citizens looted loksatta news
पुणे : ज्येष्ठ नागरिक चोरट्यांचे ‘लक्ष्य’, मोफत साडी, धान्य वाटपाचे आमिष
Gold silver price
Gold silver Rate Today : सोन्याचा दर ८१ हजारावर, चांदीही महागली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील २२, २४ कॅरेट सोन्याचा दर
Nagpur Gold price know today rate
सोन्याचे दर नवीन उच्चांकीवर… हे आहे आजचे दर…
gold silver price hike today
Gold silver Rate Today : ग्राहकांनो, सोन्याचा दर ८० हजाराच्या पार, चांदीचाही वाढला भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहताना पुढील गोष्टी विचारात घ्या-
१. सोनं हा एक गुंतवणूक प्रकार असून त्याचा परतावा हा थेट त्याच्या बाजार मूल्यावर अवलंबून असतो. सोन्याचं बाजारमूल्य अनेक कारणांनी- उदा. अर्थव्यवस्थेतले बदल, राजकीय घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती इत्यादींमुळे बदलत राहातं. या सर्व गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात.
२. सोनं नेहमी चांगला परतावा देईलच असं नाही. त्यामुळे सध्याचा चांगला परतावा पाहून त्यात घाईनं गुंतवणूक करू नका.
३. सोनं गुंतवणुकीसाठी खरेदी करताना ते खरेदी करण्याचा उद्देश आणि गुंतवणूक कालावधी निश्चित करा. त्याद्वारे तुम्हाला ते गुंतवणूक करण्याचं माध्यम ठरवता येईल.

आणखी वाचा : महिलांसाठी अनुकूल शहरांत पुणे दुसऱ्या क्रमांकावर… चेन्नईचा पहिला क्रमांक!

आता पाहू या, की सोनं गुंतवणूक तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता?
१) फिजिकल किंवा ऑफलाईन पद्धत
यात तुम्ही तुमच्या सोनाराकडे/ नेहमीच्या सराफी पेढीत जाऊन बाजारभावाप्रमाणे नाणी, एखादा दागिना अथवा बार, वळी या रुपात सोनं खरेदी करू शकता. हे सोनं तुम्हाला अर्थातच तुमच्या बँक लॉकरमध्ये सांभाळून ठेवावं लागतं. भविष्यात तुम्हाला कधी गरज लागेल तेव्हा किंवा एखाद्या विशेष प्रसंगी दागिना तयार करण्यासाठी ही नाणी अथवा बारचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे सोनं गुंतवणूक करणं खरंतर जोखमीचं ठरतं, कारण ते स्वतः सांभाळावं लागतं आणि चोरीपासून सुरक्षित ठेवावं लागतं. तसंच दागिना घडणावळ किंवा ते सोनं विकताना येणारी घट अनेकदा नुकसानकारक ठरते.

आणखी वाचा : स्त्रिया आणि अर्थसाक्षरता : मैत्रीणींनो, आरोग्य विमा काढलात का?

२) सोव्हरिन गोल्ड बॉण्ड्स

या प्रकारचे बॉण्ड्स केंद्र सरकारनं २०१५ मध्ये बाजारात आणले. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या माध्यमातून हे बॉण्ड्स देशातल्या नेमून दिलेल्या बँक, पोस्ट ऑफिस, नेमून दिलेले एजंट आणि ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या ऑफिसमध्ये उपलब्ध होतात. रिझर्व्ह बँक वेळोवेळी पत्रकाद्वारे बॉण्ड वितरित करण्याची तारीख आणि वितरण कालावधी नमूद करते. या काळात तुम्ही वरील नमूद केलेल्या ठिकाणी बॉण्डसाठी अर्ज करू शकता.

सरकारप्रणित असल्याने हे बॉण्ड सुरक्षित आहेत.

बॉण्ड खरेदी करताना अर्ज, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रं आणि रकमेचा चेक लागतो.

हे बॉण्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या बँकेच्या वेबसाईटवरूनदेखील घेऊ शकता. तुमच्या डीमॅट अकाऊंटद्वारे गुंतवणूक करू शकता.

या बॉण्डची दर्शनी किंमत वितरणाच्या आधीच्या तीन दिवसांच्या बाजारमूल्याची सरासरी किंमत असते आणि विक्री किंमतसुद्धा याच प्रकारे ठरवली जाते.

या बॉण्डची मुदत ८ वर्षं असून, कमीत कमी १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत सोनं याद्वारे गुंतवणूकदार घेऊ शकतात.

या बॉण्डवर व्याजदर २.५० टक्के प्रतिवर्ष असून तो करपात्र असतो.

