पावसाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. उन्हाच्या तापापासून पावसाळ्यात सुटका होते. परंतु, पावसाळ्यातील ओलसर, दमट हवा, आर्द्रता रोगजंतू वाढवत असते. आर्द्र हवेत बुरशीजन्य जीवाणू वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हा धोका सर्वांना असतोच. परंतु, महिलांनी पावसाळ्यात स्वतःच्या स्वच्छतेची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. कपड्यांची निवड, त्वचेची काळजी, वैयक्तिक स्वच्छता अशा अनेक गोष्टी महिलांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे महिलांना पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे माहीत असणे, आवश्यक आहे.

पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. आर्द्रता अधिक असल्यास संसर्गजन्य आजारांचेही प्रमाण वाढते. तसेच बुरशी, त्वचेचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यातील आर्द्रता महिलांना योनीमार्गाचा संसर्ग, ‘त्या’ भागातील बुरशी, तसेच तेथील त्वचेची साले निघणे, मासिक पाळीदरम्यान संसर्ग होणे अशा आजारांना कारण ठरते. यासाठी सावधगिरी बाळगणे, तसेच निरोगी जीवनशैली ठेवणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या काळात घट्ट कपडे घालणे महिलांना त्रासदायक ठरू शकते. तसेच घट्ट अंतर्वस्त्रेही स्तनभागाच्या खालील भागात बुरशी आणण्यास, तसेच संसर्गजन्य आजार पसरवण्यास कारण ठरतात. घाम, आर्द्रता यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. यासाठी महिलांनी त्वचा कोरडी ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महिलांनी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
Pink Rickshaw , Pink Rickshaw Women Maharashtra ,
नवीन वर्षात महिलांना ‘गुलाबी रिक्षा’ मिळणार, राज्यभरातून कसा आहे प्रतिसाद?
Can lemon ginger water really cleanse the liver Here’s how it works on your body
आले-लिंबाचे पाणी खरंच यकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? शरीरावर कसा होतो परिणाम?
Soaking Dry Fruits
रात्रभर पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर…


‘त्या’ भागाची स्वच्छता

महिलांनी कोणत्याही ऋतूत योनीमार्ग आणि जांघेचा भाग कोरडा आणि स्वच्छ ठेवणे आवश्यकच असते. पावसाळ्यात ओलावा वाढल्याने योनीभागातील पीएच पातळी कमी होते, ज्यामुळे स्त्रियांना योनीमार्गाचा संसर्ग, विशेषत: बुरशीची लागण होण्याची अधिक शक्यता असते. पावसाळ्यात योनीमार्गाची स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. स्वच्छ पाणी, साबण किंवा एन्टीसेफ्टिक लिक्विड यांनी ‘त्या’ भागाची स्वच्छता करावी. तसेच तो भाग कोरड्या टॉवेलने किंवा टिश्यू पेपरनी कोरडा करून घ्यावा.

हेही वाचा : स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान

सुती कपड्यांचा वापर

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात महिलांनी सुती कपड्यांचा वापर करावा. अंतर्वस्त्रेही सुती असावीत. सिंथेटिक किंवा अन्य वस्त्रे घाम शोषून घेत नाहीत. त्यामुळे घामामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. बाह्य घट्ट कपडे ओले राहिल्यास त्वचेवर पुरळ, रॅशेस येऊ शकतात. स्कीनी जीन्स, अँकल जीन्स घालणे टाळावे. पावसाळ्यात हे विशेषतः महत्त्वाचे आहे. कारण घट्ट कपड्यांसह आर्द्रतेच्या उच्च पातळीमुळे जास्त घाम येऊ शकतो. घट्ट कपडे आणि आर्द्रतेमुळे पुरळ, योनीमार्गाचे संक्रमण आणि मूत्रमार्गात जंतूसंक्रमण होऊ शकते. कारण, योनीच्या सभोवतालच्या भागात हवेचा प्रवाह कमी होतो आणि उच्च आर्द्रता टिकून राहते. म्हणूनच, आरामदायक आणि लवकर कोरडे होऊ शकणारे कॉटन अंडरवेअर घालणे फायदेशीर आहे, यामुळे हवेचे परिसंचरण सुधारेल आणि त्या भागातील संवेदनशील त्वचेला कमी त्रास होईल.
पावसाळ्यात कपडे सहज कोरडे न होण्याची अतिरिक्त समस्या असते. ओले किंवा ओलसर कपडे घालू नये. कारण ते मांडीच्या आतील कडांवर घर्षण वाढवतात, ज्यामुळे त्वचेचे संक्रमण आणि पुरळ येण्याची शक्यता असते.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता

पावसाळ्यात प्रत्येकी चार तासांनी सॅनिटरी पॅड, दोन तासांनी टॅम्पोन्स आणि दर आठ तासांनी मासिक पाळीचे कप बदलावेत. कोरड्या वाईप्सनी योनीमार्ग स्वच्छ करावा. ओलसर वाईप्स वापरू नयेत. आवश्यकता वाटल्यास टॉयलेट पेपरचाही वापर करावा.
पावसाळ्यात, सॅनिटरी पॅडमुळे पुरळ येऊन संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू शकते. टॅम्पोन्स ‘त्या’ भागातील सर्व द्रव शोषून घेतात. त्यामुळे तेथील जागा कोरडी होते. मासिक पाळीसाठी कपचा वापर करणेही योग्य ठरू शकते.

कापड वापरणे टाळा

अनेक महिला आजही मासिक पाळीच्या काळात कापड वापरतात. कापड वापरणे हे संसर्गजन्य आजारांचे कारण ठरते. पावसाळ्यात कापड नीट सुकत नाही. ओलसर कापडामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. अगदी सॅनिटरी पॅडसुद्धा ओलसर झाल्यावर बदलावे.

‘नो शेव्ह’ पावसाळा

अनेक महिलांना बिकिनी वॅक्सिंग करणे हे ‘हायजनिक’ वाटते. किंवा काही महिला ‘शेव्हिंग’ करतात. परंतु, पावसाळ्यात ‘त्या’ भागाची वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करू नये. तेथील केस पावसाळ्यात तो भाग झाकण्याचे काम करतात. तसेच जीवाणूंच्या प्रसाराची वाढ थांबवतात. त्यामुळे ट्रीम केले तरी चालतील. पण शेव्ह करू नये.

शरीर हायड्रेटेड ठेवा

पावसाळ्यात जास्त प्रमाणात आर्द्रता असते, ज्यामुळे शरीरातील क्षार आणि द्रव मोठ्या प्रमाणात कमी होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी दररोज किमान ३ लीटर पाणी प्यावे. असे केल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल. याव्यतिरिक्त, पुरेशा प्रमाणात हायड्रेशन योनीस्रावांचे पीएच राखण्यास मदत करते. पावसाळ्यात घाम येत नाही. त्यामुळे शरीरातील वाईट द्रव पदार्थ मूत्रमार्गानेच बाहेर पडत असतात. यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे .

स्त्रिया बऱ्याच वेळा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण, त्या भागात होणारे जंतुसंसर्ग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महिलांनी सर्व ऋतूत काळजी घेणे आवश्यक आहे.

Story img Loader