अपर्णा देशपांडे

आजच्या तरुण पिढीने मागच्या पिढीतील काही कुटुंबांचा अभ्यास केला तर अनेक लक्षणीय बदल दिसून येतील. साधारण तीसेक वर्षांचा कालावधी अभ्यासला तर नातं, कुटुंब, शेजारपाजार, गाववाली मंडळी, मित्रपरिवार आणि अगदी जवळची रक्ताची नाती या सगळ्याच पातळीवर खूप जास्त बदल जाणवतो.

pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
international market investment
मार्ग सुबत्तेचा : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करताना….
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
thackeray group nominated Kedar Dighe against CM Eknath Shinde in Kopri Pachapkhadi
मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
credit card marathi article
Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

कौटुंबिक पातळीवर बोलायचं झालं तर एकत्र कुटुंबात मुलं फारच छान वाढली, गोष्टी वाटून घेण्याची आणि इतरांच्या मताप्रमाणे थोडी मनाला मुरड घालण्याची सवय लागली हे मान्य करावं लागेल. पण प्रत्येक पिढीला काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींना, अनुभवांना सामोरं जावंच लागतं… म्हणजे बदलाचा तो नियमच आहे. आम्हाला जाणवलेल्या काही अत्यंत नकारात्मक गोष्टींमध्ये कुटुंबाची सामूहिक मालमत्ता आणि त्याबद्दल निर्णय घेण्यात कमालीची उदासीनता किंवा ढिसाळपणा हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्णय घेण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखास असे. त्याच्या मताप्रमाणे सगळं होई. बाकी भावंडं जास्त बोलली नाही तरी आत असंतोष खदखदत असणार…

आणखी वाचा : करिअर-घर बॅलन्स : “आमचं स्टारपण उंबरठ्याबाहेर ठेवून घरात येतो”: निवेदिता सराफ

पणजोबा-पणजी किंवा आजोबा-आजीच्या काळात बांधून ठेवलेली कुटुंबं माळेतून मणी तुटून पडावेत तशी विखुरायची. कारण वेळीच प्रॉपर्टीसंबंधी कायदेशीर कारवाई न करणं हे आहे. पणजोबाची जमीन, वाडा, त्यात काळानुरूप वाढत जाणारे वाटेकरी …आणि नंतर प्रचंड गुंतागुंत. अशाने सख्खी भावंडं एकमेकांचे वैरी होत होती. सगळ्यांना एका धाग्यात बांधणारा धागाच त्यांच्या नात्याचा गळा आवळू शकत होता. प्रॉपर्टीसंबंधीच्या वाटण्या मनासारख्या न होणं म्हणजे पुढे कायमचे संबंध तुटणं!

आजच्या तरुण मुलांना मागील पिढीच्या नात्यातील प्रेमाच्या अत्यंत सुरस कथा ऐकवल्या जातात, पण ही दुसरी बाजू फारशी सांगितली जात नाही. याचा अर्थ असा नक्कीच नाही, की आजच्या तरुणाईला आई-वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही, पण आज पालक तुलनेने जागरूक झालेले आणि कुटुंब छोटं झाल्याने पूर्वीसारखी परिस्थिती उद्भवत नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात उद्भवते असं म्हणू या.

आणखी वाचा : मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण

हे सगळं बघून प्रश्न पडतो की, नातं नेमकं खूप जवळचं, विश्वासाचं कुठपर्यंत असतं? तर उत्तर येतं, पैसा मध्ये येत नाही तोपर्यंत! बेहिशोबी नातं जपणं खरंच कठीण आहे! एकदा का नात्यात पैसा, हिशोब, देवाणघेवाण याला महत्त्व आलं की तेव्हा ठिणगी पडतेच, असाच बहुतांशी अनुभव आहे! तशी ठिणगी न पडण्यासाठी मोठ्या मनाची माणसं लागतात… ज्यांचं प्रमाण दर पिढीमागे घटतच जातंय.

आजची तरुण पिढी त्या मानाने फारच नशीबवान म्हणायला हवी. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांत आर्थिक सुबत्ता आहे, आणि शिवाय पालकांकडून मिळालेली स्थावर मालमत्ताही आहे. म्हणजे एकमेकांना प्रेमाने भेटणं, अडीअडचणीला मदतीला धावणं, इतकंच करायचं बाकी असतं. तरीही सगळे का म्हणतात की नात्यात पूर्वीसारखे प्रेमाचे संबंध आज कुठं उरलेत?
आमचं नेमकं काय चुकतंय?

adaparnadeshpande@gmail.com