कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं काम ‘प्रथमेश इकोफ्रेंडली गणेश संस्थे’च्या जयश्री गजाकोष गेल्या १५ वर्षांपासून करत आहेत.

आपल्या या प्रयत्नांविषयी सांगताना जयश्री म्हणतात, ‘‘माझे पती, संदीप यांना चित्रकलेची लहानपणापासूनच आवड होती. कलेच्या प्रातांत काही करायचा त्यांचा विचार होता. त्यातून आम्ही दोघांनी १५ वर्षांपूर्वी परळ येथील अविनाश पाटकर यांच्या डिझाइन सेंटरमध्ये कागदी लगद्यापासून वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर आम्हीच प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला काही शाळांमध्ये कागदाच्या लगद्यापासून लहान लहान वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. मात्र सुरूवातीला ते हौसेच्या पातळीवरच होतं.’’

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

कागदापासून गृहसजावटीच्या वस्तू बनवतानाच त्यांनी गणपतीही बनवून पाहिला आणि मग पर्यावरणपूरक गणपतीचीच निर्मिती करावी, या विचारानं जोर धरला. जयश्री सांगतात, ‘‘पहिल्या वर्षी आम्ही ३० गणेशमूर्ती बनवल्या. मात्र त्या रंगवल्या नव्हत्या. साच्यातून काढलेल्या पॉलिश, फिनिशिंग नसलेल्या त्या मूर्तीचं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रदर्शन मांडलं. पाहणाऱ्यांनी कौतुक केलं आणि मोठ्या प्रमाणात मूर्ती घडवण्यासाठी प्रोत्साहनही दिलं. त्यातून पुढचा मार्गक्रम ठरला. मोठ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्ती बनवता याव्यात यासाठी कुर्ल्याच्या कामगार नगरजवळील भाग्यलक्ष्मी बचत गटातील चाळीस जणींना प्रशिक्षण दिलं गेलं.’’

हेही वाचा… आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणं तुम्हालाही शक्य आहे!

या अनुभवाविषयी जयश्री सांगतात, ‘‘त्यांना काहीच अनुभव नसल्यानं शिकवताना कागदाच्या लगद्याचं खूप नुकसानही झालं. मात्र सगळ्याजणी शिकल्या. त्याच्या पुढील वर्षांपासून प्रत्यक्ष काम सुरू झालं. त्या वर्षी आम्ही ७०० गणपती केले. ही गोष्ट साधारणत: २०११ ची. मौखिक प्रसिद्धीमुळे खुद्द अभिनेत्री राणी मुखर्जीसह अन्य काही कलाकारांनी गणेशमूर्तीची मागणी केली.’’

राणी मुखर्जीच्या घरातील अनुभव सांगताना जयश्रींचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. त्या म्हणाल्या, ‘‘राणी मुखर्जी यांच्या घरी गणेशमूर्ती घेऊन गेलो, संपूर्ण कुटुंबालाच मूर्ती खूप आवडली. त्यांनी आमचा सत्कार केला. मी केलेली दागिन्यांची कलाकुसर त्यांना खूपच आवडली. इतकी, की घरी आलेल्या त्यांच्या पाहुण्यांकडे त्यांनी कौतुक केलं आणि आमची ओळखही करून दिली. शिवाय पूजा आणि आरतीसाठीही आम्हाला आवर्जून थांबवून घेतलं. तो आनंद, समाधान काही औरच होतं.’’ मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील, मालिका जगतातील अनेक कलाकारांच्या घरी जयश्री यांच्या कारखान्यात तयार झालेल्या मूर्तीची स्थापना होते.

बचत गटातील स्त्रियांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी घरी ‘पीठ’ (अर्थात इथे कागदी लगदा) मळण्याचं मशीन घेतलं आणि कामाच्या विस्तारासाठी ‘प्रथमेश इकोफ्रेंडली गणेश संस्था’ या बचत गटाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांचं पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं काम सुरू आहे. आपल्या कामाच्या पद्धतीविषयी जयश्री सांगतात, ‘‘आम्ही बचत गटाच्या स्त्रियांना घरीच ‘पीठ’ नेऊन देतो. या कामांत त्यांची मुलंही मदत करतात. साचे वापरून त्या मूर्ती तयार करतात. साधारणत: ८ ते १० दिवसांत एक गणेशमूर्ती तयार होते.’’

हेही वाचा… कामजिज्ञासा: निरामय कामजीवन हवंय?

‘पीठ’ तयार करण्याचं काम जयश्री स्वत:च करतात. ‘पीठ’ म्हणजे कागदापासून लगदा तयार करणं. त्यासाठी कागद फाडणं, ते भिजवणं, ते भिजल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करणं. त्यानंतर इतरांच्या मदतीनं कागदातलं पाणी पिळून काढायचं काम केल्यावर कागदाच्या लगद्यात डिंक आणि इतर पदार्थ मिसळून पुन्हा तो लगदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा त्यानंतर अगदी कापसासारखा हलका झालेला कागदाचा लगदा पिठासारखा मळायचा. साधारणपणे दीड ते दोन किलो कागदापासून एक-दीड किलोची, म्हणजे एक फुटाची गणेशमूर्ती तयार होते. एक गणपती आठ दिवस साच्यात ठेवायला लागतो. त्यामुळे त्याच्या निर्मितीवर मर्यादा येतात.

जयश्रींचं सगळं कुटुंब गणेशनिर्मितीचं काम करतं. घरातल्या सगळ्यांनी पेपर मॅशपासून गणपती बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. साच्यातून काढलेल्या मूर्तींना पॉलिश करणं, रंग देणं, दागिने तयार करणं आणि मार्केटिंग अशा सगळ्या कामांची त्या विभागणी करतात.

अशी मूर्ती वजनाला हलकी आणि दिसायला अगदी माती किंवा पीओपीच्या मूर्तीसारखीच असते. महत्त्वाचं म्हणजे दहा मिनिटांत पूर्ण मूर्ती पाण्यात विरघळून जाते, त्यामुळे विसर्जन करणंही सोपं असतं. अनेकांना असंही वाटतं की कागदाच्या लगद्यापासून मोठ्या आकाराच्या मूर्ती बनत नाहीत, मात्र संदीप यांनी १२ फुटांची मूर्ती तयार केली आहे.

सध्या जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं प्रशिक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं आहे.

reshmavt@gmail.com