केतकी जोशी

महिला कमावत्या असतील किंवा नसतील पण आहे त्या कमाईतून थोडीशी का होईना बचत कशी करायची हे त्यांना चांगले माहिती असते. अडीअडचणीच्या वेळेस घरातल्या बायकांनी केलेली ही बचत उपयोगास येते. महिला कमावत्या झाल्या, अर्थार्जन करू लागल्या आणि खर्च करण्याबरोबरच त्या गुंतवणुकीचाही विचार करू लागल्या. आपल्याकडे महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण कमी असले तरी आता जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायचे याचा विचार महिला, तरुणी करू लागल्या आहेत. पूर्वी म्हणजे अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत महिला सोन्यामध्ये गुंतवणुकीलाच प्राधान्य देत होत्या. पण आता मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे. आता सोन्याऐवजी रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला महिलांची जास्त पसंती आहे. रिअल इस्टेट कन्सल्टंट एनारॉकच्या वतीने गुंतवणुकीसंदर्भातील एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ही बाब समोर आली आहे. महिला गुंतवणुकीसाठी जास्त प्राधान्य कशाला देतात, या संदर्भातले हे सर्वेक्षण होते.

New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
1932 citizens registrations for affordable housing under pmrda scheme
पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी
beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
 ‘मायक्रोफायनान्स’ संस्थांना अवाजवी कर्ज देण्यापासून परावृत्त करणे आवश्यक
Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
Saras Mahotsavs are canceled during the Diwali period as it is the time of code of conduct for assembly elections thane news
बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ..! दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड

खरे तर सोने हा महिलांच्या आवडीचा विषय. फक्त दागिने घालण्यासाठी म्हणून नाही तर अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणूनही सोने घेऊन ठेवले जाते. पण आता सोन्यापेक्षाही जास्त रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवायला महिला जास्त प्राधान्य देत आहेत, असे समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार ६५ टक्के महिला रिअल इस्टेटमध्ये, २० टक्के महिला शेअर मार्केटमध्ये तर केवळ ८ टक्के महिला सोन्यात गुंतवणूक करतात. या ग्राहक सर्वेक्षणामध्ये जवळपास ५,५०० लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये ५० टक्के महिला होत्या. या प्रश्नावलीच्या उत्तरांमधून अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार कमीत कमी ६५ टक्के महिलांची इच्छा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची आहे तर २० टक्के महिलांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पसंती दर्शवली, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा- ‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

सोने हे स्त्रीधन समजले जाते. आपल्याकडे लग्नांमध्ये नवरीला सोन्याचे दागिने घातले जातात. हे दागिने हौसेसाठी तर असतातच. पण भविष्यात कधी आर्थिक अडचण आली तर या दागिन्यांचा तिला उपयोग व्हावा असाही हेतू त्यामागे असतो. अनेकदा महिला आपल्या नावे, मुलांच्या नावे दर महिन्याला सोने जमा करीत असतात. या सोन्याचा उपयोग अडीअडचणीच्या काळात तर होतोच. पण मुलांच्या शिक्षणासाठी आणि अगदी घर घेताना किंवा गुंतवणूक म्हणून एखादी मालमत्ता खरेदी करतानाही या सोन्याचा उपयोग केला जातो. पण तरीही फक्त ८ टक्के महिलांनीच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले तर फक्त ७ टक्के महिलांनाच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FD) गुंतवणूक करायला आवडते, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

एके काळी सोन्यामध्ये गुंतवणुकीला आपल्या देशात सर्वाधिक प्राधान्य दिले जात होते. आता मात्र महिला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हा धोका मानत नाहीत तर त्याकडे गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून बघत आहेत. अगदी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देणाऱ्या महिलांची संख्याही सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांपेक्षा लक्षणीय असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

आणखी वाचा- मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

एरॉनॉकच्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी ८३ टक्के महिला गुंतवणुकीसाठी ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घराचा शोध घेत होत्या. तर ३६ टक्के महिलांचे बजेट ४५ ते ९० लाख रुपयांपर्यंत होते. ९० लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरामध्ये गुंतवणुकीला २७टक्के महिला तयार होत्या. तर २० टक्के महिलांना १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरामध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. विशेष म्हणजे ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या महिलांची संख्या सगळ्यांत कमी होती. गेल्या दशकभरात गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये बरेच बदल झाल्याचे Anaroc Group चे अध्यक्ष संतोष कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आता महिलांकडेही प्रमुख रेसिडेन्शियल रिअल इस्टेट ग्राहक म्हणून बघितले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषत: शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रांत महिलांच्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण आजही तुलनेने कमी आहे. प्रधानमंत्री निवास योजना (PMAY) च्या अंतर्गत बांधल्या गेलेल्या घरांवर महिलेचे नाव असणे किंवा ती सहमालक असणे अनिवार्य आहे. घरांवर महिलांची मालकी असणे याला या योजनेमुळे पाठिंबा मिळाला, त्यानेही फायदा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्याशिवाय महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हाही मुद्दा आहे. नोकरी करणाऱ्या, उच्च पगार मिळवणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवरा-बायकोने मिळून घर घेतले तरीही आपल्या स्वत:च्या नावावर घर असणे ही काळाची गरज असल्याचे अनेक महिलांना वाटते. लग्नाआधीही मुलींनी स्वत:च्या नावावर घर घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अन्य शहरांत नोकरीनिमित्त गेलेल्या तरुणी आपले स्वत:चे घर घेण्याबाबत जागरूक झालेल्या दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे घरांची जास्तीत जास्त गरज निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सहसा घरांच्या किमती कमी होत नाहीत. त्यामुळेच महिलांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक हा सुरक्षित पर्याय वाटतो आहे. पूर्वी गुंतवणुकीसाठी पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असणाऱ्या ते आता विचार करून आपल्याला योग्य वाटेल अशी गुंतवणूक करणाऱ्या महिला असा हा प्रवास नक्कीच सोपा नाही. आजही भरपूर पगार मिळवीत असलेल्या महिलेला आर्थिक स्वातंत्र्य मिळतेच असे नाही. पण हळूहळू फरक पडतोय. घरचे खर्च भागवून, भविष्यातील गुंतवणुकीसाठी आता महिला स्वतंत्र विचार करू लागल्या आहेत हे महत्त्वाचे.