IPS Tanu Shree: नागरी सेवा परीक्षा (The Civil Services Examination) ही सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि आयएएस अधिकारी बनणे हे अनेकांचे स्वप्न असते. दरवर्षी हजारो उमेदवार आयएएस, आयएफएस, आयआरएस व आयपीएस होण्यासाठी ही परीक्षा देतात; परंतु त्यापैकी काहीच जण ही परीक्षा क्रॅक करण्यात आणि जागा मिळविण्यात यशस्वी होतात.

आपल्या सततच्या मेहनतीनं स्वत:च स्वप्न साकार करणाऱ्या IPS तनुश्रीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.

तनुश्रीचं स्वप्न (IPS Tanu Shree‘s Dream)

तनुश्रीनं २०१६ मध्ये परीक्षा दिली आणि मे २०१७ मध्ये तिचा निकाल लागला. तिनं IPS अधिकारी म्हणून स्थान मिळवलं आणि अर्थात तिच्या कुटुंबाला याचा खूप आनंद झाला. प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी तनुश्री हैदराबाद येथील पोलीस अकादमीमध्ये गेली. रिपोर्टनुसार, ती सध्या जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये एसएसपी म्हणून तैनात आहे.

हेही वाचा… पतीच्या प्रकृतीमुळे घेतला ‘हा’ धाडसी निर्णय, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या महिला कॅब ड्रायव्हरची प्रेरणादायी गोष्ट

कुटुंबाची साथ (IPS Tanu Shree‘s Family)

तनुश्री तिच्या यशाचं श्रेय तिची आई नीलम प्रसाद आणि वडील सुबोध कुमार यांना देते. तिचे वडील माजी डीआयजी होते, जे नेहमीच तिचे सर्वांत मोठे प्रेरणास्थान राहिले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिनं (IPS Tanu Shree) या प्रवासाला सुरुवात केली. २०१५ मध्ये तिनं लग्न केलं आणि लग्नानंतर घरातल्या जबाबदाऱ्यांसह ती तिची स्वप्नंदेखील पूर्ण करण्याच्या मार्गावर होती.

तिनं बिहारच्या मोतिहारी येथे शिक्षण सुरू केलं आणि विविध संस्थांमध्ये शिक्षण सुरू ठेवलं. नंतर १२वी पूर्ण केल्यानंतर बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून तिनं (IPS Tanu Shree) पदवी मिळवली.

हेही वाचा… महिलांच्या वाटेवर अडथळ्यांची रांग! लैंगिक छळ अन् भेदभावामुळे नोकरदार महिला हतबल; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी ती दिल्लीला गेली. तिची मोठी बहीण, सीआरपीएफ कमांडंट (crpf commandant), मनुश्री तिच्या या संपूर्ण प्रवासात तिची प्रेरणा होती.

हेही वाचा… २० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा

तनुश्रीचा (IPS Tanu Shree) उल्लेखनीय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना तिनं लग्नानंतर ज्या प्रकारे घर सांभाळलं आणि आपलं ध्येय पूर्ण केलं ते इतर महिलांसाठी एक मार्गदर्शक उदाहरण आहे.