संपदा सोवनी

मॉईश्चरायझिंग लोशन किंवा क्रीम फक्त थंडीत लावायचं असतं, असं काही जणांना वाटतं. कोल्ड क्रीम थंडीत आणि सनस्क्रीन उन्हाळ्यात असाच ‘फॉर्म्युला’ असतो. मग पावसाळ्याच्या दिवसांत काय? असा प्रश्न निर्माण होतो. पण पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा त्वचेला मॉईश्चरायझर लावणं आवश्यक आहे बरं! का? जाणून घेऊ.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

उन्हाळ्यात शुष्क वातावरण असतं आणि त्यात आपली त्वचा कोरडी पडते. पावसाळ्यात हवेत शुष्कता नसते, पण आर्द्रता, दमटपणा असतो. त्यामुळे त्वचेवर जंतूंचा किंवा बुरशीचा संसर्ग सहज होऊ शकतो. ॲलर्जी येऊ शकते, पुरळ, खाज अशा तक्रारी या दिवसांत उद्भवू शकतात. पावसाळ्यात आपल्या प्रकर्षानं लक्षात येत नसलं, तरी त्वचा कोरडी पडत असते. या कारणामुळे त्वचेची पावसाळ्यात काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे रोजच्या ‘स्किन केअर’मध्ये पावसाळ्यातही त्वचेतला ओलावा टिकवून धरणारं मॉईश्चरायझर हवं.

पावसाळ्यासाठी मॉईश्चरायझर निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

१) तुमचा ‘स्किन टाईप’ काय आहे, ते ओळखा – तुमची त्वचा मुळात कोरडी आहे, तेलकट आहे, काॅम्बिनेशन (मिश्र स्वरूपाची) स्किन आहे, की सेन्सिटिव्ह (संवेदनशील) आहे, हे आधी पाहायला हवं. त्यानुसार आपल्याला चालेल असंच मॉईश्चरायझर निवडायला हवं.

२) हे घटक पाहा – हायाल्युरॉनिक ॲसिड, ग्लिसरिन, सिरॅमाईडस् असे त्वचेला ओलावा- मॉईश्चर देणारे घटक, तसंच ॲलोवेरा, कॅमोमाइल यांसारखे ‘सूदिंग’ म्हणजे त्वचेला शांतवणारे घटक, नैसर्गिकरित्या ‘ॲण्टीबॅक्टेरिअल’ (जिवाणूरोधक) असलेले ‘टी ट्री ऑईल’सारखे घटक मॉईश्चरायझरमध्ये असावेत, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळ्या प्रकारची असते, त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या त्वचेचा पोत व त्वचेची संवेदनशीलता ओळखून त्यानुसार पावसाळ्यातलं मॉईश्चरायझर निवडावं.

३) फार ‘हेव्ही’ मॉईश्चरायझरची गरज नाही – आपण थंडीत जे मॉईश्चरायझर किंवा कोल्ड क्रीम वापरतो, ते थंडीत टिकाव धरू शकेल असं घट्ट आणि ‘हेव्ही’ असतं. पावसाळ्यात मात्र अगदी घट्ट किंवा अगदी तेलकट मॉईश्चरायझरची गरज नसते. थोडं कमी घट्ट, ‘लाईट’ आणि कमी तेलकट मॉईश्चरायझर या दिवसांत सर्वसाधारणपणे पुरेसं ठरतं. हल्ली बाजारात ‘जेल बेस्ड’ किंवा ‘वॉटर बेस्ड’ मॉईश्चरायझर्ससुद्धा मिळू लागली आहेत. ती या दिवसांत वापरून पाहता येतील. विशेषत: मूळच्या तेलकट असलेल्या त्वचेला ‘ऑईल फ्री’ मॉईश्चरायझर्स चांगली ठरतील.

४) सनस्क्रीन वापरलेलं चांगलं – पावसाळ्यात ऊन पडतच नसल्यामुळे सनस्क्रीनची काही आवश्यकता नसते असं म्हणतात. पण काही सौंदर्यतज्ञांच्या मते मात्र नेहमीच बाहेर जाताना चांगल्या प्रतीचं ‘सनस्क्रीन’ वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे पावसाळा असला, तरी ‘एसपीएफ प्रोटेक्शन’- अर्थात ‘सन फ्रोटेक्शन’ (एसपीएफ ३०) असलेलं मॉईश्चरायझर वापरलेलं चांगलं, असं मानलं जातं.

५) वापरणं सुरू करण्यापूर्वी त्वचेवर चाचणी घ्या – अनेकदा तुमच्या असं लक्षात आलं असेल, की आपण जेव्हा एकदम एखादं मेकअप उत्पादन बदलतो, तेव्हा नवीन उत्पादन आापल्या त्वचेला न चालणारं असू शकतं. मॉईश्चरायझर्सच्या बाबतीत, जर नवीन मॉईश्चरायझर तुमच्या त्वचेला चालत नसेल, तर त्वचेवर पुरळ येणं, खाज सुटणं, त्वचा लाल होणं, इरिटेशन होणं, अशी लक्षणं दिसू शकतात. हे टाळण्यासाठी एकदम नवीन मॉईश्चरायझर वापरायला लागण्यापूर्वी त्याची लहानशी बाटली खरेदी करून त्वचेवर लावून काही रीॲक्शन येत नाही ना, ते तपासून घ्या. साधारणपणे मनगटाच्या आतल्या बाजूच्या त्वचेवर नवीन मॉईश्चरायझरची चाचणी घेण्यास सांगतात.

या दिवसांत त्वचेची चांगली काळजी घेतली, तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसून येणाऱ्या त्वचेच्या तक्रारी टाळता येतील.

lokwomen.online@gmail.com