सध्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सर्वत्र ‘बॉस लेडी’ म्हणून चर्चेत आहेत. लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती या पंतप्रधानाबद्दल नसून, त्यांच्या योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे आणि त्यांच्या स्वतःच्या विश्वासावर ठामपणे उभे राहण्याच्या स्वभावामुळेच, जॉर्जिया मेलोनी जागतिक पातळीवर स्त्रियांना प्रेरणा देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इटालीमधील रोमजवळील, गार्बटेला [Garbatella] येथे जन्माला आलेल्या जॉर्जिया या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच, जॉर्जिया यांनी इटालियन सोशल मूव्हमेंट (MSI) च्या युवा शाखा, फ्रोंटे डेला जिओव्हेंटुमध्ये नोंदणी करून राजकीय विश्वात सक्रिय झाल्या. जॉर्जिया मेलोनी यांचा बिनधास्त आणि ‘गो-गेटर’ स्वभाव सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. मात्र, त्यांच्या स्वभावाव्यतिरिक्त अजून एक गोष्ट अनेकांना प्रभावित करते ती म्हणजे, जॉर्जिया यांची कपडे परिधान करण्याची ‘पॉवर ड्रेसिंग’ पद्धत.

हेही वाचा : जुने भंगार, फर्निचर विकून कसा निर्माण केला मॉलीने लाखो रुपयांचा व्यवसाय? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये जॉर्जिया यांच्या स्टाईलमध्ये बराच बदल झालेला दिसतो. सध्या जॉर्जिया यांच्या अरमानी सूटमधील पॉवर ड्रेसिंगबद्दल जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. याची सुरुवात ऑक्टोबरदरम्यान झाली होती. तेव्हा, जॉर्जिया यांनी मारियो द्राघीच्या सरकारकडून, औपचारिक पद्धतीने स्वतःकडे सत्ता हस्तांतरित करताना त्या तीन दिवसांच्या कालावधीत गडद रंगाचे अरमानी पँटसूट परिधान केले होते. मंत्र्यांसोबतच्या पहिल्या अधिकृत फोटोसाठी जॉर्जिया यांनी काळ्या रंगाच्या शर्टसह अरमानी कपडे परिधान केले होते. त्यानंतर द्राघी यांच्या भेटीसाठी जॉर्जिया यांनी पांढरा शर्ट आणि अरमानीची निवड केली होती. दरम्यान, जॉर्जिया यांनी नेव्ही ब्लू अरमानीदेखील परिधान केला होता.

तेव्हापासून जॉर्जिया यांची बहुतेकदा अरमानी वेशभूषा असल्याने, कालांतराने तो एक ‘ऑफिस युनिफॉर्म’ वाटू लागला. जॉर्जिया यांच्या फॅशनने अनेक तरुणींच्या मनावर भुरळ घातली. अनेकांना त्यांची स्वतःची स्टाईल बदलून, जॉर्जिया मेलोनी यांसारखी फॅशन करायची होती. मात्र, जॉर्जिया या संपूर्ण जगासमोर इटली देशाचे नेतृत्त्व करतात. त्यांच्या प्रतिमेसह, त्यांच्या देशाची प्रतिमा जोडली जाते. त्यामुळे कपड्यांपासून ते केसांपर्यंत, त्यांच्या गोष्टीची प्रत्येक निवड आणि निर्णय हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.

या व्यतिरिक्त, पँटसूट ही प्रतिमा केवळ व्यक्तीपर्यंत मर्यादित नसून, त्याही पलीकडे जाते. जॉर्जिया यांचा स्वतःला सामर्थ्य, ‘बॉस’ वृत्तीसह सुनियोजितपणे जोडण्याचा प्रयत्त्न असून, पॉवर ड्रेसिंगसाठी मदत करणारा महत्त्वाचा भाग म्हणजे, ‘ज्योर्जियो अरमानी’.

हेही वाचा : केवळ २३ वर्षांची ‘आर्मिश असिजा’ बनली हवाई दलातील सर्वात तरुण महिला IAF अधिकारी! पाहा

इटालियन बनावटीचा अरमानी सूट हा जॉर्जियाच्या वेशभूषेतून ‘मेड इन इटली’ अशी स्वाभिमानाची गर्जना करणारा ठरतो. शेवटी देशाचे नेतृत्त्व करणाऱ्या जॉर्जिया यांच्या पॉवर ड्रेसिंगला विशेष महत्त्व असून, त्यांच्या कपड्यांच्या निवडीलादेखील एक हेतू असतो. त्या आपल्या ऑफिसमध्ये देश-विदेश पातळीवरील ठाम निर्णय घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे जॉर्जिया मेलोनी यांचा पँटसूटमधील पॉवर लूक त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक धारदार बनवण्यास उपयुक्त ठरते, अशी माहिती टाइम्स नाऊ [Times now] च्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Italian prime minister giorgia meloni how she became the icon for power dressing all over the world check out in marathi chdc dha