राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान न्यूड फोटो प्रकरणावरून सध्या चर्चेत आहेत. याच्या आधीही सनी लिऑन, विद्या बालन अशा काही अभिनेत्रींनाही याचा सामना करावा लागला आहे. उर्फी जावेद, सई ताम्हणकर यांनाही कायम त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते. मुलींना त्यांच्या दिसण्यावरून, वागण्यावरून बोलले जाते. डर्टी पिक्चर असो किंवा राझ ३ असो किंवा रागिणी एमएमएस असो, त्यातील अभिनेत्री त्यांच्या अभिनयावरून चर्चेत होत्या. परंतु, प्रत्येक वेळी अभिनेत्रींनाच का बोलले जाते ? पॉर्नस्टार ही मुलगीच का ? त्या व्हिडीओमध्ये मुलग्याची काही भूमिका नसते का ? मग मुलगा हा पॉर्नस्टार ठरत नाही का ? पुरुष कायम नामनिराळाच का राहतो ?

राखी सावंत प्रकरण काय आहे ?

हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. तिच्या वागण्याबरोबरच तिच्या कपड्यांमुळेदेखील ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेकांनी तिचा उल्लेख पॉर्नस्टार असाही केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात तिने आदिल खानशी लग्न केले. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप करत त्याला तुरुंगात पाठवले. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर आदिलनेदेखील त्याची बाजू मांडत राखीवर अनेक आरोप केले. त्यानंतर राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लोकांनी तिचा उल्लेख पॉर्नस्टार असा करण्यावर भाष्य केले. ‘फिल्मग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी पॉर्नस्टार कधी झाले? पॉर्नस्टारचा अर्थ काय, शारीरिक संबंध ठेवणे, अवैध संबंध ठेवणे, अंगप्रदर्शन करणे. मी आतापर्यंत असे कधीही काहीही केलेले नाही. जर आदिलबरोबर मी शारीरिक संबंध ठेवले ,तर त्याच्याबरोबरच मी लग्न केले. त्यावेळी मी त्याची जात, धर्म काहीही पाहिले नाही. आमच्याकडून चूक झाली की, आम्ही लग्न केले. ज्या खऱ्या पॉर्नस्टार असतात, त्यांची तर तुम्ही दिव्यांनी आरती ओवाळता आणि जी साधी मुलगी आहे तिला पॉर्नस्टार बनवून टाकता. धन्यवाद. मी सगळे मान्य करेन, पण मी पॉर्नस्टार आहे, हा आरोप कधी मान्य करणार नाही. हा आरोप मी माझ्यावर लावून घेणार नाही. मी पॉर्नस्टार नाही.” असे राखीने स्पष्ट केले आहे. राखीची खास मैत्रिणी राजश्री तिनेही राखीवर अनेक आरोप केले आहेत. आदिल खान, राजश्री आणि शर्लीन चोप्रा आता राखीविरुद्ध एकत्र आले आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”
Akshay Kumar
“लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का?” सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर बोलताना अक्षय कुमारचा प्रश्न
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

पॉर्न व्हिडीओ आणि त्यामागील मानसिकता

इंटरनेटची आज उपलब्धता सहज होते. लहान वयातच वाढणारे कुतूहल, कुतूहल शमवणारी इंटरनेटवरील साधने, त्याचा होणारा दुरुपयोग, समाजमाध्यमांचा गैरवापर, पीत पत्रकारिता, बातम्या किंवा मजकुरांमधून उपलब्ध होणारे साहित्य यामुळे लोकांची स्त्रियांकडे बघण्याची दृष्टीच बदलत आहे. स्त्रियांनी वेगळे कपडे घातले, किंवा ज्याच्यामध्ये त्या तथाकथित ‘हॉट’, ‘बोल्ड’ लूकमध्ये दिसत असतील, तर त्याच्यावरती अश्लील कमेंट्स केल्या जातात.

