Indian origin US Vice President Kamala Harris : अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीबाबत अवघ्या जगात उत्सुकता आहे. या बलाढ्या देशाच्या सर्वोच्च पदावर कोण बसणार याकडे याकडे सारेजण डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचं नाव सुचवलं होतं. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात कमला हॅरिस यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं. दरम्यान, कमला हॅरिस यांचं नाव समोर आल्यापासून भारतीयांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. कमला हॅरिस या आफ्रिकन-अमेरिकन म्हणून स्वतःची ओळख सांगत असल्या तरीही त्यांच्यावर भारतीय संस्कारही झाले आहेत. त्यांच्या आई भारतीय असल्याने भारतीय माध्यमांत भारतीय वंशांच्या कमला हॅरिस असं संबोधलं जातं. त्यामुळे त्यांचं भारताशी नेमकं काय कनेक्शन आहे हे पाहूयात.

कमला हॅरिस कोण? (Who is Kamala Harris? What’s her Indian connection?)

कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन् या मूळच्या मद्रासच्या असून १९५९ साली जीवशास्त्राचा अभ्यास करण्याकरता त्या अमेरिकेत गेल्या होत्या. यावेळी त्यांची ओळख अर्थशास्त्राचे विद्यार्थी डोनाल्ड हॅरिस यांच्याशी झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि प्रेमातून त्यांनी लग्नही केलं. कालांतराने या जोडप्याला दोन मुली झाल्या. या दोन्ही मुलींना आफ्रिकन-अमेरिकन पद्धतीनेच वाढवलं. परंतु, त्यांच्यावर भारतीय संस्कारही केले. यातूनच श्यामला यांनी आपल्या दोन्ही मुलींची नावं भारतीय ठेवली. कमला आणि माया.

KS Puttaswamy,
खासगीपणाचा घटनात्मक अधिकार मिळवून देणाऱ्या माजी न्यायमूर्ती के. एस पुट्टास्वामी यांचे निधन!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sharad Pawar and Fahad Ahmad
Fahad Ahmad : शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक! स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, नवाब मलिकांच्या लेकीविरोधात लढणार
Baba Siddique murder case, Baba Siddique,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल आरोपींच्या संपर्कात, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता
Rahul Gandhi Upset With Maharashtra Congress Leaders?
Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”
Sanjaykaka Patil
Sanjay Kaka Patil NCP : मोठी बातमी! माजी खासदार संजय काका पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
dr tara bhawalkar honored with loksatta durga lifetime achievement award
माणसातील जनावर अजूनही जिवंत आहे; डॉ. तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती ;‘ लोकसत्ता दुर्गां’चा गौरव सोहळा
mns declare mayuresh wanjale name as a candidate from khadakwasla constituency
मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारी
२०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर भारतात जल्लोष करण्यात आला होता.

कमला हॅरिस यांनी केला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अन् कायद्याचा अभ्यास

कमला हॅरिस यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव आहे. आईनंच त्यांच्यात निर्भयता रुजवली. तसंच, त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी त्यांना भारतीय मूल्यांशी ओळख करून दिली. कालांतराने हॅरिस उभयतांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कमला आणि माया या दोन मुली आईबरोबर राहिल्या. हार्वर्ड विद्यापीठात येण्याआधी या दोन्ही मुली विविध शाळांमध्ये शिकल्या. कमला हॅरिस यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. तर, नंतर त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला. १९९० मध्ये त्या बार असोसिएशनच्या सदस्याही बनल्या. त्याचवर्षी त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये उपजिल्हा वकिल (Deputy District Attorney) म्हणून करिअरला सुरुवात केली.

हेही वाचा >> राजकारण : बेगानी शादी में..

२००३ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या जिल्हा वकील (District Attorney) म्हणून त्यांची निवड झाली. तर २०१० आणि २०१४ मध्ये कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल म्हणूनही काम पाहिलं. आपल्या कारकीर्दीत त्यांनी फाशीच्या शिक्षेला विरोध केला, समलिंगींचे हक्क, पर्यावरण रक्षण, समाजमाध्यमांचा गैरवापर करून केलं जाणारं लैंगिक शोषण अशा विविध प्रकारच्या खटल्यांत बाजू मांडली. २०१७ मध्ये त्या त्यांच्या राज्यातून कनिष्ठ युएस सिनेटरही बनल्या. आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध मुद्दे मांडले.

…तर कमला हॅरिस ठरतील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

सिनेटमधून सेवा देणाऱ्या त्या दुसऱ्या आफ्रिकन अमेरिकन आणि पहिल्या दक्षिणपूर्व आशियाई महिल्या ठरल्या. अमेरिकेच्या २४८ वर्षांच्या इतिहासात अद्याप एकही महिला राष्ट्राध्यक्ष निवडून आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत.

कमला हॅरिस यांचे गुणदोष कोणते?

कमला हॅरिस यांनी कधी काळी म्हणजे २०२०मध्ये अध्यक्षपद उमेदवारीसाठी बायडेन यांना आव्हान दिले होते. पण सुरुवातीच्या प्रायमरीजमध्ये (पक्षांतर्गत निवडणुका) फार भरीव काही करता न आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. उपाध्यक्ष म्हणून सुरुवातीच्या काळात त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता लाभू शकली नव्हती. मेक्सिको सीमा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संबंध या आघाड्यांवर त्यांची कामगिरी निस्तेज होती. मात्र हळूहळू त्यांनी कारभारावर पकड घेण्यास सुरुवात केली आहे. गर्भपाताच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमरपणे डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू मांडली. आफ्रिकी-अमेरिकी, आशियाई-अमेरिकी, हिस्पॅनिक वंशियांमध्ये त्यांना मान्यता आणि लोकप्रियता मिळू लागली आहे.