डॉ. अश्विन सावंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पीसीओएस् या विकृतीमध्ये आनुवांशिकता (जेनेटिक्स) हा घटक महत्त्वाचा आहे, म्हणजेच पीसीओएस् संबंधित जनुके तुम्हांला तुमच्या मागील पिढीकडून मिळाली असतील तर तुम्हांला हा आजार होण्याची शक्यता बळावते. मात्र, याचा अर्थ हा आजार तुम्हांला होणारच असा गैरसमज करून घेऊ नये. अन्यथा आपल्या आईला हा आजार होता, म्हणजे मला होणार आहेच, मग ‘कशाला आपल्या जीवनशैलीची, आहार-विहाराची काळजी घ्या?’, असा स्वतःला सोयीस्कर अर्थ काढून मोकळ्या व्हाल.
मुळात तुमच्या आईला कदाचित हा आजार असेल तर तिच्या आईला म्हणजे तुमच्या आजीला हा आजार असेलच असे नाही. कारण विसाव्या शतकापर्यंत तरी हा आजार समाजात अभावाने दिसत होता. मागील ३०-४० वर्षे व्यवसाय करणारे स्त्री-रोग तज्ज्ञ व पीसीओडीवर उपचार करणारे डॉक्टर्स याचा निर्वाळा देतात की ते शिक्षण घेत असताना आणि त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या वर्षांत या आजाराने ग्रस्त मुली- स्त्रिया फारशा पाहायला मिळत नव्हत्या. याचाच अर्थ तुमच्या आई किंवा आजीमध्ये या आजारासंबंधित जनुके (जीन्स) असूनही त्यांना तो आजार झाला नाही आणि याचे कारण म्हणजे ‘अधि- आनुवंशिकता’ (एपि-जेनेटिक्स).
आणखी वाचा : प्लास्टिकमधील साठवणूक, तंबाखू व मद्य पीसीओएससाठी कारणीभूत
आनुवंशिक जनुके
आनुवंशिकता सिद्धान्तांनुसार एखाद्या विकृतीसंबंधित जनुके तुमच्यामध्ये मागील पिढीकडून संक्रमित झाली असतील तर तुम्हांला ती विकृती होण्याचा धोका बळावतो. असे असले तरी त्या व्यक्तीने आपल्या आहार-विहाराची योग्य ती काळजी घेतली आणि आपले स्वास्थ्य सांभाळण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले तर आनुवंशिकतेचा घटक निष्प्रभ होईल. तुमचे जनुक (जीन्स) तेव्हाच उचल खाते, जेव्हा त्याला पूरक वातावरण लाभते. पूरक वातावरण म्हणजे धूम्रपान-मद्यपान, अयोग्य आहार, सुपाच्या कर्बोदकांचा (रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्सचा) अतिरेक, रोगी जीवनशैली, व्यायामाचा-परिश्रमांचा अभाव, रात्री जागरण, अपुरी झोप, दिवसा झोप वगैरे. या घटकांची साथ मिळाली तरच जनुक उद्द्पित होईल, बटन दाबल्यावरच घरातला दिवा पेटतो त्याप्रमाणे. घरात वीज असते, दिवा असतो तरी दिवा का पेटत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या विकृतीची जनुके आपल्याला आनुवंशिकतेने मिळालेली असली तरी जोवर त्या जनुकांना उद्दिपित करणारी कारणे घडत नाहीत, तोवर त्या जनुकांचा काहीही परिणाम होणार नाही, हाच झाला अधि- आनुवंशिकता सिद्धान्त, जो सांगतॊ की आनुवांशिकतेपेक्षा अधि-आनुवंशिकता अधिक महत्त्वाची आहे. समाजाने आपलं लक्ष या अधि- आनुवंशिकतेवर केंद्रित करायला हवे.
आणखी वाचा : भाग २ : लहान वयात येणारी मासिक पाळी पीसीओएएसला ठरु शकते कारणीभूत!
पीसीओडी या विकृतीचा विचार करता आज ज्या मुलींना याचा त्रास होत आहे, त्यांच्या आईला किंवा आजीला याचा त्रास होताच असे दिसत नाही. याचे कारण त्यांची जीवनशैली व आहार पीसीओडीच्या जनुकांना नाही तर त्यांच्या स्वास्थ्याला पूरक असा होता. मात्र आजच्या मुलींची जीवनशैली व आहार मात्र त्या जनुकांना उद्दिपित करत आहे, त्यांना प्रवृत्त करत आहे. असे काय बदल घडले या मुलींच्या जीवनात, याचा विचार करताना या मुलींनी आपल्या जीवनशैली व आहाराची (एकंदरच खाण्यापिण्याच्या सवयींची) आपल्या आईशी, त्याहूनही आपल्या आजीशी, तुलना करून पाहावी. प्रश्नाचे उत्तर आणि पीसीओडीला प्रतिबंध करण्याचे उपाय त्यांना सापडतील. जे ठळक बदल मागील दोन पिढ्यांच्या तुलनेमध्ये नवीन पिढीमधील मुलींच्या आयुष्यात झाले आहेत, ते जर समजले तर त्यांमध्ये बदल करून पीसीओएस् ला प्रतिबंध करणे समाजाला शक्य होईल.
drashwin15@yahoo.com