मुदतीअंती, मुदतीच्या आधीच्या तीन दिवसांच्या बाजारमूल्याच्या सरासरीइतकी विक्री किंमत ठरवली जाते. यामुळे परतावा दर हा सोन्याच्या बाजारमूल्यावर अवलंबून असतो.
जर तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट ८ वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर तुम्ही निश्चित सोव्हरिन गोल्ड बॉण्डचा विचार करू शकता.

आणखी वाचा : ‘आर्थिक बाबी मला नाही बाई कळत!’

३) गोल्ड ETF (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडस्)
इतर एक्सचेंज ट्रेडेड फंडप्रमाणे ‘गोल्ड ईटीएफ’ हेसुद्धा काम करतात. आता मुळात ‘ईटीएफ’ म्हणजे काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. अगदी ढोबळ भाषेत सांगायचं, तर सोन्याच्या बाजारमूल्यावर आधारित अशी कागदपत्र स्वरूपातली सोन्यातली गुंतवणूक म्हणजे ‘गोल्ड ईटीएफ’. यामध्ये तुम्ही व्यक्तीच्या डीमॅट अकाऊंटद्वारे ऑनलाईन पद्धतीनं गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. यात १ ग्राम = १ युनिट असतं. सोन्याच्या बाजारमूल्याप्रमाणे इथे तुम्ही युनिटमध्ये सोनं खरेदी करता. ईटीएफद्वारे केलेली गुंतवणूक तुम्ही अगदी दररोज पाहू शकता, त्याचा मागोवा घेऊ शकता आणि केव्हाही विकू शकता. यामध्ये गुंतवणूकीची कॉस्ट (खर्च) अगदी कमी असते आणि परतावा हा सोन्याच्या बाजारमूल्याप्रमाणे मिळतो. डीमॅटद्वारे तुम्ही गुंतवणुक करत असल्यानं तुमची गुंतवणूक अगदी सुरक्षित असते. जर तुमचे उद्दिष्ट कमी किंवा मध्यम कालावधीचं असेल तर तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.
४) गोल्ड म्युचुअल फंड
‘गोल्ड म्युचुअल फंड’मध्ये तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. यामध्ये इतर प्रकारच्या म्युच्युअल फंडसारखा सोनं आणि त्याच्याशी निगडित कंपन्यांचा पोर्टफोलिओ असतो. या फंडचे युनिट्स हे संलग्न गोल्ड ईटीएफचे युनिट असतात. सोन्याच्या बाजारमूल्याप्रमाणे या फंडचा परतावा ठरतो. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अथवा ऑफलाईन पद्धतीनं यात गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारे सोनंखरेदी आणि गुंतवणूक तुम्ही अधिकृत रित्या करू शकता. यातली गुंतवणूक तुम्हाला सोन्याच्या बाजार मूल्याप्रमाणे परतावा देते आणि ती ‘सेबी’च्या (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) अखत्यारीत येते.

आणखी वाचा : ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

हे झाले सोन्यातल्या गुंतवणुकीचे काही महत्त्वाचे प्रकार. काही जणींना असंही वाटू शकेल, की सोन्यातल्या गुंतवणुकीची माहिती मला असायलाच हवी का?… याचं उत्तर पुन्हा आपल्याला अर्थसाक्षरतेच्या मुद्द्यावर घेऊन येतं. सोनं या जिव्हाळ्याच्या वस्तूमध्ये आपण किंवा आपलं कुटुंब करत असलेली गुंतवणूक कोणत्या प्रकारची आहे? काय उद्दिष्ट असल्यावर कोणतं गुंतवणुकीचं साधन उपयुक्त ठरेल? आणि परताव्यावरून गुंतवणूक फायदेशीर ठरेल का? या प्रश्नांबद्दलचं सामान्य ज्ञान स्त्रियांना असणं ही आता काळाची गरज झाली आहे. आता बहुसंख्य स्त्रिया उत्तम नोकरी-व्यवसाय करून कमावत्या झाल्या आहेत. आपण कमावलेला पैसा वर्धिष्णू व्हावा यासाठी आपण जरी या क्षेत्रातल्या कोणत्या व्यावसायिकाची मदत घेत असाल, तरी एक सुजाण ग्राहक म्हणून तुम्हाला इतपत माहिती हवीच! मग आता जेव्हा केव्हा सोनंखरेदी करायचा विचार मनात येईल, तेव्हा गुंतवणूकीच्या दृष्टीनंही त्याचा चौफेर विचार करून पाहाल ना?…

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)
priya199@gmail.com

(फोटो : इंडियन एक्सप्रेस )

Story img Loader