हेही वाचा : Success story : कुख्यात तस्कर वीरप्पनला पकडणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट…


साधारणतः वयात येणारी मुले त्यांच्यातील शारीरिक बदल स्वीकारत असतात. शरीराच्या गरजाही बदलत असतात. या गरजा भागवण्याचे सहज उपलब्ध माध्यम म्हणजे पॉर्न बघणे. दरवेळी मुलं पॉर्न साईट्सवर जाऊन पॉर्न बघतात असं नाहीये. युट्युबवर विविध प्रकारचे व्हिडीओज जसे आहेत तसेच पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्न कॅटेगरीमधले व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. ‘गंदी बात’, ‘भाभी’ अशाप्रकारचे मजकूर गुगलवर सहज उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हार्ड आणि सॉफ्ट पॉर्न कन्टेन्ट सहज उपलब्ध आहे. व्हॉटसऍपवरुन मोठ्या प्रमाणावर पॉर्न क्लिप्स व्हायरल/फॉरवर्ड होतात. ‘जीआयएफ’मध्येही असा मजकूर उपलब्ध असतो. पॉर्न मुलांपर्यंत चोहोबाजूंनी पोहोचत आहे. ते सोशल मीडियावर आहे, गेमिंगमध्ये आहे. इंटरनेटवर तर सहज उपलब्ध आहे. गुगल इमेजेसमध्ये आहे. युट्युबवर आहे. इंटरनेटवर सगळ्यात जास्त काय चालतं तर सेक्स आणि हिंसा. या दोन्ही गोष्टींना प्रचंड मोठा ग्राहकवर्ग आहे आणि त्यात टीन्सचा समावेश प्रचंड आहे.

अभिनेत्रींना लक्ष्य का केले जाते ?

राखी सावंत, सनी लिऑन, उर्फी जावेद तसेच बॉलिवूडमधील अभिनेत्री, सध्या मराठी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री त्यांच्या दिसणे, फोटोज यावरून चर्चेत असतात. युट्यूब इन्फ्लूअर्स मुलींच्या युट्यूब, इन्स्टाग्रामवर अश्लील कमेंट्स केल्या जातात. चित्रपटसृष्टीतील मोठ्या अभिनेत्री याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. त्यावर भाष्य करत नाहीत. परंतु, सनी लिऑन, राखी सावंत अशा अभिनेत्री त्यांच्या अलग अंदाजमुळे चर्चेत येतात. एखाद्या मराठी अभिनेत्रीनेही तिचे फोटो पोस्ट केले तर तिला अश्लील कमेंट करून वैयक्तिक गोष्टी विचारल्या जातात. सई ताम्हणकरच्या बाबतीत हे घडलेले आहे. एखाद्या मुलीला, स्त्रीला लक्ष्य करणे, तिच्या शरीरावरुन तिला बोलणे, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सार्वजनिक करणे, यासंदर्भात त्यांना धमकावणे, चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करणे, त्याच्या चित्रफीत बनवणे, अभिनय क्षेत्रात होणारे स्पर्श सहन करणे, अशा अनेक गोष्टींना या अभिनेत्रींना सामोरे जावे लागते. परंतु, याचा बळी या अभिनेत्री ठरतात. राखी सावंत हिचे तिच्या पतीसह असणारे संबंध त्याने उघड केले. तिचे फोटो व्हायरल केले यामध्ये तिला टार्गेट करण्यात आले. नेटकरीसुद्धा तिला पॉर्नस्टार ठरवून मोकळे झाले.
शारीरिक संबंध कोणत्याही प्रकारचे असो. नैतिक-अनैतिक मर्यादेतील संबंध असो. प्रत्येक वेळी मुलींनाच टार्गेट केले जाते.पॉर्नस्टार, वाईट चालीची, ‘उपलब्ध’ हे मुलींनाच म्हटले जाते. त्या व्हिडीओमध्ये, पॉर्नकॉन्टेन्टमध्ये मुलगे नसतात का ? पुरुष नसतात का ? त्यांना कोणी पॉर्नस्टार म्हणत नाहीत. त्यांना कोणी ‘जज’ करत नाहीत. मुलग्यांनी कितीही मुलींसह व्हिडीओ काढले तरी त्यांना कोणी काही बोलत नाही. पण, हे एखाद्या मुलीने केले तर तिच्या चारित्र्यावर लगेच बोट ठेवले जाते.
राखी सावंतवर जी वेळ आली ती उद्या कोणत्याही मुलीवर येऊ शकते. मग, तिला पॉर्नस्टार ठरवणार का ?

Story img Loader