Tomiko Itooka : जपानच्या तोमिको इटूका यांची जगातली सर्वात वृद्ध महिला म्हणून गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्या ११६ वर्षांच्या आहेत. स्पेनच्या ११७ वर्षीय मारिया ब्रान्यास यांच्या निधनानंतर आता तोमिको इटूका या सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत. मारिया ब्रान्यास यांचे गेल्या आठवड्यात निधन झालं.
कोण आहे तोमिको इटूका?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तोमिको इटूका यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धापूर्वी २३ मे १९०८ रोजी जपानच्या ओसाका येथे झाला होता. त्या सध्या ह्योगो प्रांतातील एका नर्सिंग होममध्ये वास्तव्यास आहेत. तोमिको इटूका या ११६ वर्षांच्या असल्या तरी आजही त्या शारीरिक आणि मानसिकदृष्या सुदृढ असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – Video: ज्या सापाने दंश केला, त्याला पकडून व्यक्ती पोहोचला थेट रुग्णालयात; म्हणाला, “लवकर…”
तोमिको इटूका यांना गिर्यारोहनाचा छंद
तोमिको इटूका यांना गिर्यारोहनाचा छंद आहे. अगदी लहान वयापासून त्यांनी गिर्यारोहनाला सुरुवात केली होती. वय वर्ष १०० असतानाही त्यांनी जपानमधील शिखर माउंट ओंटेक हे दोनदा सर केलं आहे. हे शिखर समृद्रसपाटीपासून ३ हजार ६७ मीटर उंचीवर आहे. महत्त्वाचे हे शिखर चढताना त्यांनी हायकिंग बूटचा वापर न करता साधे बूट वापरल्याचे सांगितले जातं.
हेही वाचा – “ताकदीचा माज इतकाही बरा नाही”; समुद्राच्या लाटेने तरुणाचं काय केलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
तोमिको इटूका या आजही शारीरिकदृष्या सुदृढ
तोमिको इटूका या २० वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला होता. मात्र, १९९७ मध्ये दीर्घ आजारामुळे त्यांच्या पतीचं निधन झाले. पुढे त्या नारा प्रांतात स्थायिक झाल्यात. त्यांनी आतापर्यंत अनेक पायी यात्राही केल्या आहेत. तसेच त्यांनी ३३ बौद्ध मंदिराचे दर्शन घडवणारी साइगोकू कन्नन ही तीर्थयात्राही पूर्ण केली आहे. तोमिको इटूका या आजही शारीरिकदृष्या सुदृढ असल्याचं सांगितले जातं, त्यांना केळं खाण्याची आवड आहे. तसेच रोज जपानी लोकप्रिय पेय कॅलपीसचं सेवन करतात. त्यांच्या परिवाराच्या म्हणण्यानुसार, त्यांचं सर्वांप्रती असलेलं प्रेम आणि जीवन जगण्याबाबत असलेला सकारात्मक दृष्टीकोन हे त्यांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे.