रिलायन्स उद्योगसमूहाच्या मुकेश अंबांनी यांच्यापासून ते उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यापर्यंत सर्वच भारतीय उद्योगपतींची नावे प्रत्येकांने ऐकलेलीच आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अब्जाधीश रुपयांची उलाढाल करणाऱ्या या उद्योजकांच्या मुलीही काही कमी नाहीत. त्यांनीही घरातून मिळालेला वारसा पुढं नेत वडिलांचं नाव मोठं केलं आहे. जाणून घेऊयात अशाच यशस्वी उद्योजकांच्या मुलींबाबत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- हजारो एकर जमीन, कोट्यावधींची संपत्ती, दुर्मिळ हिऱ्यांचा खजिना अन्.. ‘ही’ आहे जगातील श्रीमंत राजकुमारी

१ अनन्या बिर्ला

अनन्या बिर्ला ही बिर्ला उद्योगसमूहाचे अध्यक्ष असलेल्या कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. अनन्याने ऑक्सफर्ड विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती क्युरोकार्ट घरातील हातमागाच्या सजावटीच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीबरोबरच एमपावर या मानसिक आजारांविषयी जागृती करणाऱ्या संस्थेची सहसंस्थापक आहे.

२ ईशा अंबांनी

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबांनी आणि नीता अंबांनी यांची ईशा मुलगी आहे. ईशाने नफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी मिळवली आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील मॅकेन्झी अँड कंपनी व्यवस्थापन सल्लागार फर्ममध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले. ईशा अंबांनी सध्या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या कंपन्याच्या मंडळावर कार्यरत आहे. ईशा गरीब मुलींच्या शिक्षणासाठीही काम करते. रिलायन्स जिओ लाँच करण्याची कल्पना ईशा यांची होती. २०१६ मध्ये ईशाने मल्टिब्रँड AJIO अॅप लाँच केले. रिलायन्स फाइंडेशनचा डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.

हेही वाचा- पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी केली क्रॅक अन् बनली IPS अधिकारी; काम्या मिश्राची ‘ही’ रणनीती वापरुन तुम्हीही करा आभ्यास

३ अश्नी बियाणी

फ्युचर ग्रुपच्या किशोर बियाणी यांची कन्या अश्नी बियाणी हीसुद्धा प्रसिद्ध उद्योजिका आहे. आश्नीने पार्सन्स स्कूल ऑफ डिझाईन तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठात टेक्सटाईल डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने फ्युचर ग्रुप जॉईन केला. आश्नीने फॅशन-फर्स्ट डिटर्जंट ‘वूम’ देखील लाँच केले. ती फ्युचर ग्रुपचा भाग असलेल्या फ्युचर कंझ्युमरच्या एमडीही पदावरही कार्यरत होती.

४ गायत्री रेड्डी

नामांकित माध्यम समूह असलेल्या डेक्कन क्रॉनिकलचे मालक वेंकटराम रेड्डी यांची गायत्री मुलगी आहे. इंडियन प्रिमिअर लीगला सुरूवात झाल्यानंतर गायत्री रेड्डी यांनी डेक्कन चार्जस टीम उभी करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. खेळाडू निवडीपासून ते डेक्कन चार्जस संघाच्या फ्रँचायजीपर्यंत सगळं काम ती बघते.

हेही वाचा- Who Is Your Gynac : मासिक पाळी, सेक्स लाइफ ते बाळंतपण; महिलांच्या समस्यांवर भाष्य करणारी सीरिज

५ वनिशा मित्तल

स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या लक्ष्मी मित्तल यांची वनिशा मुलगी आहे. वनिषा मित्तल हिने लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर वनिशा वडिलांच्या व्यवसायात सामील झाली. सध्या वनिशा मित्तल कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत आहे.

६ मानसी किर्लोस्कर

मानसी ही उद्योगपती विक्रम आणि गीताजन्ली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. मानसीला प्रवासाची खूप आवड आहे. प्रवासामुळे ती अनेकदा चर्चेत असते. ती टोयोटा किर्लोस्कर एम्पायरची एकमेव मालक आहे. मानसी किर्लोस्करची भारतातील पहिली युनायटेड नेशन्स यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मानसीला चित्रकलेचीही खूप आवड आहे.

हेही वाचा- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?

७ रोशनी नाडर

रोशनी ही भारतीय अब्जाधीश शिव नाडर यांची मुलगी आहे. ती एचसीएल (HCL) ग्रुपची सीईओ आहे एचसीएल एक मोठी टेक कंपनी आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच रोशनीचे समाजकार्यातही मोठे योगदान आहे. रोशनीचा शिव नादर फाऊंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमात मोठा सहभाग असतो. फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनीचा समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha ambani ananya birla gayathri reddy 7 rising business tycoons from indias wealthiest families dpj